https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे?

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे?

(१) निसर्ग देवो भव, असे म्हणून विज्ञानाच्या संगतीत रहावे तर निसर्ग वेड्यावाकड्या वळणांनी चांगलीच दमछाक करतोय. निसर्ग सोडून देवाला साकडे घालीत अध्यात्माच्या नादी लागावे तर अध्यात्म क्षेत्रातील बजबजपुरी बघून जीव कासावीस होतोय. धंद्यात शिरावे तर तिथे भांडवलशाहीच्या खेळात सरळसाध्या गरीब माणसाला प्रवेश परीक्षेतच नापास व्हावे लागतेय. राजकारणात उडी घ्यावी तर तिथे केवळ संधीसाधू मित्रांपासूनच नव्हे, तर स्वतःच्या मुलांपासूनही सावध रहावे लागतेय. आणि मग शेवटी या सर्वांना धडा शिकविण्यासाठी कायदा क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा तर तिथेही अशा प्रामाणिक माणसाला कोंडीत पकडून त्याला आयुष्यातून कायमचा उठवण्यासाठी भ्रष्टाचारी लोकांकडून सदैव कट केला जातोय.

(२) काय हे सर्व! आणि तरीही थोर विचारवंत अशाही परिस्थितीत सकारात्मक रहाण्याचा आम्हाला साळसूद सल्ला देतच असतात. तसेच  काहीजण "या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असे म्हणतच असतात. -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा