https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १२ जून, २०२४

वैचारिक मैत्री!

वैचारिक मैत्री!

चिकित्सक असणे म्हणजे अभ्यासू असणे ज्याचा उद्देश ज्ञान प्राप्ती हाच असतो. पण ज्ञानसागर एवढा मोठा आहे की जगात कोणीही सर्वज्ञानी होऊ शकत नाही. पण तरीही तरंगलांबी (वेवलेंग्थ) जमली तर अशी चिकित्सक, अभ्यासू माणसे एकमेकांशी चांगली वैचारिक मैत्री निर्माण करू शकतात. अशी माणसे कमी असतात व ती शोधून सापडत नाहीत. योगायोगाने संपर्कात येतात. त्यामुळे वैचारिक मैत्री ही तशी दुर्मिळच. मैत्री ही एक भावना आहे. ती जाणिवेतून अनुभवायची असते जसे प्रेम हे जाणिवेतून अनुभवायचे असते. पण जग नुसत्या भावनेवर चालत नाही. जगात स्वार्थ आहे व स्वार्थावर आधारित व्यवहार आहे. निःस्वार्थी प्रेम किंवा निःस्वार्थी मैत्री ही जगातील खूप दुर्मिळ गोष्ट. प्रेम असो की मैत्री, दोन्ही बाजूंनी सूर जुळणे महत्वाचे असते. विचार हे नेहमी व्यवहाराभोवतीच घुटमळत नाहीत. ते त्याही पलिकडे जाऊन जगाच्या कल्याणाचाही विचार करतात. वैचारिक मैत्रीत वैचारिक सूर जुळणे महत्वाचे असते. जर विचारच जुळले नाहीत तर नात्यात प्रेमाची किंवा मैत्रीची भावना निर्माण होणे जवळजवळ अशक्य असे माझे वैयक्तिक मत आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा