डासमारी यंत्र!
मानवेतर प्राणीमात्रांचा बंदोबस्त करण्यासाठी आपली तल्लख बुद्धी वापरून मनुष्याने बरीच यंत्रसामुग्री जमा केलीय. त्यातलेच एक उदाहरण म्हणजे उपद्रवी डासांना विद्युत प्रवाहाचा झटका देऊन मारण्यासाठी तयार केलेली जाळीची ब्याट. विद्युत प्रवाह भारीत ब्याट डासांना चिकटवली की तावडीत सापडलेले डास पटापट मरतात. अशा डासमारीत डासांचा छळ होत नसल्यामुळे प्राणी छळ प्रतिबंधक कायद्याचा प्रश्नच उदभवत नाही. पण मनुष्य प्राणी हा तर फारच उपद्रवी प्राणी आहे. तो निसर्गाबरोबरच मानव समाजालाही काहीना काहीतरी स्वरूपात उपद्रव करीतच असतो. पण अशा उपद्रवी मनुष्याला उपद्रवी डास म्हटले तर त्याला फार राग येतो. म्हणून त्याला गोड गोड बोलून देवधर्म, मानवता वगैरे गोष्टी डोक्यात भरवाव्या लागतात. पण तरीही उपद्रव करीत राहण्याची त्याची वाईट खोड जाता जात नाही. मनुष्य जीवन फार मौल्यवान आणि त्यामुळे त्याचे उपद्रव मूल्यही फार मोठे. मनुष्याच्या राजकीय उद्योगात या उपद्रव मूल्याचा राजकारणी मंडळींकडून मोठ्या शिताफीने वापर केला जातो. अशा कठीण परिस्थितीत उपद्रवी माणसांचा माणसांकडूनच कसा बंदोबस्त करायचा, त्यासाठी कोणती यंत्रसामग्री वापरायची, हा कायद्याला पडलेला फार मोठा प्रश्न आहे. -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा