गीतोपदेश!
महाभारत के गीतोपदेश में भगवान श्रीकृष्ण ने अर्जुन को धर्म और कर्तव्य के बारे में उपदेश दिए थे. ये उपदेश जीवन का असली सूत्र हैं.
महाभारत गीतोपदेश के कुछ उदाहरण:
भूत और भविष्य की चिंता करना व्यर्थ है, वर्तमान ही सत्य है.
जब असमंजस की स्थिति में रहो और कुछ समझ ना आए तो सब परमात्मा पर छोड़ दो और बस अपना कर्म करो.
परिस्थितियां कितनी भी बुरी क्यों न हों, यही सोचो कि समय सबसे बड़ा बलवान है.
अच्छा हो या बुरा, बीत जाएगा.
गीता के बारे में ज़्यादा जानकारी:
महाभारत का सबसे महत्वपूर्ण उपदेशात्मक खंड भगवद गीता है.
कुरुक्षेत्र के मैदान में भगवान श्रीकृष्ण ने अर्जुन को 18 दिन गीता का ज्ञान दिया था. महाभारत में श्रीकृष्ण और अर्जुन के ये संवाद जीवन का असली सूत्र हैं.
महाभारत के बारे में और जानकारी:
महाभारत ग्रंथ में कुल 18 अध्याय हैं. महाभारत की कथा को 24,000 श्लोकों के एक छोटे संस्करण से विस्तारित किया जाता है, जिसे केवल भारत कहा जाता है.
महाभारत ग्रंथ में कुल 18 अध्याय हैं। भगवान श्री कृष्ण ने कुरुक्षेत्र के मैदान में अर्जुन को 18 दिन गीता का ज्ञान दिया था। महाभारत का युद्ध भी 18 दिन तक चला था।
'महाभारत' का सबसे महत्वपूर्ण उपदेशात्मक अंश कौन-सा है?
महाभारत का सबसे मह्वतपूर्ण उपदेशात्मक खंड भगवद गीता है, जिसमें भगवान कृष्ण द्वारा अर्जुन को धर्म और कर्तव्य के बारे में दी गई सलाह शामिल है।
गीतोपदेशः
(१) प्रजहानि यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान्, आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते!
भगवद् गीता, अध्याय २, श्लोक ५५
हे पार्था, मनाने रचल्याने उत्पन्न झालेल्या सर्व इंद्रियांच्या इच्छा मनुष्य जेव्हा टाकून देतो आणि जेव्हा त्याच्या चित्ताला केवळ आत्म्यामध्येच संतोष आढळतो तेव्हा तो दैवी चैतन्याने युक्त झाला किंवा स्थितप्रज्ञ झाला असे म्हटले जाते.
(२) न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः, माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिता!
भगवद् गीता, अध्याय ७, श्लोक १५
प्रकृति (निसर्ग/कुदरत/Nature) ही जरी शक्तिशाली असली तरी तिला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही. प्रकृति पूर्णपणे परमेश्वराच्या सत्तेखाली काम करते. सर्व चलायमान विश्व ही परमपुरूषाची/परमेश्वराची प्रत्यक्षात आणलेली कल्पना होय. अर्थात भौतिक विश्वाचा/प्रकृतिचा आध्यात्मिक (सर्वशक्तिमान) केंद्र बिंदू हा निर्गुण निराकार परमात्मा, परमेश्वर (निर्गुण ब्रम्ह) होय. हे ज्यांना कळत नाही ते प्रकृतिच्या मायेने नास्तिक बनतात.
(३) अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः, परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्! (भगवद गीता, श्लोक २४, अध्याय ७)
हे अर्जुना, जे लोक मला नीट जाणत नाहीत ते निरनिराळ्या देवदेवतांत मला पाहतात व स्वतःच्या विषय वासनांच्या तात्कालिक परिपूर्ती साठी निरनिराळ्या देवदेवतांची उपासना करतात व त्या तात्कालिक समाधान देणाऱ्या उपासनांच्या कर्मकांडात संतुष्ट होतात. म्हणून जे परम परमात्म्याचे भक्त नाहीत त्यांना असे वाटते की त्यांचे विशिष्ट भौतिक विषय वासनेचे उद्दिष्ट सिद्धीस जाण्यासाठी परमात्मा परमेश्वरापेक्षा देवदेवता अधिक श्रेष्ठ असतात. अशा मूर्ख लोकांना त्यांच्या अल्प ज्ञानामुळे माझे अविनाशी, परम उत्तम असे श्रेष्ठ स्वरूप माहित होत नाही.
निरनिराळ्या देवदेवता ही त्या सर्वश्रेष्ठ परमात्म्याचीच विविध गुणांनी युक्त अशी विविध रूपे आहे पण त्यांची शक्ती त्यांच्या विशिष्ट गुणांपुरतीच मर्यादित आहे. जसे की लक्ष्मी ही आर्थिक समृद्धीची देवता आहे, सरस्वती ही ज्ञान व कलेची देवता आहे तर गणपती ही बुद्धीची देवता आहे. या देवतांच्या भक्तांची कामनापूर्ती सर्वश्रेष्ठ परमेश्वरच या देवतांच्या माध्यमातून करीत असतो पण हे ज्ञान अशा भक्तांना नसल्याने ते केवळ अशा देवतांनाच अंतिम सत्य मानू लागतात. अशा भक्तांची आध्यात्मिकता ही त्यांच्या भौतिक स्वार्थाकडे जास्त झुकलेली असते. त्यांना सर्वश्रेष्ठ परमेश्वराचे अंतिम सत्य कळत नाही.
सातव्या अध्यायातील या २४ क्रमांकाच्या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण मर्यादित फळे देण्याची मर्यादित शक्ती असलेल्या विविध देवदेवतांविषयी बोलत आहेत व या सर्वांहून सर्वश्रेष्ठ व सर्वशक्तिमान एकमेव परमात्मा परमेश्वर आहे हे अर्जुनाला समजावून सांगत आहेत. विविध देवदेवतांच्या नवस, उपवास वगैरे कर्मकांडांमागील लोकांच्या भौतिक स्वार्थाचे संकुचित अध्यात्म श्रीकृष्णाने सातव्या अध्यातील या २४ क्रमांकाच्या श्लोकातच उलगडून दाखवले नाही तर त्याबरोबर श्लोक क्रमांक २०, २१, २२, २३ व २५ या श्लोकांतूनही उलगडून दाखवले आहे.
ज्याप्रमाणे सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात त्याप्रमाणे सर्व देवदेवता परमात्म्याला शरण जातात व त्याच्याकडूनच त्यांची मर्यादित शक्ती घेतात.
परमात्मा (सर्वश्रेष्ठ परमेश्वर) केवळ मूर्तीमध्ये, केवळ तीर्थक्षेत्रांत नसून कणाकणात आहे हे केवळ ज्ञानी भक्त जाणतात.
-ॲड.बी.एस.मोरे, भगवद् गीता अभ्यासक, १५.४.२०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा