https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

नैसर्गिक मानवतेचे सैनिकीकरण!

नैसर्गिक मानवतेचे सैनिकीकरण!

माणसाने माणसाचेच वंशधर्मांत, जातवर्णांत, देशप्रांतात विभाजन करुन घेऊन स्वतःचे संकुचित सैनिकीकरण केले आहे. कोण स्वतःला धर्मसैनिक म्हणवून घेतो, कोण स्वतःला जातसैनिक म्हणवून घेतो तर कोण स्वतःला प्रांतसैनिक म्हणवून घेतो. स्वतःच्या संकुचित स्वार्थासाठी निरनिराळ्या मानव समूहांनी निर्माण केलेली ही गटबाजी आहे हे समजावून सांगण्यासाठी कोणा पंडिताची गरज नाही.

आता या सर्व गटांनी विज्ञानाचा नीट अभ्यास करुन नैसर्गिक मानवता म्हणजे काय हे नीट समजून घेतले पाहिजे आणि अशा नैसर्गिक मानवतेचे राज्य जगात निर्माण करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. मग अशा मानवतेचे मानवसैनिक व्हायला कोणाला लाज वाटेल काय? जोपर्यंत अशी नैसर्गिक मानवता जगात प्रस्थापित होत नाही तोपर्यंत कोणताही मनुष्य या जगात मुक्त व शांत जीवन जगूच शकत नाही. -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा