रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग!
(१) वाघ, सिंह, लांडगे, मगरी इ. जंगलात रहाणारे क्रूर प्राणी आणि ढेकूण, डास इ. मनुष्य वस्तीत घुसलेले उपद्रवी किटक मानवाला दुष्ट वाटतात ना! अहो, पण त्या निसर्ग निर्मिकाने व नियंत्याने मनुष्य निर्माण करताना की करण्यापूर्वी वरील प्राणीमात्रांची निर्मिती का बरे केली असावी या कारणाचा कधीतरी विचार केला आहे का, स्वतःला श्रेष्ठ समजणा-या तुम्ही मानवी जीवात्म्यांनी?
(२) त्या निसर्ग निर्मिकाने व नियंत्याने वरील क्रूर व उपद्रवी प्राणीमात्रांना एका दुष्टचक्रात अर्थात नरकात फेकून दिलंय. पण म्हणून तुम्ही मानवांनीही त्यांच्यासारखेच वागावे व नरकात जगावे, अशी निसर्ग व्यवस्था आहे का? आता बघा, त्या नापाक पाकिस्तानी दहशतवाद्यांना काय त्या निर्मिक नियंत्याने सांगितले होते की भारताबरोबर कुरापती काढून रक्तरंजीत त्रास द्यायला? मग भारताने त्यांच्याविरुध्द सर्जीकल स्ट्राईक करुन त्यांचा खातमा केला यात भारताचे काय चुकले?
(३) तसं पाहिलं, तर त्या निर्मिक नियंत्याने उपद्रवी जीवजंतूंना तथाकथित दुष्ट कर्माची एक मर्यादा घालून दिली आहे आणि मनुष्यालाही त्याच्या तथाकथित चांगुलपणाची एक मर्यादा घालून दिली आहे. पण या मर्यादेचा भंग अर्थात अतिक्रमण सगळेच जण करतात आणि मग युद्धाचे प्रसंग निर्माण होतात. मग असे युद्ध रोगांविरुध्द पुकारलेले औषधी युद्ध असो वा दहशतवाद्यांविरुध्द पुकारलेले सैनिकी युद्ध असो. अर्थात सर्जीकल स्ट्राईक रोजच करावे लागतात. साधुसंतांनी या जीवंत अनुभवालाच म्हटले आहे की, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग! -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा