https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

*टायगर वकील*!

*टायगर वकील*!

(१) वकिली क्षेत्रात राम जेठमलानी हे नाव म्हणजे क्रिकेट क्षेत्रात सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि संगीत क्षेत्रात महमद रफी, लता मंगेशकर.

(२) राम जेठमलानी यांनी सिद्ध केलेय की, जे मनाने आणि/किंवा शरीराने कमकुवत राहतील व अज्ञानामुळे भरकटून वाममार्गाला लागतील ते लवकर संपतील. निसर्गाचा तोच नियम आहे.

(३) इथे आयुष्य भरपूर वर्षे जगणे हा मुद्दा नाही. तो कसे जगणे हा मुद्दा आहे. आयुष्य फार थोडे जगूनही फार महान कार्य केलेल्या महान व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. त्यांचा एकेक दिवस म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातील एकेक वर्ष.

(४) जगावे किती, यापेक्षा जगावे कसे हे टायगर वकील राम जेठमलानी यांच्याकडून शिकावे. किती आले त्यांच्या आयुष्यात आणि किती गेले त्यांच्या आयुष्यातून. केवढे आघात सहन केले त्यांनी त्यांच्या जीवनात. पण त्यांनी कशाची फिकीर केली नाही की कोणाची पर्वा केली नाही. गडी नेहमीच खंबीर व ताठ.

(५) कष्टाने मिळविलेल्या ज्ञानाचे जेवढे सोने करता येईल तेवढे त्यांनी केले. ज्ञानाच्या जोरावर भरपूर आर्थिक संपत्ती तर मिळविलीच, पण राजकीय क्षेत्रातही स्वतःचा वैयक्तिक दबदबा निर्माण केला. 

(६) गरज पडली की, लोक आपोआप त्यांच्या मागे लागतात.  त्यांना मात्र तशी गरज भासत नाही. त्यांनी तशी परिस्थितीच निर्माण होऊ दिली नाही. बिनधास्त माणूस, पॉवरफुल माणूस! स्वार्थी दुनियेचे गणित त्यांनी बरोबर ओळखले आहे. 

(७) टायगर एकटाच लढतो. अशी कणखर माणसेच निसर्गाला आवडतात. अशीच माणसे माझ्यासाठी सुध्दा कायम आदर्श राहिली आहेत. *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा