माझ्या बौद्धिक संपदेचा मालक मी स्वतः आहे!(मेरी बौद्धिक प्रापर्टी का मालिक मै खुद हूं!)
माझ्या लिखाणाचे कॉपी पेस्ट करताना लेखक म्हणून कोणी माझे नाव काढून तिथे स्वतःचे नाव टाकले तर खरंच माझी तळपायाची आग मस्तकात जाते. मी माझ्या लेखांवर माझे नाव व तिथे कॉपी राईट हक्काची © निशाणी लावतो. पण ती © निशाणी न बघता काहीजण खुशाल माझ्या लिखाणावरून माझे नाव काढून स्वतःचे नाव घालतात. हे जर माझ्या नजरेस आले तर मी अशा लोकांना उघडे करतो. खरंच, कॉपी करण्याचा यांना इतका मोह व्हावा!🙏🙏😢
एका व्हॉटसॲप ग्रूपवर हा कॉपी पेस्ट खेळ आज एकाने केला व मग मला त्याला चांगलेच झापावे लागले. तोच अनुभव इथे फेसबुकवर शेअर करतोय. तिथे हिंदी व इंग्रजीत संवाद झाला म्हणून थोडी हिंदी व इंग्रजी इथेही.
Admin please see this and warn against copy paste practice here at least in my original posts.🙏👏
मै बौद्धिक मेहनत करू और मेरी मेहनत कोई चुराकर कोई मेरे सामने ही मुझ पर राज करने की कोशिश करे तो मै कैसा चूप रहू? मै ऐसी गांधीगिरी नही करता. मेरी मेहनत, मेरा फल, बस्स! उसका क्रेडिट दुसरा कोई ले यह मै बरदाश्त नही कर सकता.
माझ्या वरील संताप कमेंटवर त्या ग्रूप मधील दुसऱ्या सभासदाने इंग्रजीत दिलेली ही सहमत प्रतिक्रिया.
Sir You are GREAT! I FULLY Agree with the contents and your attachments with literature actually in this regard . I request to put a note in the group that such copyright post should not be forwarded without the sender permission . Because it will not be justified without the permission of the sender it should not be forwarded so Admin kindly ensure it . 🙏🏻
हा अनुभव मी मुद्दामहून इथे फेसबुकवर शेअर करीत आहे जेणे करून अशा गोष्टी माझ्या बाबतीत तरी कोणी करणार नाही. मी माझ्या ज्ञानाला पैशापेक्षा जास्त किंमत देतो हे स्पष्ट करून माझी ही अनुभव कथा इथेच संपवतो.
-ॲड.बी.एस.मोरे©५.१०.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा