https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

अंधश्रध्दा निर्मूलनासाठी हिंदू धर्मच अगोदर का?

अंधश्रध्दा निर्मूलनासाठी हिंदू 
धर्मच अगोदर का?


अंधश्रध्दा कोणत्या धर्मात आहेत आणि कोणत्या धर्मात नाहीत, हा जरी अभ्यासाचा व अभ्यासपूर्ण चर्चेचा विषय असला तरी भारतात हिंदू धर्मातील अंधश्रध्दांवरच जास्त टिका व चर्चा होते हेही खरेच आहे. माझ्या मते याचे कारण हेच असावे की, भारत देश हा बहुसंख्येने हिंदूधर्मीय आहे आणि त्यामुळे तर्क हाच असावा की, हिंदू धर्मातील अंधश्रध्दा कमी झाल्या की त्या धर्माचा वैज्ञानिक गाभा स्पष्ट होईल आणि हिंदू धर्म    आणखी जास्त प्रभावशाली होईल. हिंदू धर्मातील "वसुधैव कुटुंबकम्" हे तत्वज्ञान आणि आणखी ब-याच गोष्टींना वैज्ञानिक आधार आहे हे सत्य हिंदू धर्मातील अंधश्रध्दा कमी झाल्या की आपोआप जगासमोर येईल यात शंका नाही. भारतात बहुसंख्येने असलेला हिंदू धर्म अंधश्रध्दा मुक्त झाला की त्याच्या प्रभावामुळे भारतात अल्पसंख्येने असलेल्या इतर धर्मातील अंधश्रध्दा निदान भारतात तरी हळूहळू आपोआप कमी होतील असे वाटते. एवढे मात्र खरे की, धार्मिक अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ ही नुसती कायदा करुन पुढे जाणार नाही किंवा कोणत्याही झटपट क्रांतीने यशस्वी होणार नाही तर तिचा प्रवास सततच्या वैचारिक समाज प्रबोधनातून पुढे सरकणार आहे. -बी.एस.मोरे, वकील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा