सुखाचा गर्व करून दुःखाची चेष्टा करू नका!
घटस्फोट हा तरूणपणातला असो की म्हातारपणातला तो एक अत्यंत दुःखदायक अनुभव असतो. अशा दुःखावर अर्धवट माहितीवर कोणीही स्वतःचा निष्कर्ष काढून अशा दुःखी वेदनेवर मीठ चोळू नये. तुम्ही सुखी आहात सुखी रहा पण दुसऱ्याचे दुःख कमी करता येत नसेल तर त्याच्या दुःखाची कृपया चेष्टा तरी करू नका. हे एखाद्याच्या व्यंगावर बोट ठेवून त्यावर हसण्यासारखे आहे. आणि हो प्रत्येकाला स्वतःचे सुख समाज माध्यमावर शेअर करण्याचे जसे मूलभूत स्वातंत्र्य आहे तसे स्वतःचे दुःखही समाज माध्यमावर व्यक्त करण्याचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. कोणीतरी सहानुभूती दाखवून मदत करावी असा वैयक्तिक दुःख व्यक्त करण्याचा हेतू नसून दुःखी भावनांचा कुठेतरी निचरा व्हावा असाही उद्देश असू शकतो. स्वतःच्या सुखाचा गर्व करून दुसऱ्याच्या दुःखाची चेष्टा करू नका. कोणाचे दिवस कसे व कधी फिरतील हे सांगता येत नाही.
-©ॲड.बी.एस.मोरे, ९.५.२०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा