https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, ५ एप्रिल, २०१७

सैनिक आणि पोलीसांचे मनोधैर्य खच्ची करू नका!

सैनिक आणि पोलीसांचे मनोधैर्य खच्ची करू नका!
सैनिक आणि पोली
सांशिवाय ना फौजदारी कायदा ना दिवाणी कायदा! नव्हे कोणताच कायदा नाही. हे निर्विवाद सत्य आहे आणि हे सत्य जो कोणी नाकारेल त्याच्यासारखा तोच! भ्रष्टाचाराचे बिलकूल समर्थन नाही. पण भ्रष्टाचारापासून आता कोणीच मुक्त नाही. फक्त टक्केवारी वेगवेगळी आहे. आता भ्रष्टाचार कमीजास्त प्रमाणात  सगळ्यांच्याच रक्तात भिनलाय, हे सत्य नाकारता येणार नाही. भ्रष्टाचारी सगळीकडेच आहेत. त्यामुळे फक्त पोलीस आणि सैनिकांनीच शिस्त पाळायची आणि आम्ही मात्र मानवी हक्काच्या नावाखाली मोकाट फिरण्याचा परवाना मागायचा, हे भयंकर घातक आहे. लक्षात ठेवा! देशाच्या सीमेवर जवान आणि देशांतर्गत पोलीस नसतील तर पुरती वाट लागली म्हणूनच समजा. कायदा राहील कायद्याच्या पुस्तकात आणि गुंड मवाली घुसतील घरांत राजरोसपणे लूट, बलात्कार आणि खून करण्यासाठी! तेंव्हा मानवी हक्क वाल्यांनो, कृपया सैनिक व पोलीस यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे पाप करू नका. -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा