https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

शिक्षण व कृतीचे कालचक्र!

शिक्षण व कृतीचे कालचक्र!

मूलभूत जैविक वासना व उदात्त भावना या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या नैसर्गिक प्रेरणा आहेत ज्या प्रेरणांचे समाधान करण्यासाठी मानवी बुद्धी सभोवतालच्या वातावरणातील पूरक घटकांचे अगोदर ज्ञान मिळवते व नंतर त्या घटकांवर ज्ञानाधारित प्रत्यक्ष कृती करते.

ज्ञानार्जन ही जशी बौद्धिक कृती आहे तशीच ज्ञानाधारित प्रत्यक्ष कृती हीही बौद्धिक कृती आहे. फरक हा की शिक्षण किंवा ज्ञानार्जन कृती ही फक्त मानसिक असते तर प्रत्यक्ष कृती ही मानसिक व शारीरिक असते.

वासना व भावना या दोन नैसर्गिक प्रेरणांच्या समाधानासाठी आवश्यक असलेल्या दोन कृती म्हणजे शिक्षण किंवा ज्ञानार्जन कृती व ज्ञानाधारित प्रत्यक्ष कृती या मूलतः बौद्धिक क्रिया आहेत. या दोन्ही बौद्धिक क्रिया जन्मापासून सुरू होऊन मृत्यूपर्यंत चालू राहतात. पण त्यांच्या विकासाची पातळी बालपण, तारूण्य व वृद्धावस्था या जीवनाच्या तीन टप्प्यांवर वेगळी असते व जोरही या तीन टप्प्यांवर वेगळा असतो!

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा