तेरे दर पे आया हूँ!
(१) निसर्गाचे प्रारूप काय तर देव, पण देवाचे प्रारूप काय? कोणाला देवाचे अस्तित्व साधु संतांत जाणवेल, तर कोणाला महामानवांत! पण निसर्ग काय किंवा देव काय, तो प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही. तरीही निसर्गापुढे किंवा देवापुढे किंवा एखाद्या महामानवाच्या मूर्तीपुढे आपण आपले मन व्यक्त करीत असतो.
(२) तुम्ही देवाला जे मागाल ते देव देतो असा समज आहे. पण त्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत ही देवाची अट असते. म्हणून तर "प्रयत्नांती परमेश्वर" ही म्हण रूढ झाली. लहानपणापासून मी देवाला ज्ञान मागायला सुरूवात केली. पण त्यासाठी सतत प्रयत्नही केले (अजूनही करतोय) आणि देवाने माझ्या झोळीत ते ज्ञान भरभरून टाकले. पैसा, सत्ता यांनी माझी झोळी भर असे मी देवाला मागितले नाही आणि मग देवाने मला त्या दोन्ही बाबतीत सतत मागेच ठेवले. माझ्या झोळीत ना पैसा दिला ना सत्ता दिली! या दोन्हीही गोष्टी माझ्या झोळीत नसल्याने त्या मी वाटूच शकत नाही. मग काय वाटायचे तर ज्ञान! ज्ञानाने भरलेली झोळी खाली नाही केली तर ज्ञानाच्या ओझ्याने ती फाटून जाईल म्हणून झोळी खाली करीत जायचे. तेच तर मी करतोय ना!
(३) १९७९ साली प्रदर्शित झालेल्या लैला मजनू या हिंदी चित्रपटात "तेरे दर पे आया हूँ, कुछ करके जाऊँगा, झोली भर के जाऊँगा, या मर के जाऊँगा" असे एका मशिदीत देवाला आर्त भावनेने आवाहन करणारे सुंदर गीत आहे. हे गीत गाताना तो नायक त्याची रिकामी झोळी त्याच्या प्रेयसीने भरण्याची प्रार्थना देवापुढे करतो. मी माझी झोळी ज्ञानाने भर अशी देवाला प्रार्थना केली आणि खरंच ती भरली व अजूनही भरतच आहे. मरण्यापूर्वी ती खाली केलीच पाहिजे. म्हणून या उतार वयात देवाला म्हणत असतो "तेरे दर पे आऊँगा, झोली खाली करके आऊँगा, नही तो कुछ ना पाऊँगा"!
-ॲड.बी.एस.मोरे©७.७.२०२०
तेरे दर पे आया हूँ!
तेरे दर पे आया हूँ
कुछ कर के जाऊँगा
झोली भर के जाऊँगा
या मर के जाऊँगा
तेरे दर पे आया हूँ IIधृII
तू सब कुछ जाने है हर
ग़म पहचान है
तू सब कुछ जाने है हर
ग़म पहचान है
जो दिल की उलझन है सब
तुझ पे रौशन है
घायल परवाना हूँ
वहशी दीवाना हूँ
घायल परवाना हूँ
वहशी दीवाना हूँ
तेरी शोहरत सुन सुन के
उम्मीदें लाया हूँ
मैं तेरे दर पे आया हूँ
कुछ कर के जाऊँगा
झोली भर के जाऊँगा
या मर के जाऊँगा
मैं तेरे दर पे आया हूँ II१II
दिल ग़म से हैरान है
मेरी दुनिया वीरान है
दिल ग़म से हैरान है
मेरी दुनिया वीरान है
नज़रों की प्यास बुझा
मेरा बिछड़ा यार मिला
अब या ग़म छुटेगा
वरना दम टूटेगा
अब या ग़म छुटेगा
वरना दम टूटेगा
अब जीना मुश्किल है
फरियादें लाया हूँ
तेरे दर पे आया हूँ
कुछ कर के जाऊँगा
झोली भर के जाऊँगा
या मर के जाऊँगा
तेरे दर पे आया हूँ II२II
फिल्मः लैला मजनू (1979)
गायकः महमद रफी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा