https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १७ मे, २०२५

देवाला रिटायर करा?


देवाला रिटायर करा हा डॉ. श्रीराम लागूंचा नास्तिक विचार व मी!

लांडग्यांच्या कळपातला माणूस लांडग्यांच्या कळपातच म्हणजे जंगलातच कायम का राहिला नाही? तो जंगली विचारातून बाहेर पडून हळूहळू मूलभूत भौतिकतेपासून थोडा अलग होत उच्च आध्यात्मिक विचार करू लागला कारण त्याला निसर्गानेच उत्क्रांती प्रक्रियेतून सर्वात उच्च पर्यावरणीय पातळीवर, अन्नसाखळीच्या अगदी टोकावर आणून सोडले होते. त्याला परमेश्वराचे देवत्व गवसले किंवा आध्यात्मिक नैतिकता कळली ती या टोकावर (on top of ecological pyramid) आणि मग माणसाला निसर्गातला परमेश्वर व विज्ञानातला आध्यात्मिक धर्म कळला. त्यामुळे परमेश्वर ही खुळचट अंधश्रद्ध कल्पना हे डॉ. श्रीराम लागूंचे म्हणणे म्हणजे लांडग्यांच्या कळपातले म्हणणे. कायद्यातून आध्यात्मिक नैतिकता बाजूला काढली गेली व कायदा भ्रष्ट झाला तो डॉ. श्रीराम लागूंसारख्या याच नास्तिक विचारांनी. खरं तर निदान माणसांसाठी तरी भौतिक विज्ञानाचे व सामाजिक कायद्याचे अधिष्ठान चैतन्यशक्ती परमेश्वर असायला हवे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.५.२०२५ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा