अध्यात्माची व्यवहार्यता?
निसर्गाच्या भौतिक विज्ञानात परमेश्वराच्या आध्यात्मिक धर्माची व्यवहार्यता मानवी बुद्धीला नगण्य वाटली तरी शेवटी मानवी बुद्धीला चांगुलपणाची उदात्त भावना चिकटलेली असल्याने या भावनेतून देवश्रद्धा निर्माण होते हे मान्य करावे लागेल. मानवी बुद्धीला ही उदात्त भावना चिकटली तेव्हाच निसर्गाच्या भौतिक विज्ञानाला परमेश्वराचा आध्यात्मिक धर्म चिकटला. असे भावनिक अध्यात्म ही मुळातच व्यवहाराची गोष्ट नसल्याने भौतिक विज्ञानातील आध्यात्मिक धर्माच्या व्यवहार्यतेविषयी बुद्धीने वाद घालणे हे चुकीचे. परंतु भावनाविवश होणे जसे चुकीचे तसे देवभोळे होणे हेही चुकीचे!
-©ॲड.बी.एस.मोरे, १७.२.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा