https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

*निसर्गाय, ईश्वराय नमः! ओम् शांती*!

*निसर्गाय, ईश्वराय नमः! ओम् शांती*!

(१) नैसर्गिक सत्याला भौतिक स्वरूपात पहायचे की आध्यात्मिक स्वरूपात पहायचे, हा मनुष्याने स्वतःच निर्माण केलेला संभ्रम आहे. त्या संभ्रमातून भौतिकतेचे प्रतिनिधीत्व करीत असलेला  निसर्ग व आध्यात्मिकतेचे प्रतिनिधीत्व करीत असलेला देव अशा दोन वेगळ्या महाशक्तींचा गोंधळ मनात तयार होतो आणि त्या मानसिक गोंधळातूनच निसर्गाचे विज्ञान विरूध्द देवाचा धर्म असा संघर्ष निर्माण होते.

(२) वास्तविक मनुष्याकडे पहाण्यासाठी दोन डोळे व ऐकण्यासाठी दोन कान ही वेगवेगळी संपर्क साधने जवळ असली तरी शेवटी त्यांचा संपर्क मेंदूतील एकाच मनाशी होतो. लहान मेंदू व मोठा मेंदू हे मेंदूचे दोन भाग असले तरी दोन्ही भागांचे मिळून एकच मन होते. लोकांची शरीरे सुध्दा वेगळी असली तरी त्यांची मने अशीच एक होतील का? वेगळ्या मनांमुळे निर्माण झालेले नवरा बायकोतील निरर्थक वाद संपून कौटुंबिक हिंसाचार नष्ट होईल का? असे ना ना कायद्याचे प्रश्न मनात तयार होतात.

(३) माझ्या मते, अगदी तशाच प्रश्नांच्या अनुषंगाने निसर्ग व देवाला एकत्र करण्यात काय हरकत आहे? त्यामुळे विज्ञान व धर्म यांच्यातील संघर्ष कायमचा संपुष्टात येईल. मी निसर्ग व देव यांना एकच मानून माझ्यापुरता तरी हा लहानपणापासून सतावणारा प्रश्न वैयक्तिक पातळीवर सोडवला आहे. माझी त्या महान शक्तीपुढील प्रार्थना मी स्वतःच सोपी करून टाकली आहे. निसर्गाय, ईश्वराय नमः! ओम् शांती! *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा