https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

*सर्वधर्मसमभाव*?

*सर्वधर्मसमभाव*?

(१) विज्ञानवादी निसर्गधर्म, मानवतावादी समाजधर्म, राष्ट्रवादी राष्ट्रधर्म आणि अध्यात्मवादी देवधर्म या सर्व धर्मांविषयी सर्वधर्मसमभाव कसा ठेवायचा? 

(२) कारण या सर्व धर्मांचा एकाच बौध्दिक पातळीवर राहून विचार करता येत नाही. प्रत्येक धर्माच्या बौद्धिक संकल्पना वेगळ्या आहेत व भावनिक निष्ठा किंवा श्रध्दाही वेगळ्या आहेत. 

(३) शिवाय मानवी मेंदूचे विचार केवळ बौद्धिक किंवा तार्किक असू शकत नाहीत. त्यांना भावनेची जोड ही असतेच. अर्थात कोणत्याही सत्य किंवा काल्पनिक गोष्टींची कारणमीमांसा भावनेचा त्याग करून केवळ बुद्धिने किंवा तर्कानेच केली पाहिजे असा अट्टाहास करणे म्हणजे बौद्धिक विचार विरूद्ध भावनिक विचार हा वैचारिक वादाचा विषय निर्माण करण्यासारखेच आहे. *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा