https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, ४ डिसेंबर, २०२३

आता बसा चिपळ्या वाजवत!

आता बसा चिपळ्या वाजवत!

अहो, हे माझे वाक्य नव्हे. तेलंगणा राज्यात काँग्रेस विजयी झाली पण उत्तरेकडील तीन राज्यांत भाजपने काँग्रेसला हरवले म्हणून भाजपच्या काहींनी काँग्रेसला काय सुनावले तर "आता बसा चिपळ्या वाजवत"! टी.व्ही. चॕनेलवर दररोज ही महान राजकारणी मंडळी एकमेकांना शिव्या घालतात आणि बातम्या बघाव्या म्हणून टी.व्ही. चालू केला की या राजकारण्यांची तोंडे बघून यांच्या शिव्या ऐकाव्या लागतात. यालाच जर कोणी राजकारण म्हणत असेल तर धन्य!

पण "आता चिपळ्या वाजवत बसा" हे काँग्रेसला भाजपच्या लोकांकडून सुनावले जाणे हा काँग्रेसचा अपमान नसून हा चिपळ्यांचा अपमान आहे असे मला वाटते. कारण चिपळी हे वाद्य देवाचे गुणगाण गाण्यासाठी वाजवले जाते. हरीभक्तीचा प्रसार व समाज प्रबोधन ज्या कीर्तनाद्वारे केले जाते त्या कीर्तनातील संगीताचा एक भाग म्हणजे कीर्तनकाराच्या हातातील चिपळ्या.

अध्यात्मात महत्वाच्या असलेल्या या चिपळ्या राजकारणात मात्र तुच्छ होतात इतके हे राजकारण गलिच्छ झाले आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा