https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ६ मे, २०२५

आणि तिथेच गडबड झाली!

आणि तिथेच गडबड झाली!

लिगल ड्राफ्टस आता कोणालाही आॕनलाईन सहज फुकट मिळतात. म्हणजे औषधे बाजारात फुकट मिळण्यासारखे हे झालेय. फक्त कोणते औषध कोणत्या आजारावर व किती प्रमाणात द्यायचे हे जसे डॉक्टरांना माहित असते तसेच कोणते लिगल ड्राफ्टिंग कोणत्या केसला कसे करायचे हे फक्त वकिलाला कळते. ते सगळं मला चांगले कळते कारण माझी ३७ वर्षाची लॉ प्रॕक्टिस आहे. पण आता या उतार वयात असे हमखास फी देणारे क्लायंटस कुठे शोधत बसायचे हा प्रश्न आहे. कोर्टात जाऊन बसावे तर तिथे तरूण कनिष्ठ वकील मला सिनियर असल्यासारखे वागतात कारण माझी लॉ प्रॕक्टिस कंपन्यांचा कायदा सल्लागार म्हणून आहे, कोर्ट प्रॕक्टिशनर म्हणून नाही व आता उतार वयामुळे, हार्ट ब्लॉकच्या आजारपणामुळे व डोंबिवली ते मुंबई लांब अंतरामुळे कंपनी क्लायंटस मिळत नाहीत व मुंबई सारखे कल्याण, डोंबिवलीत महिना व्यवस्थित फी देणारे क्लायंटस मिळत नाहीत. म्हणून तर मी गेली अनेक वर्षे मुंबईला जात होतो. पण हार्ट ब्लॉकचा त्रास वाढला व मुंबईला दररोज संध्याकाळी लोकलमधून जाणे अशक्य झाले. आणि त्यानेच मोठी गडबड केली सुरळीत चाललेल्या माझ्या आयुष्यात.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.४.२०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा