https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

*अन्नाला मीठाची चव तशी चांगल्याला वाईटाची चव*!

*अन्नाला मीठाची चव तशी चांगल्याला वाईटाची चव*!

(१) मनुष्य जीवनात सगळ्याच गोष्टी चांगल्या असत्या तर मनुष्याला चांगल्याचे महत्त्वच कळले नसते. त्यामुळेच कदाचित परमेश्वराने चांगल्या बरोबर वाईटाची पुडी सोडून दिली असावी.

(२) पण एकंदरीत मनुष्य जीवनात वाईटापेक्षा चांगल्याचेच प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. कारण वाईटाची पुडी सोडताना परमेश्वराने अशी मेख मारून ठेवलीय की, वाईटाने कितीही उंच उड्या मारण्याचा प्रयत्न केला व त्यातून चांगल्याला त्रास देण्याची कितीही हिंमत केली तरी परमेश्वराने चांगल्या कडे एक अशी अलौकिक शक्ती देऊन ठेवलीय की, वाईटाचे अती झाल्यावर वाईटाला वरून खाली आणून मसणात गाडण्याचे ईश्वरी कर्म चांगल्याने केले म्हणूनच समजा. पण यामुळे वाईटाची खुमखुमी जिरेल आणि वाईटाची टिवटिव बंद होईल असे बिलकूल नाही.

(३) जीवनातील चांगुलपणाचा आनंद उपभोगण्यासाठी परमेश्वराने चांगल्याला घातलेली मुलभूत अट एकच आहे आणि ती म्हणजे परमेश्वराने दिलेल्या अलौकिक शक्तीच्या जोरावर उपद्रवी वाईटा विरूध्द शरीर व मनाला झिणझिण्या आणणारे युद्ध सतत कर. अर्थात, अन्नाला मीठाची चव तशी चांगल्याला वाईटाची चव! *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा