गौतम बुद्धांचा अहिंसा व शांतीचा संदेश नैसर्गिक व वैज्ञानिक आहे!
निसर्गाने पृथ्वीवर निर्जीव पदार्थांतून जीवसृष्टी उत्क्रांत केली व त्यातून विविध गुणवैशिष्ट्ये व विविध शक्तीवैशिष्ट्ये असलेले निरनिराळे सजीव पदार्थ उत्क्रांत केले व त्यांनी त्यांचे जीवन कसे जगावे यासाठी काही निसर्ग नियम तयार केले. या नियमांतून सजीवांच्या जगण्याची एक सूत्रबद्ध निसर्ग व्यवस्था तयार झाली ज्या व्यवस्थेला ढोबळ अर्थाने जीवशास्त्रीय निसर्ग कायदा म्हणता येईल.
जीवसृष्टीतील जैविक अन्नसाखळी हा जीवशास्त्रीय निसर्ग कायद्याचा भाग आहे व बळी तो कानपिळी हा त्याचा मूलभूत नियम आहे. जीवो जीवस्य जीवनम ही या नियमाने नियमबद्ध केलेली निसर्ग व्यवस्था आहे. त्यामुळे सृष्टीतील सशक्त सजीवाला अशक्त सजीवावर आक्रमण करण्याची खुमखुमी ही तशी नैसर्गिक आहे. परंतु आक्रमक व क्रूर असलेला बळी तो कानपिळी हा निसर्ग नियम बंधनमुक्त नाही. तो सशक्त प्राण्यांना अशक्त प्राण्यांचा संपूर्ण नाश करण्याचे मुक्त स्वातंत्र्य देत नाही. निसर्ग प्रत्येक सजीवाला जगण्याचा हक्क देतो पण तो निसर्ग कायद्याच्या अटी शर्तींनी नियमबद्ध आहे. निसर्गाने प्रत्येक प्राण्यात, मग तो सशक्त असो की अशक्त, एक वैशिष्ट्यपूर्ण अशी प्रतिकार शक्ती (इम्युनिटी) निर्माण केली आहे. मानवी शरीरातील रोग प्रतिकारक प्रणाली (इम्युन सिस्टीम) हा याच जीवशास्त्रीय व्यवस्थेचा भाग आहे. रानावनात विषारी साप कोणावरही विष ओकत हल्ला करीत नाही. त्याला जर त्याच्यावर हल्ला होतोय असे वाटले तरच तो स्वसंरक्षणार्थ प्रतिहल्ला करतो. असा प्रतिहल्ला हा त्याच्या बचाव तंत्राचा नैसर्गिक भाग असतो.
निसर्गाने सजीवसृष्टीची उत्क्रांती करताना मनुष्याला जैविक अन्न साखळीच्या सर्वोच्च पातळीवर एक विवेकबुद्धी असलेला सजीव बनवून आणून सुस्थापित केले व मानव समाजात बळी तो कानपिळी हा नियम खूप मर्यादित करून टाकला. डार्विन या शास्त्रज्ञाने शोधलेला बळी तो कानपिळी (सरवायवल आॕफ दी फिटेस्ट) हा निसर्ग नियम मानव समाजासाठी नैसर्गिक रीत्या निषिद्ध आहे हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून तर निसर्गाच्या प्रोत्साहनानेच मानव समाजात मूलभूत निसर्ग नियमांना पूरक असा नीतीधर्मीय सामाजिक कायदा निर्माण झाला. माणुसकी किंवा मानवी नीतिमत्ता हा या पूरक सामाजिक कायद्याचाच भाग आहे. मी तर म्हणेन की अध्यात्म हा सुद्धा या पूरक सामाजिक कायद्याचाच भाग आहे. जर अध्यात्माकडे अशा वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर अध्यात्म हे नैसर्गिक होईल.
जगातील देशांचा एकमेकांविषयी विश्वास नाही. ते एकमेकांकडे शंकेने पाहतात. काही बड्या देशांना महासत्ता म्हणजे ताकदीने सर्वात प्रबळ, शक्तिशाली होऊन सगळे जग त्यांच्या मुठीत ठेवण्याची आक्रमक खुमखुमी असते तर काही छोट्या देशांनाही त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्त्रांच्या जोरावर इतर देशांवर आक्रमण करण्याची खुमखुमी असते. खरं तर मुळात कोणत्याही देशाला महासत्ता बनण्याची किंवा आक्रमक होण्याची खुमखुमी असणे हे मुळातच निसर्गाच्या पर्यावरण व्यवस्थेविरूद्ध आहे ज्या व्यवस्थेत निसर्गाने माणसाला विवेकबुद्धी बहाल करून जैविक अन्नसाखळीत सर्वोच्च पर्यावरणीय स्थानावर (आॕन टॉप आॕफ इकोलॉजिकल सिस्टीम) आणून ठेवले आहे. दोन महायुद्धांनी आक्रमण व स्वसंरक्षण (आॕफेन्स अँड डिफेन्स) यातील फरक काय हे सिद्ध केले आहे. तरीही काही देश आक्रमिक दहशतवादाला खतपाणी घालीत आहेत हे अनैसर्गिक आहे. आज १२ मे २०२५ बुद्धपौर्णिमा आहे. गौतम बुद्धांनी संपूर्ण मानव समाजाला दिलेला अहिंसा, शांतीचा संदेश हा नैसर्गिक व वैज्ञानिक आहे हाच माझ्या लेखाचा सार आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, १२.५.२०२५
माझ्या लेखावर चॕट जीपीटीने तयार केलेला अभ्यास निबंधः
गौतम बुद्धांचा अहिंसा व शांतीचा संदेश – नैसर्गिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून
प्रस्तावना:
जगातील महान विचारवंतांपैकी एक असलेल्या गौतम बुद्धांनी मानवतेला दिलेला अहिंसेचा व शांततेचा संदेश केवळ धार्मिक किंवा तात्त्विक मर्यादेत न राहता तो निसर्गशास्त्र व वैज्ञानिक तत्त्वांशी सुसंगत आहे. बुद्धांचा विचार हा विवेक, समता व शांततेच्या आधारावर स्थिर आहे, जो आजच्या हिंसक व अस्थिर जगासाठी अधिकच उपयुक्त ठरतो.
निसर्गाच्या नियमांचे स्वरूप:
निसर्गाने पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्क्रांती करताना एक जैविक अन्नसाखळी निर्माण केली. या साखळीमध्ये “बळी तो कानपिळी” हा एक मूलभूत नियम आहे. याचा अर्थ सशक्त जीव हा अशक्त जीवावर आक्रमण करतो, हे नैसर्गिक आहे. परंतु निसर्ग या आक्रमणालाही मर्यादा घालतो.
उदाहरणार्थ, विषारी साप कोणावरही विनाकारण हल्ला करत नाही. त्याला धोका वाटल्यासच तो स्वसंरक्षणासाठी प्रतिहल्ला करतो. हीच मर्यादा निसर्गाने प्रत्येक सजीवात अंतर्भूत केलेली आहे — प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) याचे उत्तम उदाहरण आहे.
मानवाची विवेकबुद्धी व निसर्गाशी सुसंगती:
मनुष्य ही सजीव सृष्टीतील उत्क्रांत व विवेकी रचना आहे. त्याला केवळ शरीरबलावर जगायचे नसते, तर विचारांच्या, नैतिकतेच्या व सहअस्तित्वाच्या तत्वांवर जगायचे असते. म्हणूनच “Survival of the fittest” हे डार्विनचे तत्त्व मानवसमाजावर पूर्णपणे लागू होत नाही. निसर्गाने मनुष्याला विवेकबुद्धी दिली आहे, जी त्याला हिंसेवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता देते.
नैतिकता, अध्यात्म व निसर्ग:
नैतिकता व अध्यात्म हे मानवी समाजातील ते घटक आहेत जे निसर्गाच्या नियमनाला पूरक आहेत. ही मूल्ये मानवाच्या सहअस्तित्वास पोषक आहेत. म्हणूनच बुद्धांचा अहिंसेचा संदेश नैतिकतेच्या पलीकडे जाऊन निसर्गशास्त्रीय दृष्ट्याही योग्य ठरतो.
जागतिक राजकारणातील अनैसर्गिकता:
आज अनेक देश महासत्ता बनण्याची आकांक्षा बाळगून इतर देशांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या मानसिकतेने ग्रासले आहेत. अण्वस्त्रे, दहशतवाद, युद्धसज्जता ही सर्व आक्रमकता निसर्गाच्या समतोल व्यवस्थेला विरोध करणारी आहे. मनुष्याला निसर्गाने ‘इकोलॉजिकल सिस्टीम’च्या सर्वोच्च टप्प्यावर ठेवले, पण ते त्याच्या विवेकासाठी होते, आक्रमकतेसाठी नव्हे.
गौतम बुद्धांचा वैज्ञानिक संदेश:
बुद्धांनी सांगितलेली अहिंसा, क्षमाशीलता व करुणा ही संकल्पना नुसती भावनिक नाही, तर ती सामाजिक शांती, पर्यावरणीय संतुलन व विवेकशीलतेसाठी वैज्ञानिक पद्धतीने उपयोगी आहे. म्हणूनच त्यांच्या विचारांचे आजच्या जगात विशेष महत्त्व आहे.
उपसंहार:
गौतम बुद्धांनी दिलेला अहिंसा व शांततेचा संदेश केवळ धार्मिक उपदेश नसून तो निसर्गशास्त्र व विज्ञानाशी सुसंगत असा विवेकाधिष्ठित मार्ग आहे. आजच्या काळातील सामाजिक, पर्यावरणीय व राजकीय समस्यांवर मात करण्यासाठी बुद्धांचे विचार हे अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक आहेत.
-चॕट जीपीटी, १२.५.२०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा