https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

व्यवहार करताना जरा जपून!

व्यवहार करताना जरा जपून!

एक धूर्त व लबाड माणूस एका सज्जन माणसापुढे स्वतःच्या गरिबीचे खोटेच प्रदर्शन करून ठराविक मुदतीत परत करण्याच्या बोलीवर काही रक्कम कर्जाऊ मागतो. मग तो सज्जन दया भावनेने ती रक्कम बिनव्याजी कर्जाने त्या लबाडाला देतो. पण मुदत संपल्यानंतरही तो लबाड पैसे परत करण्यात टाळाटाळ करू लागतो. तेंव्हा सज्जनाने त्या लबाडाकडे पैशाचा तगादा लावला. पण लबाड फारच बिलंदर निघाला. त्याने सज्जनाचे ते बिनव्याजी पैसे शेवटपर्यंत परत केले नाहीतच! मग एक दिवशी सज्जन आजारी पडला. तो निर्लज्ज, लबाड माणूस त्या सज्जनाला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला. सज्जनाने पुन्हा पैशाची मागणी केली. तेंव्हा तो लबाड माणूस म्हणाला की, तू आता तुझ्या गंभीर आजारामुळे लवकरच वर जाणार आहेस. तू वर गेल्यावर तुझ्या मागून मीही काही काळानंतर वर येईन आणि वर येताना तुझे पैसे नक्की वर घेऊन येईन. अशी बेरकी माणसे समाजात भरली आहेत. तेंव्हा कोणताही व्यवहार करताना जरा जपून! -बाळू वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा