https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

अंधश्रध्देचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य?

अंधश्रध्देचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य?

(१) विज्ञानातून ज्ञात झालेले नैसर्गिक सत्य हेच वैज्ञानिक सत्य! मूलभूत नैसर्गिक सत्याच्या विरूद्ध मनात येणारा किंवा कायम घर करून बसलेला अनैसर्गिक विचार म्हणजेच अंधश्रध्दा आणि अशा अंधश्रध्देतून केली जाणारी अनैसर्गिक कृती म्हणजेच  अंधश्रध्देची अभिव्यक्ती!

(२) केवळ धार्मिक थोतांडाचीच नव्हे, तर इतर सर्वच अनैसर्गिक  विचार व कृतींची निर्मिती अंधश्रध्देतून होते. खरं तर नैसर्गिक सत्याविषयीचे वैज्ञानिक अज्ञान हिच धार्मिक थोतांडासह इतर सगळ्याच अंधश्रध्दांची जननी आहे.

(३) एकवेळ वैज्ञानिक अज्ञानातून अंधश्रध्द असणे पटण्यासारखे आहे, पण नैसर्गिक सत्याविषयीचे वैज्ञानिक ज्ञान मिळाल्यावरही अंधश्रध्द राहणे हे निश्चितच मानसिक कमकुवत पणाचे लक्षण आहे. अंधश्रध्देच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मनुष्याला असावे की नसावे, हा कायद्यापेक्षाही मोठा मनुष्याच्या तसेच मनुष्य समाजाच्या वैज्ञानिक प्रगल्भतेचा प्रश्न आहे. - बी.एस.मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा