https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

जास्त सुखी कोण?

जास्त सुखी कोण?

(१) भौतिक विकासाच्या चक्रात गोल गोल फिरणा-या लोकांना शांतपणे विचार करायला वेळ कसा मिळणार? धाव धाव धावण्यात आणि वरवर जगण्यात त्यांचे आयुष्य कधी संपून जाते हे त्यांचे त्यांनाच कळत नाही.

(२) खरंच ज्या व्यक्तींना शांतपणे विचार करण्यास आणि त्या विचारांतून सृष्टीचे व जीवनाचे सत्य समजून घेऊन त्या ज्ञानातून मानसिक शांती मिळविण्यास भरपूर वेळ मिळतो त्याच जगात सर्वात सुखी व्यक्ती  होत. सर्वोच्च सुखाची ही मानसिक पातळी गाठण्यासाठी अशा व्यक्तींनी जीवनातील इतर अनेक भौतिक आकर्षणांचा त्याग केलेला असतो, हे सत्य लक्षात घेऊन इतरांनी अशा व्यक्तींच्या सर्वोच्च सुखावर उगाच जळू नये किंवा उगाच त्यांची कीव करू नये.

(३) अशा जळण्याने किंवा कीव करण्याने अशा सुखी व्यक्तींच्या सुखात काहीच फरक पडत नसतो. याचे कारण म्हणजे अशा सुखी व्यक्तींनी ज्ञानाची सर्वोच्च बौद्धिक पातळी व त्याबरोबरच सर्वोच्च सुखाची मानसिक पातळी गाठलेली असते आणि आत्मिक प्रगतीच्या दिशेने पुढे गेल्यानंतर अशा व्यक्ती मागे वळून पहात नाहीत. -एड.बळीराम मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा