https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ६ मे, २०२५

टाळी एका हाताने वाजत नाही!

टाळी एका हाताने वाजत नाही!

लोकशाहीत उद्योगपती, प्रशासन व राजकारणी मंडळी भ्रष्ट होणे हे तर भयंकर आहेच, पण नागरिक स्वतःच भ्रष्ट होणे ही त्याहून भयंकर गोष्ट आहे; कारण टाळी एका हाताने वाजत नाही!

लोकशाही ही केवळ एक राज्यपद्धती नसून ती एक सहभागाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत शासन, प्रशासन, उद्योगपती आणि सामान्य नागरिक — सर्वांचे योगदान महत्वाचे असते.
जेंव्हा आपण भ्रष्टाचाराविरोधात बोट दाखवतो, तेंव्हा एक गोष्ट विसरून चालणार नाही — उरलेली चार बोटं आपल्याकडेच वळलेली असतात.

आज प्रशासन, राजकारण वा व्यावसायिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराबद्दल समाजात तीव्र नाराजी आहे, पण नागरिक म्हणून आपणही स्वतःला तपासून पाहायला हवे —
आपण सिग्नल तोडतो, शंभर रुपये देऊन पोलिसाकडून माफी मागतो, झपाट्याने काम व्हावे म्हणून कोणालातरी लाच देतो, चुकीची माहिती देऊन अनुदान घेतो — हे सगळे काही या भ्रष्ट संस्कृतीचा भागच नव्हे का?

लोकशाहीत सत्ताधारी भ्रष्ट झाले तर ती यंत्रणा कुजते, पण नागरिकच भ्रष्ट झाले तर मूल्यव्यवस्थाच नष्ट होते!

आपण स्वतः शुद्ध राहिलो, तरच व्यवस्थेची शुद्धी शक्य आहे. कारण...
"टाळी एका हाताने वाजत नाही!"

-©ॲड.बी.एस.मोरे, २०.४.२०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा