गेले ते दिवस, संपला तो आनंद!
मुंबईतील या इमारती वजा चाळी म्हणजे मराठी माणसांचा जीव! अनधिकृत झोपटपट्ट्यांत मराठी माणूस तसा कमीच. मुंबईत अनधिकृत झोपडपट्ट्या कोणी व कशा वाढवल्या, तिथे कोणाचा जास्त शिरकाव झाला व तिथे पुढे एस.आर.ए. योजना राबवण्यात आल्यावर त्या योजनेचा मुंबईतील मराठी माणसांना किती फायदा झाला हा इतिहास वेगळाच. मराठी माणूस हाच मुंबईतील खरा अधिकृत माणूस. मराठी माणसांच्या मुंबईतील या इमारती वजा चाळींतून मराठी माणसांची संस्कृती स्थिरावली, वाढली. मुंबईतील चाळींतील अधिकृत मराठी वास्तव्याला व संस्कृतीला ग्रहण लागले आणि मग मराठी माणूस मुंबई बाहेर वसई-विरार, कल्याण-बदलापूर, वाशी-खारघर अशा दूरच्या ठिकाणी लांब फेकला गेला. या मराठी चाळींत मित्रांच्या घरी जाऊन गणपती, दसरा, दिवाळी सणात भेटीचा जो आनंद मी घेतलाय त्याचे वर्णन करता येणार नाही. गेले ते दिवस, संपला तो आनंद!
-ॲड.बी.एस.मोरे©१०.९.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा