या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे?
कवी मंगेश पाडगावकर यांच्या या कवितेतील शब्दरचना सुंदर आहे, मोहक आहे. कवी पाडगावकरांनी शब्दबद्ध केलेल्या या गीताला सुंदर आवाजात स्वरबद्ध केले गायक अरूण दाते यांनी तर चालबद्ध व संगीतबद्ध केले यशवंत देव यांनी. छान वाटते ही कविता वाचायला व हे गीत ऐकायला. मनुष्य जीवनाचा अर्थ व आनंद या कवितेत ठासून भरला आहे. पण खरंच या कवीच्या कवी कल्पनेनुसार मनुष्य जीवन एवढे सुंदर व एवढे आनंददायी आहे काय? मनुष्य जीवनाच्या वास्तविक कटू सत्याकडे ही कविता दुर्लक्ष करीत नाही काय? असे म्हटले की मग लोक मला नकारात्मक दृष्टिकोन असलेला मनुष्य म्हणून भरभरून नावे ठेवतात.
मनुष्य प्राणी जन्मला रे जन्मला की त्याच्या मागे जगण्याच्या प्रश्नांचा जो भडिमार सुरू होतो तो त्याच्या मृत्यू पर्यंत संपता संपत नाही. सोन्या चांदीचे चमचे तोंडात घेऊन जन्मलेली काही बाळे याला अपवाद आहेत. मनुष्याच्या जगण्याचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी अनेक वस्तू व अनेक सेवा मनुष्याने त्याच्या हुशार बुद्धिमत्तेच्या जोरावर निसर्गातून शोधून काढल्या असल्या तरी त्यांचीच एवढी रेलचेल झाली आहे की या विविध वस्तू व सेवांचाच एक दिवस उबग येतो. मरेपर्यंत माणूस अनेकविध वस्तूंचा ढिगारा घरात वाढवतच राहतो. हे एक भौतिक चळाचे वेड असते. माणूस मेल्यावर अशा साठवलेल्या कितीतरी वस्तू त्याच्या कुटुंबातील व्यक्ती भंगारात काढतात.
हे झाले वस्तूंचे. पण सेवांचे काय? विमा, बँकिग या सेवांबरोबर मग डॉक्टरांची वैद्यकीय सेवा, वकिलांची कायदा सेवा अशा कितीतरी सेवा मनुष्याने स्वतःच्या जगण्यासाठी निर्माण केल्या आहेत. शरीराचे अती लाड करायचे व मग डॉक्टरांचे खिसे भरायचे. इतकेच काय कितीतरी आजार असे आहेत की त्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नसते. शरीर आपल्याला नैसर्गिकपणे काही संकेत देत असते ते नीट न ओळखता व त्यासाठी आपल्या विश्वासू फॕमिली डॉक्टरची औषधे न घेता काही पैसेवाले रूग्ण पंचतारांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये असे दाखल होतात की जणू काही ते पिकनिकला चाललेत व वर रूबाब करून त्याचा टेंभाही मिरवतात. दुसरी गोष्ट आहे वकिलांच्या कायदा सेवेची. कितीतरी प्रश्न आपणच निर्माण करतो. ते सोडविण्यासाठी स्वतःची बुद्धी नीट वापरत नाही व स्वतःच समंजसपणे सोडवता येणारे हे प्रश्न वकिलाच्या ताब्यात देऊन टाकतो. मग कोर्टाची पायरी चढणे व वर्षानुवर्षे न्यायाची वाट बघत बसणे दुसरे काय? काही अत्यावश्यक बाबतीत पोलीस तक्रार, कोर्टबाजी ठीक पण क्षुल्लक गोष्टींसाठी सुद्धा जर माणसे पोलीस स्टेशन, वकील, कोर्ट गाठू लागली तर प्रश्न सहज सुटण्याऐवजी ते चिघळतात. पण लोकांना समजावून सांगणार कोण? खरं तर दोघांत एक व्यक्ती समंजस व दुसरी व्यक्ती आडमुठी असली तर तडजोड कठीण होते. क्षुल्लक कारणांचा बाऊ करून भांडणाऱ्या नवरा बायकोत याच स्वभाव भिन्नतेमुळे तडजोड अशक्य होते.
काही निसर्गाने निर्माण केलेल्या तर काही माणसांनीच निर्माण केलेल्या प्रश्नांच्या जाळ्यात मनुष्य असा काही अडकतो की विचारू नका. मग यावर उतारा म्हणून परमेश्वराचा धावा करा, त्याची जपमाळ ओढत बसा असे कोणतीही शास्वती किंवा निश्चिती नसलेले मृगजळी उपाय (आध्यात्मिक उपाय) काही माणसे सुचवतात. पण आध्यात्मिक जपाने प्रश्नांवर उतारा सापडला नाही की मग प्रारब्ध, नशीब, नियती वगैरे शब्द फेकून प्रश्नांच्या जाळ्यात सापडलेल्या माणसाला आणखी वेडे करून टाकतात.
खरं तर निसर्गाची भौतिकता ही एक चक्रव्यूही माया आहे तर परमेश्वराची आध्यात्मिकता ही एक मृगजळी माया आहे आणि या दोन्ही मायांचा मायावी पाश माणसाला मरेपर्यंत सुटता सुटत नाही. या दोन्ही मायांचा अनुभव घेतल्यानंतर मला तरी स्वतःला असे वाटते की जर खरंच पुनर्जन्म नावाची गोष्ट असेल तर मला पुन्हा हा मनुष्य जन्मच नको. मी किटक किंवा इतर कोणताही प्राणी होऊ दे व त्यांच्या चक्रातच गरागरा फिरू दे पण या चक्रात मला मनुष्य जन्म नको. कसले शतदा प्रेम करावे या मनुष्य जन्मावर, या मानवी जगण्यावर?
-©ॲड.बी.एस.मोरे, ११.४.२०२५
चॕट जीपीटी विश्लेषणः
आपल्या लेखाचे खालीलप्रमाणे मुद्देसूद विश्लेषण करता येईल:
लेखाचे शीर्षक:
"या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे?"
— प्रश्नवाचक आणि अंतर्मुख करणारे शीर्षक
१. प्रस्तावना व प्रेरणा:
कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेपासून सुरुवात.
गीताचा सौंदर्यपूर्ण अनुभव, परंतु वास्तव जीवनाच्या कटू सत्यावर प्रश्नचिन्ह.
२. वास्तवाचे भान:
जन्मानंतर सुरू होणारे संघर्ष:
सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील निरंतर समस्या.
"सोन्या-चांदीचे चमचे तोंडात घेणारे" अपवाद.
३. भौतिक जगात अडकलेला माणूस:
वस्तूंची न संपणारी जमवाजमव, अखेरीस भंगारात.
सेवा क्षेत्राचे विडंबनात्मक विश्लेषण:
वैद्यकीय सेवा: शरीर लाडावणे आणि खर्च वाढवणे.
कायदा सेवा: क्षुल्लक वादांचे वाढवलेले गांभीर्य.
४. समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला माणूस:
निसर्ग व मानवी निर्मित प्रश्नांची गुंतागुंत.
समाधानासाठी अध्यात्मिकतेचा आधार, परंतु परिणाम "मृगजळासारखा".
५. आध्यात्मिकता व भौतिकता यांचा मायावी पाश:
भौतिकता = चक्रव्यूह, अध्यात्म = मृगजळ.
दोन्हीही सुटता न येणारे जाळे.
६. निष्कर्ष:
वैयक्तिक अनुभवावर आधारित स्पष्ट मत:
पुनर्जन्म असेल तर मानवी जन्म नकोच.
इतर प्राणी म्हणून जन्मलेलो चालेल, पण माणूस नको.
पाडगावकरांच्या कवितेतील भावना वास्तवाशी विसंगत.
सारांश विश्लेषण:
लेखाचा स्वर: वास्तववादी, तिटकारा व्यक्त करणारा, अंतर्मुख करणारा.
दृष्टिकोन: अनुभवांवर आधारित ठाम मतप्रदर्शन, लोकप्रिय मतप्रवाहांपासून भिन्न.
भाषा: सुसंगत, थेट, विश्लेषणात्मक.
शैली: वैयक्तिक निरीक्षणे व सार्वत्रिक सत्य यांचा मेळ.
हे लेखन आत्मपरीक्षणात्मक असून समाजातील तथाकथित आदर्श आणि वास्तव यांच्यातील तफावत दाखवते. यामध्ये लेखकाच्या तत्त्वज्ञानात्मक आणि बंडखोर विचारांची ठसठशीत छाप आहे.
-चॕट जीपीटी, ११.४.२०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा