*जय श्रीकृष्ण*!
(१) श्रीकृष्णाचे सैन्य की प्रत्यक्ष श्रीकृष्ण यापैकी कशाची निवड करायची या कठीण प्रश्नाचे उत्तर दुर्योधन व अर्जुन या दोघांनी त्यांच्या बुद्धी नुसार शोधले.
(२) त्याच प्रमाणे भौतिक सत्ता संपत्ती की या सत्ता संपत्ती वर आवाज न करता राज्य करणारे ईश्वरीय ज्ञानशक्ती केंद्र यापैकी कशाची निवड करायची या कठीण प्रश्नाचे उत्तर मी माझ्या बुद्धी प्रमाणे ईश्वरीय ज्ञानशक्ती केंद्र हेच शोधले व त्याचीच निवड करून माझ्या त्या निर्णयाशी मी कायम ठाम राहिलो.
(३) माझ्या या ठाम निर्णयामुळे मी भौतिक सत्ता संपत्तीच्या बाबतीत नेहमीच नुकसानीत राहिलो आहे. पण त्याची मला बिलकूल खंत नाही. कारण ईश्वरीय ज्ञानशक्ती केंद्राच्या अखंड, अविरत भक्तीतून मला जो आनंद व मनःशांती मिळाली आहे त्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे.
(४) लोकांना आश्चर्यकारक किंवा कदाचित मूर्ख वाटणाऱ्या माझ्या या निवडीमुळे व भक्तीमुळे माझ्या कुटुंबात खूप कलह निर्माण झाले, कुटुंब सदस्यांना खूप यातना, आर्थिक विवंचना भोगाव्या लागल्या हे मला मान्य आहे. पण माझी भक्ती सांभाळून त्यांच्या विषयीची किमान भौतिक कर्तव्ये मी पार पाडली आहेत. त्यात जर ते सदस्य समाधानी न राहता दुःखीच राहणार असतील तर त्याला मी काही करू शकत नाही. ही सर्व नातीगोती तात्पुरती आहेत आणि त्यामुळे त्यांना किती महत्त्व द्यायचे हे ज्ञान माझ्या भक्ती मार्गावर पुढे पुढे जात असताना मला मिळाले आहे.
(५) याचा अर्थ असा नव्हे की, मी माझ्या भौतिक कर्मांचा संपूर्ण त्याग करून संन्यास घेतला आहे. पण भौतिक परिस्थितीच्या चक्रात राहून भौतिक क्रिया कर्मे पार पाडीत असताना भौतिक सत्ता संपत्तीपेक्षा संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण करणाऱ्या वैज्ञानिक व आध्यात्मिक शक्तीकेंद्राशीच अर्थात प्रत्यक्ष श्रीकृष्णाशीच अर्जुनाप्रमाणे जवळीक साधणे हेच मला अधिक प्रिय आहे. जय श्रीकृष्ण! *बळीराम*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा