*बासरी वादक*
(१) चांगली बासरी वाजवणा-या बासरी वादकाकडून कोणी बासरीच काढून घेतली तर काय होईल? बासरी वादकाची स्वरयुक्त अभिव्यक्ती जरी नैसर्गिक असली तरी सर्व प्राणीमात्रांना ती सारख्याच अर्थाने कळेल असे नाही. कोणाला त्या बासरीचे सूर कळणारच नाहीत, तर कोणा महाभागाला ते सूर बेसूर वाटतील.
(२) अशा परिस्थितीत बासरी वादकाला बासरी कशी वाजवायची हे जरी कळले, तरी ती कधी, कुठे आणि कोणासमोर वाजवायची हे जर कळले नाही तर अशा बासरी वादकाच्या हातातून कोण्या महाभागाकडून बासरी हिसकावून घेऊन फेकून देण्याचा धोका सतत राहणार.
(३) बासरी वादकाला सकल प्राणीमात्रांकडून मानसन्मान नाही, पोटापाण्याची व्यवस्थाही नाही, पण उलट बासरी खेचून घेण्याचाच धोका जास्त असेल तर अशा नकारात्मक व भीतीयुक्त वातावरणात तो बासरी वादक काय डोंबल्याची बासरी वाजवणार? एकीकडून बासरी वाजवायची कला बहाल करायची आणि दूसरीकडून त्या कलेतच अशी विचित्र खोच मारून ठेवायची! काय म्हणावे निसर्गाच्या या खेळाला? *बी.एस.मोरे, वकील*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा