https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

विश्व चिकित्सा!

जाणीव/आकलन!

विश्वाच्या मूर्त (concrete), दृश्य रूपाची (दृश्यमान विश्व शरीराची) प्रत्यक्ष जाणीव/ आकलन व विश्वातील अमूर्त (abstract), अदृश्य प्रभावाची (अतर्क्य, गूढ विश्व मनाची) अप्रत्यक्ष जाणीव/आकलन मानवी शरीर इंद्रियांना व अंतर्गत मानवी मनाला एकदम होत नाही. ती प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाणीव, ते आकलन विश्वाच्या सूक्ष्म निरीक्षणातून, सखोल प्रायोगिक अभ्यासातून हळूहळू होते. याच निरीक्षण व अभ्यास प्रवासातून पुढे पुढे जात असलेला मी माझे काही अभ्यासपूर्ण निष्कर्ष, मते या समाज माध्यमावर मांडतो तेंव्हा अभ्यासाची आवड नसणारी किंवा अभ्यासाचा कंटाळा करणारी उथळ मनाची काही माणसे माझ्या अभ्यासपूर्ण पोस्टसवर अशा पोरकट प्रतिक्रिया देतात की त्यांना समजावून सांगण्याचा उपद्व्याप करण्यापेक्षा त्यांना सोडचिठ्ठी देण्यातच मी धन्यता मानतो!

-ॲड.बी.एस.मोरे©८.१०.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा