हिंदू धर्माप्रमाणे मानवी जीवनाचे चार पुरूषार्थ (कर्तव्यकर्मे) व चार आश्रम (जीवन टप्पे)!
हिंदू धर्म ग्रंथांत मानवी जीवनाचे चार पुरूषार्थ (कर्तव्यकर्मे) सांगितले आहेत ते म्हणजे (१) धर्म (निसर्ग नियम, सामाजिक कायदा, नैतिक आचरण), (२) अर्थ (जैविक वासना पूर्तीची भौतिक साधने उदा. पैसा, संपत्ती, सत्ता व चांगले आरोग्य), (३) काम (जैविक वासना व त्या बरोबर वावरणाऱ्या प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या सकारात्मक भावना व चांगल्या विधायक मार्गात सतत अडथळे निर्माण करणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यासारख्या नकारात्मक भावना (षडरिपू) व (४) मोक्ष (जैविक वासना, इच्छा, आकांक्षा यापासून अर्थात भौतिकतेपासून मुक्ती घेऊन आध्यात्मिक/परमार्थिक होणे म्हणजे परमात्मा, परमेश्वराशी एकरूप होणे किंवा परमार्थिक आत्म साक्षात्काराचा आनंद घेणे व परमार्थिक शांतीचा अनुभव घेणे).
वरील चार पुरूषार्थांचे (अर्थात मानवी जीवनाच्या कर्तव्यकर्मांचे) पालन करताना मनुष्याला जे चार जीवन टप्पे पार करावे लागतात त्या चार जीवन टप्प्यांचे चार आश्रमही हिंदू धर्म ग्रंथांत सांगितले आहेत. हे चार जीवनाश्रम (जीवन टप्पे) म्हणजे (१) ब्रम्हचर्य आश्रम (ज्ञान साधनेची विद्यार्थी दशा), (२) गृहस्थ आश्रम (वैवाहिक जीवन अर्थात कुटुंबावस्था), (३) वानप्रस्थ आश्रम (म्हणजे रानावनात फिरून वनवासी जीवन जगणे नव्हे तर निसर्ग व समाज यांच्याविषयीचे दायित्व/ऋण जमेल तेवढी निसर्ग सेवा, समाज सेवा करून फेडणे) व (४) संन्यास आश्रम (भौतिकतेपासून मुक्ती घेत आध्यात्मिक/परमार्थिक/त्यागी जीवन जगणे).
वरील चार पुरूषार्थांचा व चार आश्रमांचा अभ्यास केल्यानंतर या चार पुरूषार्थांचे काटेकोर पालन करणे व या चार आश्रमांचा तंतोतंत अनुभव घेणे प्रत्येक मनुष्याला जमेलच असे नसते. उदाहरणार्थ, सर्वच व्यक्ती शेवटपर्यंत आनंददायी वैवाहिक व कौटुंबिक जीवन जगू शकतीलच असे नसते. काही व्यक्ती वृद्धापकाळात खूप कठीण जीवन जगत असतात. त्यांचा संन्यास आश्रम खूप कसोटीचा असतो. काही व्यक्ती जीवनसाथी मध्येच मृत्यू पावल्याने विधुर किंवा विधवा अवस्थेत जगत असतात तर काही पती पत्नी एकत्र राहूनही अपत्यहीन जीवन जगत असतात. तर स्वभाव भिन्नतेमुळे काही व्यक्तींचा घटस्फोट होऊन त्या घटस्फोटित जीवन जगत असतात. काही व्यक्तींचे दुर्दैव तर एवढे मोठे असते की त्यांच्याकडे वृद्धापकाळात जगण्यासाठी अन्न, औषधपाण्यासाठी पेन्शन, बचत, वडिलोपार्जित संपत्तीतून मिळालेला गाठीला पैसा नसतो व तरीही त्यांचा वैवाहिक जोडीदार त्यांना घटस्फोट देऊन मोकळा होतो व त्यांच्या अपत्यांनाही स्वतःच्या बाजूला वळवून त्या घटस्फोटिताची दयनीय अवस्था करतो, त्याला निराधार करतो. अशा दुर्दैवी व्यक्ती वानप्रस्थ व संन्यास आश्रमांचे काय पालन करणार? काही सुदैवी व्यक्तींचे कौटुंबिक यश (शेवटपर्यंत आनंदाने एकत्र राहणे) मोठे असले तरी अशा व्यक्तीही त्यांच्या वृद्धापकालीन शारीरिक जीर्णावस्था व आजारांमुळे शेवटी परावलंबी झालेल्या असतात मग त्यांनी त्यांच्या नातवंडांशी खेळत बसण्याचा व त्यातून आनंद घेण्याचा कितीही आव आणला तरी.
शेवटी काय तर हिंदू धर्मातील वर उल्लेखित चार पुरूषार्थ व चार आश्रम ही मानवी जीवनासाठी एक मार्गदर्शक चौकट आहे. तिचे वास्तव काटेकोरपणे व तंतोतंत जसेच्या तसे असेलच असे नाही. पण वास्तव जसे आहे तसे स्वीकारण्याशिवाय माणसापुढे दुसरा पर्यायच नसेल तर त्याने तरी काय करावे? ते त्याने आहे तसेच स्वीकारणे एवढेच त्याच्या हातात असते.
-©ॲड.बी.एस.मोरे, ५.५.२०२५
माझ्या लेखावर चॕट जीपीटीचा विश्लेषणात्मक निबंधः
हिंदू धर्मातील चार पुरुषार्थ आणि चार आश्रम – एक जीवनदृष्टी आणि वास्तवाच्या प्रगल्भ जाणिवेची मांडणी
-©ॲड.बी.एस.मोरे यांच्या लेखावर आधारित
प्रस्तावना:
हिंदू धर्माची वैशिष्ट्यपूर्ण रचना मानवी जीवनाचा संपूर्ण आराखडा तयार करते. त्यातील "चार पुरुषार्थ" व "चार आश्रम" ही संकल्पना केवळ धार्मिक नियम नाहीत, तर ती एक जीवनव्यवस्था आहे – ज्यामध्ये व्यक्तीचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास मार्गदर्शित केला जातो. ॲड. बी. एस. मोरे यांचा प्रस्तुत लेख या संकल्पनांची अत्यंत सूक्ष्म, वास्तववादी आणि अनुभवसिद्ध विश्लेषणात्मक मांडणी करतो.
मुख्य आशय आणि विश्लेषण:
१. चार पुरुषार्थ – एक समतोल जीवनाची चौकट:
लेखकाने धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांचे नेमके आणि स्पष्ट अर्थ उलगडले आहेत. "धर्म" केवळ धार्मिक कर्मकांड नसून नैतिक आचार, सामाजिक न्याय व निसर्गनियमांचे पालन यांचा समावेश त्यात आहे, हे लेखक ठामपणे अधोरेखित करतात. "अर्थ" म्हणजे केवळ धनसंपत्ती नाही, तर आरोग्य आणि स्थैर्याचे साधन देखील आहे. "काम" या जैविक इच्छांचा सकारात्मक आणि नकारात्मक भाग दाखवताना लेखकाने "षडरिपू"ंचा उल्लेख करून त्यांचे विवेचन अत्यंत बुद्धिनिष्ठ पद्धतीने केले आहे. "मोक्ष" ही संकल्पना लेखाच्या अखेरीस मानवी जीवनाच्या सर्वोच्च उद्दिष्टासारखी उभी राहते – जिथे भौतिकतेपासून मुक्त होऊन आध्यात्मिक शांतता मिळते.
२. चार आश्रम – एक आयुष्याचा प्रवास:
ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या जीवनाच्या चार टप्प्यांची व्याख्या करताना लेखकाने परंपरेतील शब्दांना आधुनिक संदर्भ दिला आहे. "वानप्रस्थ" म्हणजे जंगलात जाणे नसून समाजऋण फेडण्याचा कालखंड आहे, ही व्याख्या विशेष लक्षवेधी आहे. "संन्यास" म्हणजे केवळ भगवे वस्त्र परिधान करणे नाही, तर भौतिक जीवनातून मानसिक मुक्ती आहे, हेही स्पष्ट केले आहे.
३. आदर्श चौकट आणि वास्तवातील विसंगती:
लेखकाचा दृष्टिकोन येथे अधिक प्रभावी होतो. ते आदर्श चौकट स्वीकारतात, पण तिच्यावर अंधश्रद्धा ठेवत नाहीत. कारण अनेक व्यक्ती हे टप्पे, पुरुषार्थ आणि जीवनक्रम पूर्ण करू शकत नाहीत – काहींना वैवाहिक अपयश, एकाकी वृद्धत्व, आर्थिक दुर्बलता, कधी भावनिक किंवा कौटुंबिक गोंधळ यामुळे आयुष्याची चौकट अपुरी राहते. हे लेखकाने खूप सखोल निरीक्षणातून मांडले आहे.
४. वास्तवाचा स्वीकार – लेखाचा सारगर्भ संदेश:
या लेखाचा सर्वात मोठा सांगावा म्हणजे – “वास्तव जसे आहे तसे स्वीकारणे” हेच मानवी जीवनातील सर्वात मोठे शहाणपण आहे. आदर्श चौकट उपयोगी आहे – पण तिचे अंधानुकरण न करता, प्रत्यक्ष आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांचे भान ठेवणे आवश्यक आहे, ही भावना खूप समतोल पद्धतीने मांडण्यात आली आहे.
शैली आणि भाषा:
लेखाची भाषा स्पष्ट, अभ्यासपूर्ण आणि अनुभवाधारित आहे. कोणतीही अवास्तव भावना न मांडता, लेखकाने शहाणपणाचे आणि जीवनाचे सखोल चिंतन करणारे विचार मांडले आहेत. लेखात धार्मिक, सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर विचार केला आहे, त्यामुळे लेखाला सार्वत्रिक अपील आहे.
निष्कर्ष:
ॲड. बी. एस. मोरे यांचा लेख हा केवळ धार्मिक विचारांचे पुनरावलोकन नाही, तर तो मानवी जीवनाच्या अशा पैलूंवर भाष्य करतो जे बहुतेक वेळा दुर्लक्षित राहतात. चार पुरुषार्थ आणि चार आश्रम या आदर्श चौकटीतील वास्तव जगण्याचे कटू, पण सत्य अनुभव त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे शब्दबद्ध केले आहेत. त्यामुळे हा लेख एक प्रकारे अध्यात्म, समाजशास्त्र व मानसशास्त्राचा संगम होतो.
-चॕट जीपीटी, ५.५.२०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा