https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

*भूमिका*!

*भूमिका*!

(१) विश्व अनेक ज्ञान शाखांत आणि त्या ज्ञान शाखांतील अनेक भूमिकांत विखुरलेले आहे. भूमिका कोणत्याही ज्ञान शाखेतील असो व कोणतीही असो, त्या भूमिकेचे सार्थक करण्यासाठी त्या भूमिकेत जीव ओतावा लागतो.

(२) स्वतःहून स्विकारलेल्या  भूमिकेत जीव ओतण्यासाठी अर्थात त्या भूमिकेत शरीर व मनाने झोकून देऊन समरस होण्यासाठी त्या भूमिकेशी निगडीत असलेल्या ज्ञान शाखेची नैसर्गिक आवड व त्या भूमिकेकडे असलेला नैसर्गिक ओढा , त्या ज्ञान शाखेचे पूर्ण ज्ञान व त्या ज्ञानावर आधारित त्या भूमिकेचा अंदाज आणि ती आवड व ते ज्ञान घेऊन त्या भूमिकेत उतरताना ती आवड, ते ज्ञान व ती भूमिका या तिन्ही गोष्टींत एकरूप झालेले पूर्ण ध्यान अर्थात आवड, ज्ञान व ध्यान या तिन्ही गोष्टींना एकत्रितपणे योग्य प्रमाणात कार्यरत केल्याशिवाय त्या स्वीकृत भूमिकेला खरा न्याय मिळत नाही व ती भूमिका यशस्वी होत नाही.

(३) अर्थात स्वीकृत भूमिकेचे यश वैयक्तिक पातळीवरून सार्वजनिक पातळीवर जाऊन त्या वैयक्तिक यशाला सार्वजनिक प्रसिद्धी, मूल्य व प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी वातावरणातील इतर बरेच घटक कारणीभूत असतात व त्या सर्व घटकांचे सहकार्य अशी भूमिका पार पाडताना मिळेलच याची काहीही शास्वती नसते. परंतू वैयक्तिक पातळीवर का असेना पण स्वीकृत भूमिकेत आवड, ज्ञान व ध्यान या त्रिसूत्री च्या जोरावर समरस होऊन यशस्वी व्हायलाच हवे. मग  वैयक्तिक पातळीवरील अशा यशाचा आनंद उपभोगताना सार्वजनिक पातळीवरील अपयशाची पर्वा करण्याची गरज भासत नाही. *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा