https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ९ एप्रिल, २०१७

स्वार्थी जगात व्यवहाराने वागा!

स्वार्थी जगात व्यवहाराने वागा!

(१) ज्ञान अनमोल आहे. ते मिळविण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लागते. ज्ञान दिल्याने दूस-याचे ज्ञान वाढते हे खरे आहे, पण फुकट वाटल्याने स्वतःच्या ज्ञानाची किंमत कमी होते हेही खरे आहे. तेंव्हा स्वार्थी जगात ज्ञानी माणसांनी व्यवहाराने वागायला हवे. 

(२) असे वागण्याची अक्कल ही सुध्दा अनुभवावर आधारित ज्ञानानेच येते. पण अपवादात्मक परिस्थितीत ज्ञानाचा वापर करताना ज्ञानाची  किंमत पैशात करता येत नाही, हेही खरेच! उदाहरणार्थ, एखाद्या गरीब आरोपीचे निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी एखादा वकील अशा आरोपीचे वकील पत्र घेऊन त्याला वाचवण्यासाठी  कायद्याच्या ज्ञानाचा वापर फुकट करून ते ज्ञान उदात्त भावनेने सत्कारणी लावू शकतो. -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा