https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

मानवी विचार प्रक्रियेची मूलभूत रचना!

मानवी विचार प्रक्रियेची मूलभूत रचना!

दैनंदिन जीवनात व निसर्गसृष्टीत आपोआप होणाऱ्या काही गोष्टी  अनैच्छिक असतात. त्या विचार करण्यासाठी नसतात कारण त्यावर मानवी मेंदूमनाचे नव्हे तर निसर्गाचे प्रत्यक्ष नियंत्रण असते जे मानवी मेंदूच्या आवाक्याबाहेर असते.

मानवी मेंदूमन ऐच्छिक कृतीसाठी विचार करते जो विचार नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असतो. ऐच्छिक गोष्टींपैकी काही गोष्टी तात्पुरत्या अल्पकालीन ऐच्छिक कृतीसाठी असतात ज्यावर मेंदूमनाने वरवर तात्पुरता विचार करायचा असतो. त्यावर सखोल विचार करणे चुकीचे. पण काही ऐच्छिक गोष्टींवर मात्र मेंदूमनाला सखोल विचार करावा लागतो. अशा सागोष्टी दीर्घकालीन योजनाबद्ध ऐच्छिक कृतीसाठी असतात.

मानवी मेंदूमनाच्या विचार प्रक्रियेत वरील तीन गोष्टींची गल्लत करणे, त्यांची एकमेकांत भेळमिसळ करणे चुकीचे.

मानवी मेंदूमनाच्या वरील विचार प्रक्रियेतून वैद्यक शास्त्राच्या बाबतीत विचार केला तर असे दिसून येईल की काही सामान्य आजार तात्पुरत्या अल्पकालीन ऐच्छिक वैद्यकीय कृतीसाठी असतात जे नुसत्या औषधांनी बरे होतात तर काही गंभीर आजार दीर्घकालीन सखोल वैचारिक ऐच्छिक वैद्यकीय कृतीसाठी असतात ज्यांना औषधांबरोबर सर्जिकल ट्रिटमेंटची गरज पडू शकते.

मानवी मेंदूमनाच्या वरील विचार प्रक्रियेतून समाजशास्त्र व तसेच सामाजिक कायद्याच्या बाबतीत विचार केला तर असे दिसून येईल की माणसांनी माणसांवर केलेल्या काही सामान्य अन्यायांचे निरसन सामाजिक कायद्याचा सामान्य विचार करणाऱ्या शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेच्या पातळीवर करता येते तर काही गंभीर सामाजिक अन्यायांचे निरसन सामाजिक कायद्याचा सखोल विचार करणाऱ्या शासनाचा स्वतंत्र भाग असलेल्या न्याय यंत्रणेच्या पातळीवर करता येते.

वरील विश्लेषणातून मानवी विचार प्रक्रियेची मूलभूत रचना थोडक्यात सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.२.२०२४

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

संसार करावा नेटका!

संसार करावा नेटका!

पती, पत्नी व मुले यांच्या कौटुंबिक नात्यातील भावनिक व व्यावहारिक नात्याचे वास्तव फार उच्च दर्जाचे उदात्त आहे. वकील म्हणून मी पती पत्नीच्या केसेस मध्ये जास्तीतजास्त तडजोडीची भूमिका घेत आलोय. घटस्फोट ही मुलांसाठी भयंकर शिक्षा असते. मुलांनी सांगितलेले नसते त्यांना जन्माला घाला म्हणून. मुलांचा त्यात काय दोष? मुलांना जन्माला घालण्यापूर्वी अगोदर पती पत्नी दोघांनीही ते दोघे मुलांची जबाबदारी संयुक्तपणे पार पाडण्यासाठी मानसिक व आर्थिकदृष्ट्या समंजस व सक्षम आहेत का याचा सुज्ञपणे विचार केला पाहिजे. पती व पत्नी दोघेही उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या दोघेही कमावते व विशेष करून दोघेही करियर मांइडेड असल्यास त्यांनी तर याबाबतीत एकत्र बसून नीट विचार करूनच मुलाला किंवा मुलांना जन्म द्यायचा की नाही याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. विवाह व संसार हा काही खेळ नाही की मनात आले की खेळ मांडला व मनात आले की खेळ मोडला. जीवनशैली कितीही आधुनिक होवो, वैवाहिक बंधन हे खूप जबाबदारीचे बंधन असते. हे बंधन नको असलेले स्त्री पुरूष लिव इन रिलेशनशिपचा पर्याय निवडतात. मनात येईल तेव्हा एकत्र या व मनात येईल तेव्हा सोडून द्या असला विचित्र प्रकार. हे कसले स्वातंत्र्य? विवाह संस्था टिकली पाहिजे. समाजात तिचे महत्व खूप मोठे आहे. संसारात एकत्र राहता न येणारी माणसे देशाची एकता काय सांभाळणार? देश हे सुद्धा एक मोठे कुटुंब आहे. करियर वगैरे स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी पती किंवा पत्नीने कोणीच मुलांच्या जीवनाशी खेळू नये. संसार म्हटला की कोणावरही विशेष करून जन्माला घातलेल्या मुलांवर अन्याय होऊ न देणाऱ्या तडजोडी पती व पत्नी दोघांनाही कराव्या लागतात याचे भान विवाह बंधनात पडू इच्छिणाऱ्या स्त्री व पुरूष दोघांनाही असलेच पाहिजे. म्हणून केवळ विवाहोत्तर कौटुंबिक वादात नव्हे तर विवाहपूर्व निर्णय प्रक्रियेत सुद्धा विवाहोच्छुक स्त्री पुरूषांच्या समुपदेशनाची गरज आहे.

संसार करावा नेटका. संसारासारखे दुसरे सुख जगात नाही. विवाह बंधनात राहून एकमेकांना समजून घेत, एकमेकांना आधार देत मुलांची संयुक्त जबाबदारी घेऊन त्यांना शिक्षण देणे, त्यांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे हा फार मोठा सांसारिक आनंद आहे. त्यासाठी पती व पत्नी दोघांनीही करियर व संसार यांची सांगड घालत संतुलित तडजोडी कराव्यात व संसार नेटका, यशस्वी करावा. करियर मधील यशापेक्षा हे यश कितीतरी मोठे आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.२.२०२४


ताणमुक्ती म्हणजे संन्यास!

ताणमुक्ती म्हणजे संन्यास!

पुराव्याने सिद्ध झालेल्या व त्यामुळे मेंदूने वास्तव म्हणून स्वीकारलेल्या निसर्गाच्या गोष्टी म्हणजे विज्ञान. निसर्ग व विज्ञानाचा निर्माता म्हणून परमेश्वर नावाची एक अलौकिक ईश्वरी शक्ती निसर्ग व विज्ञानाच्या मुळाशी आहे असे मानवी मेंदूमनाने एकदा का गृहीत धरले की असे मेंदूमन परमेश्वराचा विचार करते. इतकेच नव्हे तर त्याला शरण जाऊन त्याची भक्ती, प्रार्थना करते. परमेश्वर किंवा ईश्वरी शक्ती कदाचित वास्तव असेल किंवा कदाचित वास्तव नसेलही अशी रास्त शंका मानवी मेंदूमनात येऊ शकते कारण परमेश्वर ही पुराव्याने सिद्ध करता न आलेली व सिद्ध करता न येणारी गोष्ट आहे व म्हणून ती अनाकलनीय गोष्ट आहे. त्यामुळे परमेश्वराला मानायचे की नाही आणि मानलेच तरी त्याचे भक्तीभावाचे अध्यात्म किती व कसे करायचे हा प्रत्येकाच्या मेंदूमनाचा प्रश्न आहे. या प्रश्नात समाजाचा आस्तिक धर्म लुडबूड करतो तेव्हा हा वैयक्तिक प्रश्न सामाजिक पातळी वर येऊन गंभीर होतो. इतका गंभीर की परमेश्वर व त्याच्या धर्माच्या नावाने हिंसा घडतात, रक्तपात होतो. खरं तर या वैयक्तिक निर्णय प्रक्रियेत समाजाने किंवा सरकारने लुडबूड करू नये. एखाद्याने नास्तिक म्हणून जगायचे व नास्तिक म्हणून मरायचे ठरवले तर अशा नास्तिक व्यक्तीने आस्तिकांच्या आध्यात्मिक भक्ती भावनेला दुखवू नये. तसेच आस्तिक लोकांनीही नास्तिकांच्या स्वतंत्र विचाराची खिल्ली उडवू नये. हा सुज्ञ विचार नास्तिक व आस्तिक दोन्ही समाज गटांकडून व्हायला हवा. खरं तर पुराव्याने सिद्ध करता न येणारा अनाकलनीय परमेश्वर, त्याचे भक्ती भावाचे अध्यात्म व त्याच्या विषयी निर्माण झालेला आस्तिक-नास्तिक वाद या गोष्टींना निव्वळ भावनिक प्रतिसाद दिल्यास मेंदूमनात ताण निर्माण होतो. असा ताण मेंदूमनात निर्माण होऊ नये म्हणून धार्मिक, आध्यात्मिक गोष्टींकडे वैज्ञानिक दृष्टीने व तर्कशुद्ध बुद्धीने बघितले पाहिजे. हा प्रतिसादाचा भाग झाला. परमेश्वराच्या अध्यात्मालाच काय पण निसर्गाच्या विज्ञानालाही तुम्ही किती आणि कसा प्रतिसाद देता यावर तुमचे मानसिक आरोग्य बरेच अवलंबून असते. निसर्गाचे विज्ञान असो की परमेश्वराचे अध्यात्म या गोष्टींपासून पूर्णपणे अलिप्त राहता येत नाही, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करता येत नाही, त्यांना पूर्णपणे टाळता येत नाही, त्यांच्यापासून पूर्ण मुक्ती किंवा संन्यास घेता येत नाही. पण त्यांना जास्त डोक्यावर घेतले की डोक्यावर ओझे वाढते. म्हणून मेंदूमनावरील त्यांचे ओझे कमी करून त्यांच्या ताणापासून मुक्ती मिळवता येऊ शकते. निसर्गाचे विज्ञान असो की परमेश्वरी अध्यात्म यांचे डोक्यावर (मेंदूवर) ओझे कधी निर्माण होते जेव्हा या गोष्टींना अती महत्व देऊन त्यांना जास्त डोक्यावर घेतले जाते तेव्हा. अर्थात या गोष्टींना जास्त प्रतिसाद दिल्यानेच त्यांचे ओझे मेंदूमनावर निर्माण होते व त्या ओझ्याचा ताण मेंदूमनावर वाढतो. खरं तर विज्ञान असो की अध्यात्म या गोष्टींना जेवढ्यास तेवढे महत्व व जेवढ्यास तेवढा प्रतिसाद दिल्यास मेंदूमनावर या गोष्टींचे ओझे, ताण वाढत नाही. या गोष्टींना जेवढ्यास तेवढा प्रतिसाद देऊन त्यांच्यापासून ताणमुक्त होणे म्हणजे त्यांच्यापासून संन्यास घेणे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.२.२०२४

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

स्वार्थी कंपूगिरी!

स्वार्थी गटबाजी, कंपूगिरीचे दुःख!

संपूर्ण जग, सृष्टी ही परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील जीवनचक्रात कालानुरूप वाढत्या वयानुसार थकलेल्या शरीराला तारूण्यातील शक्तीप्रमाणे कामाला जुंपता येत नाही व मरगळलेल्या मनाला बळेच उत्साही करता येत नाही. वृद्ध शरीर व मन ओढाताण सहन करू शकत नाही. वृद्ध माणसांची उपयुक्तता जगण्याच्या स्पर्धेत जगासाठी कमी झाल्याने त्यांची जगाशी व्यावहारिक देवाणघेवाण कमी होत जाते व त्यातून जगाशी संवादही कमी होत जातो. तरूण पिढी व वृद्ध पिढी यांच्यातील अंतर (जनरेशन गॕप) याच व्यावहारिक उपयुक्ततेच्या कारणावरून वाढत जाते. इतकेच काय वृद्धांचे वृद्धांशी संबंधही पूर्वी सारखे रहात नाहीत. त्यांच्यातील संवाद कमी होत जातात. शिवाय तरूण पिढीत जसे शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, वांशिक  किंवा जातीय अंतर असते ते अंतर पुढे वृद्धापकाळीही टिकून राहते. म्हणून तर उच्च शिक्षित शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, श्रीमंत उद्योगपती, बलवान राजकारणी, सेलिब्रिटी कलाकार व खेळाडू यांचे तरूणपणी बनलेले गट वृद्धापकाळीही कायम राहतात. त्यामुळे या पॉवरफुल लोकांचे ज्येष्ठ नागरिक संघ व सर्वसामान्य लोकांचे ज्येष्ठ नागरिक संघ वेगळे असतात. ही सामाजिक दरी वृद्धापकाळीही कायम राहते. आयुष्यभर गुंडगिरी केलेला गँगस्टर म्हातारा झाला तरी त्याची दहशत असतेच. त्यामुळे तो इतर वृद्ध माणसांच्या ज्येष्ठ नागरिक संघात नसतो. अर्थात मानवी स्वार्थ व त्यातून निर्माण झालेली गटबाजी, कंपूगिरी माणसांच्या म्हातारपणीही कायम राहते. स्वार्थ हेच मानवी दुःखाचे कारण आहे असा गौतम बुद्धांच्या चिंतनाचा निष्कर्ष आहे. स्वार्थी गटबाजी, कंपूगिरीचे हे दुःख म्हातारपणी मरणाच्या दारातही मानव समाजात कायम राहते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.२.२०२४

वास्तव!

विज्ञान तंत्रज्ञानाचे नैसर्गिक वास्तव व सामाजिक कायद्यातील नैतिक, आध्यात्मिक परमार्थ!

निर्जीव पदार्थांचे पदार्थ विज्ञान व रसायनशास्त्र, अर्धसजीव वनस्पतींचे वनस्पती शास्त्र, सजीव पशुपक्षी, माणसांचे प्राणी शास्त्र (वनस्पती शास्त्र व प्राणी शास्त्र मिळून बनते जीवशास्त्र) अशी पृथ्वीवरील सजीव, निर्जीव पदार्थांची व त्यांच्या निसर्ग शास्त्रे/विज्ञानांची सर्वसाधारण विभागणी पृथ्वीवर आढळून येते. यात माणसे व त्यांचे प्राणी शास्त्र थोडे हटके आहे कारण माणूस सर्व प्राण्यांत जास्त बुद्धिमान प्राणी आहे.

निसर्ग शास्त्रे/निसर्ग विज्ञाने ही विविध पदार्थांमधील भौतिक/नैसर्गिक देवाणघेवाणीची शास्त्रे/विज्ञाने होत. म्हणून या सर्वांना भौतिक शास्त्रे/भौतिक विज्ञाने असेही म्हणता येईल. परंतु निर्जीव पदार्थांमधील भौतिक/नैसर्गिक देवाणघेवाणीचे पदार्थ विज्ञान हेच तेवढे भौतिक शास्त्र/भौतिक विज्ञान ही व्याख्या चुकीची आहे. भौतिक शास्त्र/भौतिक विज्ञान व्यापक आहे. भौतिक विज्ञानात पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, वनस्पती शास्त्र, प्राणी शास्त्र ही सर्व शास्त्रे/विज्ञाने येतात.

पृथ्वीवरील सर्व सजीव, निर्जीव भौतिक पदार्थ व त्यांची सर्व भौतिक विज्ञाने (ज्यात स्त्री पुरूष लैंगिकता व माणसांचे पुनरूत्पादन यासारख्या मानवी प्राणी शास्त्राचाही भाग आला) यांची माणसा माणसांतील (आंतरमानवी) देवाणघेवाण हा खास वेगळा विषय आहे ज्याला समाजशास्त्र असे म्हणतात. हे आंतरमानवी समाजशास्त्र भौतिक विज्ञानाला जोडला गेलेला एक विशेष पूरक पर्यावरणीय भाग आहे. पण या पूरक पर्यावरणीय भागाला भौतिक विज्ञान म्हणणे चुकीचे होईल. पण मानवी समाजशास्त्राचा हा पूरक पर्यावरणीय भाग जैविक उत्क्रांतीच्या अगदी शेवटाला किंवा  टोकाला असल्याने कदाचित तो भौतिक विज्ञानापासून वेगळा वाटू शकतो. परंतु समाजशास्त्र हे काही फक्त माणसांपुरतेच मर्यादित नाही. सिंहासारखे प्राणी सुद्धा कळपाने राहतात व त्यांचे ही समाजशास्त्र असते व त्यांचाही सामाजिक कायदा असतो. फरक इतकाच की इतर प्राण्यांतील सामाजिक कायदा हा बळी तो कानपिळी या नियमावर आधारित असतो तर आंतरमानवी सामाजिक कायद्यात नैतिक भावना व विवेकबुद्धीचा संगम असतो.

भौतिक पदार्थ व त्यांच्या भौतिक विज्ञानांची आंतरमानवी/सामाजिक देवाणघेवाण नियंत्रित करणाऱ्या कायद्याला सामाजिक कायदा असे म्हणतात. भौतिक विज्ञानांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही तांत्रिक असते म्हणून त्याला तंत्रज्ञान म्हणतात. पण भौतिक पदार्थ, त्यांचे भौतिक विज्ञान व त्या भौतिक विज्ञानाचे तंत्रज्ञान या सर्वांच्या आंतरमानवी सामाजिक देवाणघेवाणीला तंत्रज्ञान म्हणणे चुकीचे होईल. ही सामाजिक देवाणघेवाण पूरक समाजशास्त्र व सामाजिक कायद्याचा विशेष भाग आहे. भौतिक विज्ञानाची प्रैक्टिस (अंमलबजावणी) तंत्रज्ञानाने केली जाते तर समाजशास्त्राची प्रैक्टिस  (अंमलबजावणी) सामाजिक कायद्याने केली जाते. मानवी मनाची नैतिक भावना व विवेकबुद्धी यांचा सुरेख संगम म्हणजे सामाजिक कायदा.

समाजशास्त्र व सामाजिक कायद्यात  माणुसकी म्हणजे मानवी मनाचा चांगुलपणा, मानवी नैतिकता, उदात्त भावना, सुसंस्कृतपणा यांचा काही प्रमाणात तरी समावेश होतो. पण भौतिक विज्ञान-तंत्रज्ञानात कसली माणुसकी, कसली नैतिकता? तिथे फार तर पर्यावरणीय संतुलनाचा विचार म्हणजे शेवटी तांत्रिक भागच येतो. या तांत्रिक भागाला नैतिकतेचा मुलामा देणे चुकीचे.

माणसाला भोगावी लागणारी आजार, वृध्दत्व, मृत्यू यासारखी दुःखे हा तर भौतिक विज्ञानाचा भाग आहे. गौतम बुद्धांना या तीन गोष्टी दिसल्या व त्या त्यांच्या चिंतनाच्या कारण बनल्या. या गोष्टी हे नैसर्गिक वास्तव आहे जे कितीही परमेश्वर भक्ती, देव प्रार्थना केली तरी टाळता येत नाही. मानवी स्वार्थ हेही मानवी दुःखाचे कारण आहे. गौतम बुद्धांना त्यांच्या चिंतनातून मानवी दुःखाचे हे कारण कळले जे कारण माणसाला टाळता येत नाही. फार तर नैतिक भावना व विवेकबुद्धी यांचा सुरेख संगम असलेल्या सामाजिक कायद्याने ते नियंत्रित करता येते.

भौतिक स्वार्थ व नैतिक परमार्थ या दोन्ही गोष्टी सामाजिक कायद्याच्या माध्यमातून माणसाला साध्य करता येतात. नैतिक परमार्थाला परमेश्वर जोडून नैतिक परमार्थाचे रूपांतर आध्यात्मिक परमार्थात होऊ शकते. याचा अर्थ सामाजिक कायद्यातून आध्यात्मिक परमार्थही साधता येऊ शकतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.२.२०२४

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

दैव जाणिले कुणी!

दैव जाणिले कुणी?

पृथ्वीवरील सर्व पदार्थ-प्राणीमात्रांवर पृथ्वीच्या सर्व भागात सारखाच प्रभाव टाकणाऱ्या विज्ञानातून व या प्राणीमात्रांतील सर्वात बुद्धिमान असलेल्या माणसांवर पृथ्वीच्या सर्व प्रदेशात जवळजवळ सारखाच प्रभाव टाकणाऱ्या सामाजिक कायद्यातून एखाद्या प्राण्याच्या किंवा माणसाच्या वाट्यास अगदी सहज, न मागता आलेले विशेष अकल्पित वास्तव जे दैवी आधार देणारे असेल किंवा दुर्दैवी निराधार करणारे असेल अशा विशेष वास्तवाला दैव/दुर्दैव, देवाचा आशीर्वाद/देवाचा शाप, प्रारब्ध, नशीब, नियतीचा फेरा वगैरे म्हणतात.

दैव सुखकारक, आनंद देणारे असते तर दुर्दैव दुःखकारक, पीडा देणारे असते. नशीब फळफळल्याने जे यश मिळते ते प्रयत्नवादी कर्तुत्वाचे यश नसते. त्यामुळे अशा यशाची उगाच फुशारकी मारणे चुकीचे. अविरत प्रयत्नाने, स्वकर्तुत्वावर मिळविलेले यश किंवा स्वतःच्या फालतू मस्तीने अंगावर ओढवून घेतलेले संकट हा नशिबाचा भाग नसतो. तो तुमच्या कर्माचा भाग असतो.

दैव किंवा दुर्दैव ही ठरवून प्रयत्न करता सहज, न मागता, योगायोगाने मिळणारी फायद्याची किंवा सहज, न मागता, योगायोगाने अंगाशी येणारी गोष्ट होय. परंतु ठरवून प्रयत्न केलेल्या कर्मातही नशिबाचा भाग असू शकतो. काहींना थोडा प्रयत्न केला तरी दैवाने सहज मोठे यश मिळते तर काहींना सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही मार्गात अडथळ्यांचे दुर्दैव सतत आडवे आल्याने फार थोडे यश मिळते.

प्रश्न हा आहे की, कोणाच्या नशिबी चांगले दैव तर कोणाच्या नशिबी वाईट दुर्दैव या गोष्टी परमेश्वराने जर अगोदरच ठरवून टाकल्या असतील तर मग देवाच्या आर्त प्रार्थनेला व प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीला काय अर्थ राहतो? शेवटी काय, तर दैव जाणिले कुणी!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.२.२०२४

स्वार्थाचे कामापुरते संबंध!

ही माझ्या मेंदूमनाची समस्या, इतरांच्या नव्हे!

स्वार्थी जगात लोकांना असलेली माझी उपयुक्तता जर संपली असेल तर माझ्या सादाला लोकांकडून प्रतिसाद मिळण्याची माझी अपेक्षा मुळातच चुकीची होय. याचाच दुसरा अर्थ असा की, आता इतर लोकांची उपयुक्तता सुद्धा माझ्यासाठी संपली. अशा परिस्थितीत, माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे करणारे, असून नसून सारखे असलेले बिनकामाचे व बिनफायद्याचे लोक माझ्यासाठी निरूपयोगी. अशा लोकांशी आता मी तरी संबंध का ठेवावेत? नुसती माणुसकी म्हणून, नुसता चांगुलपणा म्हणून, नुसता सुसंस्कृतपणा म्हणून का मी असे पोकळ संबंध ठेवावेत? परंतु असा सुसंस्कृतपणा एकतर्फी नसतो? त्याची जबाबदारी फक्त मी एकट्यानेच खांद्यावर का घ्यावी? आता असे संबंध संपले हे माझ्या भावनिक मनाला मीच पटवून दिले पाहिजे व असे संबंध संपवून टाकले पाहिजेत. कारण उगाच डोक्यात ठेवलेले असे बिनकामाचे संबंध मनाला ताप, त्रास देतात व उपद्रवी ठरतात. अशा संबंधाकडे जेवढ्यास तेवढे किरकोळ लक्ष देणे हेच आता माझ्या मनःशांती साठी आवश्यक आहे. असा ठाम निश्चय करून तसे वागता येत नसेल तर ती माझ्या मेंदूमनाची समस्या आहे, इतरांच्या नव्हे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.२.२०२४

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

मानवी गरजांचा शोध!

मानवी गरजांचा शोध!

आपल्या जन्माचा संबंध आपल्या आईवडिलांच्या लैंगिक संबंधाशी असतो म्हणून आपल्या जन्मासाठी आपण आपल्या आईवडिलांवर अवलंबून. जन्मानंतर जगण्यासाठी आपण हवा, पाणी व अन्न या तीन गोष्टींवर अवलंबून व त्या गरजांसाठी आपण निसर्ग व माणसांवर अवलंबून. वस्त्र व निवारा या पुढे वाढलेल्या गरजांसाठीही आपण निसर्ग व माणसांवर अवलंबून. पण लैंगिकता, हवा, पाणी, अन्न, वस्त्र व निवारा या गरजांबरोबर औषध व शस्त्र या मानवी गरजा पुढे का व कधी वाढल्या व त्यांचा माणसांना फायदा किती व उपद्रव किती हे कळायला मार्ग नाही. वीज, रेडिओ, दूरदर्शन, फोन, संगणक, इंटरनेट, मोबाईल, जहाजे, मोटार गाड्या, रेल्वे, विमाने, अवकाश याने इत्यादी  गोष्टी चैनी आहेत की गरजा यावर वादविवाद होऊ शकतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.२.२०२४

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

परमेश्वराचा आधार!

परमेश्वराचा आधार!

निसर्गाची विविधता म्हणजे निसर्गातील विविध प्रकारचे सजीव व निर्जीव पदार्थ. त्यांचे विविध प्रकारचे गुणधर्म. त्यांचे विविध प्रकारचे कलागुण. त्यांच्यातील विविध प्रकारची शक्ती व त्यांची विविध प्रकारची हालचाल व विविध प्रकारच्या पदार्थांंची विविध प्रकारची हालचाल नियंत्रित करणारे विविध प्रकारचे निसर्गनियम (कायदे).

निसर्गाची ही विविधता विखुरलेली आहे. या विविधतेचा, विखुरलेल्या निसर्गाचा समुच्चय व एकवटलेली शक्ती जर कुठे बघायची असेल तर ती फक्त परमेश्वरातच बघता येते. म्हणून निसर्ग नावाच्या निर्मिती पुढे नव्हे तर त्या निर्मितीच्या निर्मात्यापुढे अर्थात परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन हात जोडले जातात कारण ज्याला महान परमेश्वराचा आधार त्याला निसर्ग कठीण न वाटता सोपा वाटतो!

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.२.२०२४

विज्ञानातले देवत्व?

चाकोरीबद्ध भौतिक विज्ञानातील देवत्व?

विश्वातील ग्रह, ताऱ्यांची व पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या सृष्टीची हालचाल चाकोरीबद्ध भौतिक नियमांनुसार होत असल्याचे दिसून येते. चाकोरी आली की त्यात रटाळपणा आला. मनुष्याचे जीवनही जीवनचक्रानुसार चाकोरीबद्ध आहे. परंतु या ठराविक चाकोरीत राहूनही मनुष्याने त्याच्या नैसर्गिक बुद्धी व निर्णयक्षमतेचा वापर करून निसर्गाच्या मूलभूत विज्ञानातील तांत्रिक व सामाजिक स्वातंत्र्य शोधले व अनुक्रमे तंत्रज्ञान व सामाजिक कायद्याच्या जोरावर मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न पिढ्यानपिढ्या चालू ठेवला आहे. तरीही सूर्यमालेचे नियंत्रण करणारा सूर्य, स्वतःभोवती फिरत सूर्यप्रदक्षिणा घालणारी पृथ्वी, पृथ्वी भोवती फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह, पृथ्वीवरील सागर, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, माणसे यांची भौतिक हालचाल चाकोरीबद्धच आहे व त्यामुळे जीवनात हळूहळू ही चाकोरीबद्ध भौतिक हालचाल रटाळ, कंटाळवाणी होत जाते. या हालचालीत सगळेच आलबेल नसते. जगण्यासाठीचा संघर्ष व भीती या गोष्टी तर आयुष्यभर साथ करीत असतात. त्यातून क्षणिक सुख व शांतीचा अनुभव हा दुर्मिळ असतो. सुख व दुःख, शांती व अशांती यांचा सतत लपंडाव सुरू असतो. अशा परिस्थितीत माणूस माणसांतच देव शोधतो कारण आकाशातला अदृश्य देव प्रत्यक्षात संगतीला नसतो व तो खरंच कुठे असला तर तो नेहमी मदतीला धावून येत नाही. पण माणूस हा अदृश्य देवाला पर्याय होऊ शकत नाही. फक्त स्वतःपुरते बघणारी संकुचित मनाची स्वार्थी माणसे वाटेत येणाऱ्या दुसऱ्या माणसांना तुडवून पुढे जातात. त्यामुळे जनावरांपेक्षा माणसांचीच माणसांना भीती वाटत राहते. या वास्तव भीतीपोटीच सामाजिक कायद्याची निर्मिती माणसांनी केली. पण या कायद्याला त्याच्या मर्यादा आहेत. त्यामुळे माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत मनात भीती घेऊनच जगत असतो. तरीही अशा भयानक परिस्थितीतही काही मोठी माणसे समाजासाठी वरदान ठरतात. अशा थोर माणसांत लोकांचे कल्याण साधणारे, लोकांना सुरक्षित करणारे व लोकांना आधार देणारे राजे, नेते, जनकल्याण, जनसुरक्षा व जनाधार या त्रिसूत्रीवर विराजमान होऊन कार्यरत राहतात. अशा काही थोर माणसांना लोकांनी परमेश्वराचा अवतार मानले तर त्यात त्यांची चूक काय? परंतु अशा महामानवांच्या मृत्यूनंतर लोकांनी त्यांच्या प्रतिमा, मूर्ती मंदिरात ठेवून त्यांची पूजा अर्चा करणे, त्यांच्या कडून चमत्काराची अपेक्षा करणे हे अंधश्रद्ध वर्तन असल्याने ते मात्र चुकीचेच!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.२.२०२४

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४

दुरून डोंगर साजरे!

दुरून डोंगर साजरे!

विश्वाचा पसारा इतका मोठा आहे की त्याचा अंदाज सुद्धा नीट करता येत नाही. विश्व म्हणजेच निसर्ग आणि या निसर्गातील विविधता लांबून सुंदर भासली तरी आपण तिच्या जेवढे जवळ जाऊ तेवढी ती किचकट, कठीण होत जाऊन तापदायक होते. कुतूहलाचे समाधान म्हणून विश्वाचे लांबून दर्शन घेणे म्हणजे त्याचे सामान्य ज्ञान घेणे वेगळे आणि त्याच्या एकदम जवळ जाऊन त्याचे विशेष ज्ञान घेऊन त्याच्या कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेणे वेगळे. उदाहरणार्थ, सूर्याला लांबून बघणे, त्याच्या उष्णतेचा, प्रकाशाचा लांबून फायदा घेणे वेगळे व त्याच्या जवळ जाऊन त्याच्या उर्जा कार्यात प्रत्यक्षात सहभागी होणे वेगळे.

विश्व पसाऱ्याच्या व निसर्गाच्या विविधतेच्या जेवढे जवळ जावे तेवढया गोष्टी अधिकाधिक कठीण होत जातात. निसर्गाने एकीकडून माणसाला प्रचंड मोठी बुद्धिमत्ता व निर्णयक्षमता दिली आहे तर दुसरीकडून निसर्गाचा पसारा प्रचंड  वाढवून व त्यातील विविधता कठीण  करून माणसाचे जीवन प्रचंड  आव्हानात्मक व संघर्षमय करून ठेवले आहे.

आकाशात असंख्य चांदण्या, ग्रह, तारे असतात. पण त्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संपर्क, प्रत्यक्ष संबंध व त्यांच्या हालचालीतील प्रत्यक्ष सहभाग किती असतो? अगदी तसेच या पृथ्वीतलावर निरनिराळ्या प्रदेशात असंख्य माणसे जगत असतात पण त्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संपर्क, प्रत्यक्ष संबंध, तसेच त्यांच्या हालचालीतील प्रत्यक्ष सहभाग किती असतो? माध्यमातून त्यांच्या बातम्या बघणे, वाचणे वेगळे व त्यांच्याशी प्रत्यक्षात व्यावहारिक संबंध असणे वेगळे.

आपल्या जवळचे कोण, आपल्या समोर परिस्थितीने काय मांडून ठेवलेय व आपल्यासाठी व्यवहार्य गोष्ट कोणती याकडेच प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. आपल्याशी संबंध नसलेल्या बाकीच्या गोष्टींकडे एक विरंगुळा (टाईम पास) म्हणूनच बघितले पाहिजे. थोडक्यात, दुरून डोंगर साजरे!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.२.२०२४

अध्यात्माची व्यवहार्यता?

अध्यात्माची व्यवहार्यता?

निसर्गाच्या भौतिक विज्ञानात परमेश्वराच्या आध्यात्मिक धर्माची व्यवहार्यता मानवी बुद्धीला नगण्य वाटली तरी शेवटी मानवी बुद्धीला चांगुलपणाची उदात्त भावना चिकटलेली असल्याने या भावनेतून देवश्रद्धा निर्माण होते हे मान्य करावे लागेल. मानवी बुद्धीला ही उदात्त भावना चिकटली तेव्हाच निसर्गाच्या भौतिक विज्ञानाला परमेश्वराचा आध्यात्मिक धर्म चिकटला. असे भावनिक अध्यात्म ही मुळातच व्यवहाराची गोष्ट नसल्याने भौतिक विज्ञानातील आध्यात्मिक धर्माच्या  व्यवहार्यतेविषयी बुद्धीने वाद घालणे हे चुकीचे. परंतु भावनाविवश होणे जसे चुकीचे तसे देवभोळे होणे हेही चुकीचे!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.२.२०२४

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

अर्धज्ञानी लोक व स्वार्थाचा बाजार!

अर्धज्ञानी लोक आणि स्वार्थाचा बाजार!

निसर्गाच्या विविधतेत त्याचे विविध ज्ञान शाखांत विखुरलेले विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे निसर्गाच्या वास्तवाचे ज्ञान. निसर्गात जोपर्यंत हे विज्ञान आहे व त्या विज्ञानाचा भाग असलेली माणसे आहेत तोपर्यंत माणसे त्या विज्ञानाशी झोंबाझोंबी करीत राहणार व त्या झोंबाझोंबीतून विज्ञानाच्या विविध ज्ञान शाखांत विशेष ज्ञान व प्रावीण्य मिळवून त्या अर्धवट ज्ञानाच्या व प्रावीण्याच्या जोरावर ही अर्धवट ज्ञानी माणसे निसर्ग पदार्थांच्या तुकड्यांवर सत्ता गाजवत एकमेकांना एकमेकांवर अवलंबून ठेवणार. कोणताही एक मनुष्य त्याच्या मर्यादित आयुष्यात संपूर्ण विज्ञानाचे ज्ञान मिळवू शकत नाही मग संपूर्ण विज्ञानात प्रावीण्य मिळविण्याची तर गोष्टच सोडा.

त्यामुळे प्रत्येक माणसाला कोणत्या तरी विज्ञान शाखेत (समाजशास्त्र व सामाजिक कायदा हाही निसर्ग विज्ञानाचाच एक भाग) ज्ञानसंपन्न व प्रवीण होऊन विविध वस्तू, सेवांच्या देवाणघेवाणीच्या बाजारात स्वतःचे वैशिष्ट्य विकण्याचा प्रयत्न करावाच लागतो. या बाजारात परावलंबीत्व असते तसा नफ्या तोट्याचा हिशोब असतो, व्यावहारिक शहाणपणा असतो तसा अती स्वार्थातून निर्माण होणारा अप्रामाणिकपणा, संशय, अविश्वास, विश्वासघात, भ्रष्टाचार असतो.

स्वार्थाच्या बाजारातील अर्धज्ञानी माणसे स्वतःजवळ असलेल्या अर्धवट ज्ञानाचे व मर्यादित पदार्थ संपत्तीचे मोल ग्राहकांना (गरजूंना) एवढ्याचे तेवढे करून सांगतात व परावलंबी ग्राहकांना जास्तीतजास्त कसे लुटता येईल याचाच स्वार्थी (बहुधा महास्वार्थी) विचार करीत असतात व या स्वार्थी, व्यापारी वृत्तीतून एकमेकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत राहतात.

स्वार्थाच्या अशा बाजारात माणसा माणसांमध्ये माणुसकी रहात नाही. माणसे एकमेकांना माया प्रेमाने बघत नाहीत. स्वार्थाचे काम संपले की ओळख देत नाहीत. बाजारात स्वार्थ बोकाळला की मग लोक कायद्याला जुमानत नाहीत. अशा बाजारात कायद्याविषयीचा आदर व वचक कमी होतो. त्यामुळे बाजारू सामाजिक व्यवहारात भ्रष्टाचार वाढतो. हळूहळू विज्ञानाच्या बोकांडी तंत्रज्ञान बसते आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू होतो. देवाच्या धर्मात ढोंग घुसते आणि अध्यात्मातला देव निष्क्रिय होतो. तरीही असहाय्य झालेली देवश्रद्ध आस्तिक माणसे कठीण विज्ञानात व माणसांच्या स्वार्थी बाजारात देवाने मदत करावी म्हणून देवाला साकडे घालीत राहतात.

या लेखाचा सार एवढाच की, स्वार्थी व्यवहारी जगात, व्यापारी बाजारात माणुसकी, माया प्रेम शोधत फिरणे हा शुद्ध वेडपटपणा होय. मायाप्रेम हे स्वतःच्या कुटुंबापुरतेच मर्यादित असते, बाहेर नाही!

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.२.२०२४

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

हार्ट ब्लॉक नंतर आता मेंटल ब्लॉक!

हार्ट ब्लॉक नंतर आता मेंटल ब्लॉक!

निसर्गाने किंवा निसर्गातील त्या महान परमेश्वराने मानवी शरीर हे काय अजब यंत्र बनविले आहे त्याचा फाॕर्म्युला त्या परमेश्वरालाच ठाऊक. मेंदू, हृदय, किडनी, छाती, पोट, डोळे, नाक, कान अशा अनेक अवयवांचे वेगवेगळे वैद्यकीय तज्ज्ञ शरीराच्या ठराविक भागाविषयीच्या त्यांच्या विशेष पण तरीही मर्यादित वैद्यकीय ज्ञानाने रूग्णांच्या शरीरावर निरनिराळे प्रयोग करीत असतात. गंमत ही की त्यांच्या या प्रयोगांनी शरीराचा एक अवयव सुधारला तर दुसरा अवयव बिघडतो. मग जा त्या दुसऱ्या अवयवाच्या तज्ज्ञाकडे.

माझेच उदाहरण घ्या ना. माझ्या हृदयात ६७ वयात कसला तो २:१ ए.व्ही. ब्लॉक निर्माण झालाय व त्याने माझ्या हृदयाचे इलेक्ट्रिक सर्किटच बिघडवून टाकले. आता  इलेक्ट्रिक करंटच अनियमित झाला तर हृदयाचे पंप बिघडून हृदयातून संपूर्ण शरीराला होणारा रक्तप्रवाह पण अनियमित होणार ही नैसर्गिक वैज्ञानिक गोष्ट आहे ज्यावर देवाचे अध्यात्म काय करणार? माझ्या मेंदूत जगाच्या विचाराचा किडा सारखा वळवळत असतो. त्यामुळे माझा मेंदू हृदयाकडून जास्तीतजास्त रक्ताची मागणी करतो. ६७ वर्षे रक्ताचे पंपिंग करून करून माझे हृदय बिच्चारे थकले. आता ते माझ्या मेंदूला जुमानत नाही. माझ्या  हृदयाच्या या असहकारामुळे माझा मेंदू हल्ली संभ्रमित व घाबरट झाला आहे. तो त्याचा आत्मविश्वास गमावत चाललाय आणि ही सर्व परिस्थिती हृदयाच्या ब्लॉकमुळे निर्माण झालीय. इथे हृदय मेंदूवर वरचढ ठरलेय.

त्यामुळे झालेय काय की अंघोळ ही साधी गोष्ट सुद्धा मला कठीण होऊन बसलीय. शरीराच्या खांद्याखालील भागाला कितीही साबण लावा त्याने त्रास होत नाही. पण एकदा का डोक्याला व तोंडाला साबण लावला की कधी डोक्यावरून पाणी घेतोय व डोक्याचा, तोंडाचा तो फेस धुवून काढतोय असे होऊन जाते. नेमके याच वेळी हृदयाला मस्ती येऊन ते मेंदूचा रक्त पुरवठा कमी करते आणि मग मेंदूला काय करावे हे सुचतच नाही. तो घाबरून जातो व मेंदू घाबरला की जीव गुदमरून जातो. हा क्षण म्हणजे धड जीवन नाही व धड मरण नाही असा मधल्या मध्ये लटकण्याचा क्षण. या क्षणात देवाचे कसले ते अध्यात्म सुचतच नाही. इतक्या देवदेवता आहेत व इतके साधुसंत आहेत पण एकाचेही नाव घेता येत नाही मग त्यांचा धावा कसला करणार? त्यावेळी कोणीच वाचवायला येत नाही. मग स्वतःच स्वतःला सावरून डोक्यावर पाणी घेऊन त्या भयंकर क्षणातून बाहेर यावे लागते.

अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर हार्ट ब्लॉक नंतर आता माझ्या मेंदूत  मेंटल ब्लॉक झालाय. याचे कारण हृदय व मेंदू हे शरीराचे दोन प्रमुख अवयव एकमेकांशी निगडीत आहेत.  एक अवयव बिघडला की दुसरा अवयव बिघडतो. कॉर्डिओलॉजी तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सुचवलेय तर माझ्या हृदयाजवळ पेसमेकर म्हणजे  हातातील घड्याळाची आकाराची बॕटरी बसवा. त्यांना हृदयाच्या पलिकडे काही कळतच नाही. ती कृत्रिम बॕटरी छातीत घातली तर माझ्या हृदयाची टिकटिक वाढेल म्हणे. पण त्याने माझा मेंदू बिघडेल त्याचे काय? यावर कॉर्डिओलॉजिस्ट डॉक्टरांकडे काय उपाय आहे? या बॕटरीने माझा मेंदू शंभर टक्के बिघडणार याची मला पूर्ण खात्री आहे कारण माझा मेंदू या असल्या कृत्रिम उपकरणांवर जगायला तयारच नाही.

होऊन होऊन काय होईल? माझ्या हृदयाची हळूहळू चालू असलेली टिकटिक बंद पडेल आणि मी मरेल एवढेच ना! त्याला तर माझा मेंदू केंव्हाच तयार झालाय. कदाचित मी बाथरूम मध्ये अंघोळ करतानाच मरून पडेल असे वाटतेय. कारण अंघोळ करताना माझा हार्ट ब्लॉक माझ्या मेंदूत मेंटल ब्लॉक तयार करतो. यावर तात्पुरता इलाज म्हणून आता मी काय करणार तर अंगाला भरपूर साबण लावला तरी डोके व तोंड या भागांना अगदी थोडा साबण लावणार म्हणजे तिथे जास्त फेस होणार नाही आणि मग तो मेंटल ब्लॉक तयार व्हायच्या आत पटकन डोक्यावरून पाणी घेऊन मोकळे होणार. उगाच लोचा व्हायला नको. पण हॉस्पिटलमध्ये मरण्यापेक्षा घरात मरणे ही तशी चांगलीच गोष्ट आहे मग त्यासाठी बाथरूम तर बाथरूम.

मी बायकोला व मुलीला सांगूनच टाकलेय की मला हृदयविकाराचा झटका आला की लगेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न्यायची बिलकुल घाई करायची नाही. मी बेशुद्ध असलो तर मला न विचारता तिथे माझ्या छातीची चिरफाड करून तो पेसमेकर बसवला तर? माझ्या हृदयाचे मिटर बंद झाले तरी चालेल पण त्या डॉक्टरांच्या जबरदस्त फी चे मिटर चालू व्हायला नको. तसे तर हार्ट अटॕकने पटकन मृत्यू यायला माणूस पुण्यवान असावा लागतो. मी तसा पुण्यवान माणूस आहे हे सिद्ध करण्याची मला देवाने दिलेली संधी मी का दवडू?

अंगाला विशेष करून डोक्याला व तोंडाला जास्त साबण लावला की त्रास होतो व देवाचे अध्यात्म जास्त केले की नैराश्य येते हा तसा माझा वैयक्तिक अनुभव आहे. माझे वडील जास्त देवदेव करीत नव्हते पण ते ७९ वर्षे जगून शांतपणे हार्ट अटॕकने गेले. याउलट माझी आई देवाची खूप पूजा अर्चा करायची पण तिला कमी वयात मधुमेह झाला आणि त्या साखर आजाराने तिला भयंकर त्रास दिला. पायाला मधुमेहामुळे गँगरीन झाले. जे. जे. हॉस्पिटलमध्ये पायाची बरीच आॕपरेशन्स झाली. शेवटी कमी वयातच जे.जे. रूग्णालयातच तिने प्राण सोडले. हा कसला देवाचा उलटा न्याय? इतरांचे अनुभव मला माहित नाहीत व त्यांच्याशी माझे काही घेणे देणे नाही. मी माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून बोलतो व लिहितो. निसर्गाचे विज्ञान काय किंवा परमेश्वराचे अध्यात्म काय, या दोन्ही गोष्टी मी जेवढ्यास तेवढ्या करतो. माझ्या हार्ट व मेंटल ब्लॉकसनी माझे ज्ञान आणखी वाढवले एवढे मात्र नक्की!

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.२.२०२४

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

निसर्गाचे साचेबंद विज्ञान!

साचेबंद निसर्ग व त्याचे विज्ञान!

पृथ्वीच्या अनेक बिळांतून जशी अनेक उंदरे जन्माला येतात तशी पृथ्वीवरील अनेक घरांतून अनेक माणसे जन्माला येतात. उंदरे असोत नाहीतर माणसे सर्वच सजीवांचे जीवन तसे साचेबंदच. निर्जीव पदार्थांचे अस्तित्व तर एकदम कडक गणिती साचेबंद. फक्त प्रत्येक गटाचे साचे वेगळे एवढेच. मनुष्याचा साचा थोडा हटकेच. निसर्गाकडून मनुष्य प्राण्याला लाभलेली बुद्धी एकदम उच्च पातळीची. याच बुद्धीच्या जोरावर मनुष्याने विज्ञानाचे रूपांतर आधुनिक तंत्रज्ञानात केले व मानवी जीवनाला तंत्रज्ञान निर्मित सुखसोयी व जीवनविषयक तत्वज्ञान यांच्यात बद्ध केले. हा मानवनिर्मित साचा तसा कृत्रिम पण तो नैसर्गिक बुद्धीने निर्माण केला असल्याने या कृत्रिम साच्यालाही नैसर्गिक साचा म्हणावे लागेल. मनुष्याच्या तांत्रिक साच्यात वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी इ. गोष्टी तर मनुष्याच्या तात्विक साच्यात अर्थकारण, राजकारण, धर्म इ. गोष्टी अशा बऱ्याच मानवनिर्मित कृत्रिम गोष्टी समाविष्ट आहेत. याच साच्यात निर्माण होतात कलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षक, वकील, धर्मपंडित, श्रीमंत उद्योजक (अर्थकारणी), बलवान राजकारणी व सर्वसामान्य माणसे. हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. या सर्व गोष्टींच्या मुळाशी परमेश्वर आहे असे मानावे तर परमेश्वराच्या धार्मिक अध्यात्माचा निसर्गाच्या वैज्ञानिक भौतिकतेवर खरंच प्रभाव आहे का व असलाच तर तो किती आहे हे कळायला मार्ग नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.२.२०२४

वैज्ञानिक धर्मकारण व आध्यात्मिक धर्मकारण वेगळे!

निसर्गाचे वैज्ञानिक धर्मकारण वेगळे आणि परमेश्वराचे आध्यात्मिक धर्मकारण वेगळे!

निसर्ग रचित साचेबंद विज्ञानाच्या मुळाशी देव (परमेश्वर) मुळापासून आहे की मनुष्यानेच स्वतःच्या विचारातून किंवा अनाकलनीय नैसर्गिक अनुभवातून परमेश्वर व त्याचे अध्यात्म जीवनात आणले हा वादग्रस्त मुद्दा आहे. याच वादावर मनुष्य समाजातील आस्तिकवाद व नास्तिकवाद आधारित आहे. पण मूलभूत प्रश्न हा आहे की परमेश्वरच जर सगळे निर्णय घेत असेल तर मग मनुष्याच्या बुद्धीचे व त्या बुद्धीच्या  नैसर्गिक निर्णयक्षमतेचे मनुष्याने काय करायचे? मनुष्याच्या बौद्धिक निर्णयक्षमतेने निसर्गाच्या मूलभूत  भौतिक रचनेत बरीच लुडबूड करून अर्थात निसर्गाच्या या मूळ रचनेत बऱ्याच कृत्रिम काड्या घालून या रचनेची मुळापासून वाट लावल्याचे स्पष्टपणे दिसत आहे व या उपद्रवी काड्यांमुळे मानवी जीवन सुसह्य होण्याऐवजी असह्य झाल्याचा अनुभव पदोपदी येत आहे. मानवी जीवनात कल्याणकारी अर्थकारण व रक्षणकारी राजकारण हे मूलभूत आधार खांब आहेत. शिक्षण व ज्ञानकारण हा आधार खांब सुद्धा अर्थकारण व राजकारण या दोन मुख्य आधार खांबांशी निगडीत आहे. शिक्षणातून ज्ञान का घ्यायचे तर अर्थकारणी व राजकारणी  व्यावहारिक जीवन नीट जगता यावे म्हणून. पण अर्थकारणातील व राजकारणातील व्यवहाराचे वास्तव काय आहे? राहिलीय का नैतिकता, राहिलाय का देव (परमेश्वर) या मूलभूत व्यवहारात? उत्तर नाही असेच आहे. या व्यवहारात खरंच देवाचे (परमेश्वराचे) अधिष्ठान असते तर राजकारणाचे गुन्हेगारीकरण (सॉरी गुन्हेगारीचे राजकीयीकरण) झालेच नसते. तरीही परमेश्वरावर श्रद्धा असणारा सर्वसामान्य माणूस त्याची आध्यात्मिक भक्ती, प्रार्थना करीत या भयानक वास्तवाला कलियुग म्हणत या युगाचा अंत करण्यासाठी परमेश्वर कधीतरी अवतार घेईल म्हणून त्याच्याकडे पिढ्यानपिढ्या आशेने डोळे लावून बसलाय. मुळात आपण ज्या घरात राहतोय त्या घरालाच अशी आग लागलेली असताना आपण आगीने वेढलेल्या अशा घरात परमेश्वराची आध्यात्मिक कामना, भक्ती करीत शांतीची मोक्षप्राप्ती मिळवू शकतो का हा मूलभूत प्रश्न आहे. निसर्गाचे वैज्ञानिक धर्मकारण वेगळे आणि परमेश्वराचे आध्यात्मिक धर्मकारण वेगळे, दोन्हीचा कुठेही ताळमेळ नाही. पण तरीही देवश्रद्ध माणूस निसर्ग विज्ञानाची आव्हाने हिंमतीने पेलण्यासाठी देवाच्या अध्यात्माचा आधार घेतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.२.२०२४

CONNECTION BETWEEN NATURE SCIENCE AND GOD SPIRITUALISM!

CONNECTION BETWEEN SCIENCE OF NATURE AND SPIRITUALISM OF GOD!

I was finding it very difficult to connect Nature with God, Science with Religion (Dharma) and materialism of Nature with spiritualism God. But ultimately I got relieved from confusion when I seriously thought over the meaning of four purusharthas contained in Hindu religion. These four purusharthas are dharm, arth, kam and moksh. Each purusharth has very deep meaning within it. The simple meanings of these four purusharthas whose true understanding and determined practice in life is difficult but worth doing are as stated hereinbelow.

The Dharm means religion or law. It means performing all material karmas of the science of Nature in terms of religion or law. The law tells what is right conduct (dharm) and what is wrong conduct (adharm). The law or religion does not only mean performing of only good karmas (dharma). It also includes destruction of bad karmas (adharma). This is basic principle or substantive law.

The next purusharth is Arth. The Arth means earning, enjoying & securing of the material wealth of Nature by all lawful means and weapons. It simply means materialism of science of Nature in terms of law (religion/dharm). The law within arth is actually detailed principled procedure prescribed by basic principle of law viz. first purusharth of dharm. The arth is right conduct in terms of due process of law.

The third purusharth is Kam. The Kam does not mean any material karma or sex as people commonly understand. The simple meaning of Kam is Ishwar Kamana means spiritual desire of establishing union with God, the creator of Nature and controller of its science. It is love or bhakti of God.

The fourth purusharth is  Moksh. The Moksh does not mean renouncing of material world as Sanyasi or death. Actually, Moksh means divine peace one gets by spiritual union with God and it can be enjoyed by human being during his life time itself.

Now I come to the point of connection between the science of Nature and the spiritualism of God. For understanding this basic connection I have divided above four purusharthas in two parts. The first part is that of Dharm and Arth which two purusharthas in combination become the science of Nature. The next two parts of Kam & Moksh in combination become the spiritualism of God. Since all four purusharthas are connected with each other first two parts viz. Science of Nature and latter two parts viz. Spiritualism of God are also connected with each other. This is my personal analysis and my personal understanding which may vary with other masters in this field.

God bless!

-©Adv.B.S.More, 12.2.2024

SPIRITUALISM IS NOT SCIENCE!

SPIRITUALISM IS NOT SCIENCE OF NATURE BUT IT IS CONNECTED WITH SCIENCE OF NATURE!

The science of physics and chemistry in relation to non living things is an exact science of Nature mainly because of the reason that it is purely mechanical. But the science of biology in relation to the living things (including plants) is not  exact science as physics & chemistry. The biology is semi-exact science of Nature because it is mixed mechanical-psychological. The word psychology has word logic within it. The logical means reasoned. The psychology contains logic in relation to instincts and emotions of the living things. The human beings carry with their psychology  basic biological instincts such hunger for food, sex etc. along with the negative emotions such as greed, anger etc. and the positive emotions such as love, kindness etc. The logical wisdom or intelligence is reasoned to balance basic biological instincts as well as negative and positive emotions of human beings. The pure mechanical & mixed mechanical-cum- psychological movements of non-living and living things respectively can be measured in mathematical and/or semi-mathematical terms. But the human mind's holistic or spiritual emotional touch in relation to God cannot be measured even in semi-mathematical terms. It is like pure love cannot be weighed &/or measured in mathematical terms, exact or semi-exact. In short, the spiritualism is not exact or semi-exact science of Nature. It is independent from science of Nature although God is assumed to be creator & controller of Nature and its science. In short, although the spiritualism of God is not the science of Nature it is connected with science of Nature. The application of science of Nature must be mechanical or semi mechanical-cum-logical as the case may be. But the spiritual prayer to/holistic touch with God cannot be so scientific and material since it is based on pure emotional faith which cannot be exact/concrete. Simply, the spiritualism is inexact/abstract emotional exercise in relation to God. But although this is inexact or abstract exercise, one can get higher mental strength to face challenges of material science of Nature as well as holistic/divine pleasure & peace from spiritualism of God which experience is very special.

-©Adv.B.S.More, 12.2.2024

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

IN TOUCH WITH GOD!

LIVING WITH MISERIES/ SUFFERINGS OF LIFE IN TOUCH WITH GOD!

The Universe or Nature as the product of Nature is too complex to live in. One who believes in God as creator and controller of Universe or Nature then is inclined to conclude logically that the brain of God is too complex otherwise it would not have made world within Universe or Nature so complex.

The complexity of Universe or Nature is structural and functional complexity or simply the mechanical or scientific complexity. One who strongly believes in the God cannot live life just in mechanical or scientific touch with God in the midst of lot of miseries of life created by mechanical or scientific complexiry of Nature. The theist or God believer lives in additional touch with God called the emotional or spiritual touch with God.

The mechanical/scientific touch with God gives some concrete physical reliefs in miseries of life and the emotional/spiritual touch with God gives some abstract mental reliefs in miseries of life. Both these touches with God have to be worked with together. It is like body & mind working together.

But there is no guarantee of complete physical relief by the mechanical/scientific touch with God & complete mental relief by emotional/ spiritual touch with God. It is because of this reality that people prefer to live with miseries of life in partial mechanical or scientific and partial emotional or spiritual touch with God. For example, some patients prefer to suffer from disease than to undergo complex medical remedy and some victims of injustice prefer to suffer from injustice than to go through long complex legal remedy. This bitter truth or reality of world & life have made some people atheists (non- believers in God).

The living with miseries of complex world and life with or without belief in God is actually the compulsion of Nature or God believed to be within Nature. But it is also true that large human  population continue to live as theists with belief in God than to follow atheism. It is mainly because of reason that sometimes spiritual mind wins over material  body or spiritualism of God wins over materialism of Nature. There are some miraculous experiences of strong determination of mind winning over weak or diseased body and strong belief in God winning over challenging complexity of the material/mechanical science of Nature.

In my personal intellectual and emotional view, one should live in mechanical/scientific as well as the emotional/spiritual touch with God in the midst of compulsive miseries/sufferings of life created by complexity of material/mechanical science of Nature.

-©Adv.B.S.More, 9.2.2024

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

अंतराळ, अवकाश (स्पेस)

अंतराळ, अवकाश म्हणजे अशी पोकळी सदृश्य जागा (स्पेस) ज्या जागेत अनेक तारकापुंजांचे थवे (गॕलक्सीज) एकमेकांच्या जवळ येत एकमेकांत मिसळण्याची किंवा एकमेकांपासून दूर जाण्याची सतत हालचाल करीत असतात, याच पोकळी सदृश्य जागेचे व सगळ्या तारकापुंजांच्या थव्याचे मिळून विश्व किंवा ब्रम्हांड बनले आहे जे सतत प्रसरण पावत आहे, देश किंवा राष्ट्र ही सुद्धा पृथ्वीवरील एक अशी प्रादेशिक जागा ज्यात त्या देशाच्या नागरिकांचे थवे तारकापुंजांच्या थव्यांप्रमाणे गटागटाने एकमेकांच्या जवळ येत असतात किंवा असहकार पुकारून एकमेकांपासून दूर जात असतात! -ॲड.बी.एस.मोरे

Blood pressure and heart beat problems!

BLOOD PRESSURE AND HEART BEAT PROBLEMS ARE BOTH HEART ISSUES.

Blood pressure rate and heart beat rate problems are both heart related problems. Blood pressure is pressure when heart pushes blood out or when heart rests between beats. Normal BP is between 90/60 mmHg and 120/80 mmHg. High BP is 140/90 mmHg or higher. Low BP is below 90/60 mmHg.

Heart beat problem is different from blood pressure problem although both are heart related problems. Tachycardia is high heart beat rate issue and it exists when resting heart beat rate remains consistently above 100 beats per minute. On the other hand, Bradycardia is low heart beat rate problem and it exits when resting heart beat rate remains below 60 beats per minute. Low heart beats can give signs or symptoms of fainting, dizziness or slow/ shortness of breath.

Google search by Adv.B.S.More on 7.2.2024

आता लोकांच्या मागे लागणे बंद!

आता लोकांच्या मागे लागणे बंद!

स्वकष्टाने मिळवलेले माझे ज्ञान मी लोकांपुढे खूप पाजळले. पण त्यांना त्याची कदर नाही. व्यापारी भाषेत बोलायचे तर माझ्या ज्ञानाची लोकांना गरज नाही म्हणून माझ्या ज्ञानाला बाजारात मागणी नाही, उठाव नाही.

भारतीय स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास मी वाचला. तो इतिहास म्हणजे मागील पिढीचा इतिहास जी पिढी नैसर्गिक जीवन चक्रानुसार कालवश झाल्याने आता हयात नाही. त्या इतिहासात बघितले तर असे दिसून येईल की वर्तमान काळात जशी फक्त काही लोकांचीच शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांत चलती आहे तशी चलती त्या काळातही फक्त काही मूठभर लोकांचीच होती व ते मूठभर लोकच समाजात चमकत होते. याचा अर्थ असा नव्हे की फक्त त्या मूठभर लोकांकडेच काही विशेष गुण होते, काही विशेष बुद्धिमत्ता होती. असे कितीतरी हिरे त्या काळातही झाकोळले गेले होते. त्यांना चमकण्याची संधी मिळाली नाही किंवा त्यांना हेतुपुरस्कर त्या काळातील काही मूठभर सरंजामी प्रवृत्तीच्या लोकांकडून डावलले गेले. प्रतिकूल परिस्थितीतून काही महान माणसे त्या काळात पुढे आली पण त्या पुढे येण्यामागे फक्त त्यांचे विशेष गुण, विशेष बुद्धिमत्ताच कारणीभूत नव्हती तर योगायोगाने इतर घटकही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले ज्यांच्या पाठिंब्याने त्या व्यक्ती त्या काळी समाजात चमकू शकल्या व पुढे इतिहासात अजरामर होऊन वर्तमानकाळात मार्गदर्शक म्हणून उभ्या राहिल्या.

आता वर्तमान काळात वर्तमान पिढी कडूनही तेच होताना दिसत आहे. मी त्या महान व्यक्तींएवढा मोठा नाही. पण वास्तव हे आहे की स्वकष्टार्जित सखोल ज्ञान व प्रामाणिकपणा या चांगल्या गोष्टी जवळ असूनही या गोष्टींना उचलून धरणारे आर्थिक दृष्ट्या व राजकीय दृष्ट्या सबळ व्यक्तींचे पाठबळ तर मला मिळाले नाहीच पण समाजातूनही माझ्या या चांगल्या गोष्टींना झिडकारले गेले. त्यामुळे साहजिकच माझे ज्ञान माझ्या जवळच कुजले गेले, सडले गेले.

माझ्या ज्ञानाला व प्रामाणिकपणाला उचलून धरणारी पॉवरफुल माणसे योगायोगाने म्हणा किंवा आणखी कशाने म्हणा मला का मिळाली नाहीत? याला काहीजण दैव, नशीब म्हणतील तर काहीजण प्रारब्ध. या काहीजणांना तसे खुशाल म्हणू द्या. मी त्याकडे लक्ष दिले नाही व देणार नाही. दैवी चमत्कारावर माझा बिलकुल विश्वास नाही व तसल्या चमत्काराची मी अपेक्षाही करीत नाही. त्यासाठी देवळात जाऊन घंटानाद करण्यात, देवाच्या पोथ्या वाचण्यात किंवा देवाची जपमाळ ओढत बसण्यात मला जराही रस नाही. कारण माझे अध्यात्म हे अंधश्रद्ध नसून वैज्ञानिक आहे, वास्तव आहे. या अनुभवातून बोध घेऊन उतार वयात एकच गोष्ट करणार व ती म्हणजे सखोल अभ्यास करून अतिशय कष्टाने मिळवलेले ज्ञान आता लोकांपुढे फुकटात पाजळायचे नाही व आपले ज्ञान लोकांनी उचलून धरावे म्हणून लोकांच्या मागे लागायचे नाही व त्यांच्या नादी लागायचे नाही. माझ्या ज्ञानाला ओळखण्याची समाजातील लोकांची पात्रता नाही, लायकी नाही त्यांच्याकडून कसली अपेक्षा करीत बसायचे? स्वतःचे ज्ञान स्वतःपुरते वापरायचे व स्वतःसाठी एन्जॉय करायचे. आता लोकांच्या मागे लागणे बंद!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.२.२०२४

SUPPLEMENTS!

SUPPLEMENTS!

The original structure and  working mechanism of the natural products including humans beings produced by Nature is so good, so perfect and so beautiful  that there is no need for any human intervention & intermeddling with it.

But the human beings at the instance of their over intelligence, over wisdom and with profit motive have spoiled original structure & original mechanism by artificial supplements. The processed fast foods as supplements to original natural food products is fine example of artificial supplements created by human beings out of their over enthusiasm & greed in the name of their technical advancement & industrial progress.

To get away from artificial supplements by throwing them in dustbin for living natural life has been made difficult by human beings themselves because they have forgotten originality of Nature by getting habitual to their own creation of artificial supplements. The artificial intelligence is the latest model of such man made artificial supplement.

-©Adv.B.S.More, 6.2.2024

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

मी मरणाच्या वयात आलो!

मी मरणाच्या वयात आलो!

वैद्यकीय निष्कर्षानुसार भारतीय लोकांचे सरासरी आयुष्य ६७ वर्षे आहे व खूप कमी लोक ८० वर्षाच्या पुढे जगतात. हा निष्कर्ष कळल्यावर मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. माझे मन आनंदाने नाचत आहे. याचे कारण काय तर मला हे कळले की परमेश्वराने मला सरासरी वयापर्यंत म्हणजे ६७ वर्षापर्यंत मस्त जगवले. मी आणखी पाच महिन्यांनी २७ जून २०२४ रोजी ६७ वर्षे पूर्ण करून ६८ वर्ष वयात प्रवेश करणार. म्हणजे ६७ वर्षे आयुष्याची सरासरी गाठायला आता फक्त पाच महिने बाकी आहेत. त्याच्या आतच गेल्या महिन्यात परमेश्वराने मला माझ्या मृत्यूचा सिग्नल दिला. मृत्यू घंटाच म्हणा की. गेल्या महिन्यात माझ्या हृदयात सेकंड डिगरीचा हार्ट ब्लॉक निघाला. त्यामुळे माझ्या हृदयाचे ठोके अनियमित, संथ झाले. तसा मी संथ माणूस. शांतपणे हळूहळू कासवासारखा जीवन जगणारा संथ माणूस. मोठ्या श्रीमंत लोकांच्या दारात जाऊन त्यांना कमी फी मध्ये शांतपणे मोठा वकिली सल्ला देणारा व कमी पैशात मोठ्या समाधानाने जीवन जगणारा विशाल मनाचा संथ वकील. आता अशा संथ माणसाच्या हृदयाचे ठोके महान परमेश्वराने ६७ या सरासरी वयात संथ केले व मी आता मरणाच्या वयात आलोय असे संथपणे सांगितले त्याबद्दल महान परमेश्वराचे आभार मानायचे सोडून बसवू का मी तो बॕटरीवाला पेसमेकर माझ्या छातीत माझ्या हृदयाशेजारी? माझे सगळे संघर्षमय जीवन न डगमगता मी बिनधास्त धाडसाने जगलोय. असला माणूस ते कृत्रिम उपकरण छातीत लावून जगण्याचा विचार तरी करू शकेल का? छे, असे करून मी त्या महान परमेश्वराने मला दिलेल्या नैसर्गिक सुंदर शरीर यंत्राचा व त्यातील सुंदर हृदय यंत्राचा अपमान करण्याचे पाप केल्यासारखे होईल. परमेश्वरा, हे पाप मी करणार नाही. तुझा अपमान मी करणार नाही. तुझे उपकार कसे फेडू? तू प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याची केवढी मोठी हिंमत मला दिलीस. आता तू ६७ या सरासरी वयात मला माझ्या हृदयात तो ब्लॉक दिलास आणि माझ्या हृदयाची गती संथ केलीस. केलीच पाहिजे! किती धावत होतो मी पोटासाठी लोकांच्या दारात जाऊन भेट वकिलीची ती अपमानास्पद मजूरी व चाकरी करण्यासाठी आणि ही असली भेट वकिली करून आयुष्याच्या शेवटी आता माझी शिल्लक काय तर माझा एक फ्लॅट. पण माझ्या या कष्टाचे फळ म्हणून त्याहूनही मोठा ठेवा तू मला दिलास. तो ठेवा म्हणजे माझी उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम, वैवाहिक दृष्ट्या सुसंस्कारित अशी माझी एकुलती एक मुलगी व तेवढाच उच्च शिक्षित, सशक्त, समंजस माझा जावई. सोबत माझी सतत काळजी घेत मला प्रतिकूल परिस्थितीतही शेवटपर्यंत साथ देणारी माझी पत्नी. आणखी काय हवंय देवा मला! आता आणखी काही काही नको. मी जीवनात नुसता समाधानी नाही तर तृप्त आहे. चल कधी घेऊन जातोस मला या जगातून. मी आता त्यासाठी तयार झालो आहे. तुझे उपकार कसे आणि किती मानू! भयंकर वेदना देणारा कॕन्सर सारखा आजार तू मला दिला नाहीस. मी ६७ वर्षे या सरासरी वयात सुद्धा अगदी चांगला खातोय, पितोय आणि तू दिलेला हृदयाचा तो ए.व्ही. ब्लॉक बरोबर घेऊन हळूहळू चालतोय सुद्धा. देवा, सगळी माहिती घेतलीय मी त्या पेसमेकर नामक कृत्रिम उपकरणाची आणि ठाम निर्णय घेतलाय की मी तू दिलेल्या हृदयाच्या सुंदर, नैसर्गिक यंत्रात पेसमेकर नावाच्या त्या कृत्रिम उपकरणाने काड्या घालणार नाही. कशासाठी त्या काड्या घालू मी तू दिलेल्या तुझ्या सुंदर नैसर्गिक हृदय यंत्रात? ६७ या सरासरी वयानंतरही आणखी पुढे जगण्यासाठी? छे, बिलकुल नाही. कारण तुझे हे जग मी खालून वरून चांगले बघितले आहे. लोकांची हमालीही भरपूर केली आहे. आता हे जग आणखी बघण्याची इच्छा नाही व ती हमाली करण्याची इच्छा नाही. जे दिलेस ते भरपूर दिलेस. त्याने मी तृप्त झालोय  व त्यामुळे मृत्यूची मला भीती वाटत नाही. आणि तू जर मला हार्ट अटॕक नावाच्या सोप्या पद्धतीने मारायचे ठरवले असशील तर मरण्याच्या अगोदर ॲडवान्समध्ये मी तुझे  हृदयातून आभार मानतो. चल कधी बंद पाडतोस माझे हृदय!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.२.२०२४

https://youtu.be/3FdKjFlzxdM?si=Y9_XKzLxRbCofP2-

https://youtu.be/IDhnwY5M4c4?si=kFx5Y6GS-OZN_m5o

https://youtu.be/pkEQC0EnCXE?si=o2G1Z6ha0Eo_VcYh

https://youtu.be/ip6y-Lcp9HU?si=HfWktZLI54X1hkOT

https://youtu.be/DjGGQB5tPAE?si=XYXvtfHJo-Aikid9

माझी चळवळ बंद!

माझी चळवळ बंद, बंद, बंद!

लहानपणापासून चळवळी बघत आलोय व त्यातून शिकत आलोय. या चळवळी लोककल्याणासाठी असतात का? या चळवळींतून स्वतःच्या कल्याणासाठी भांडवल निर्मिती करून शेत जमिनी विकत घेऊन सधन शेतकरी झालेले तर काहींनी कारखाने उभे करून श्रीमंत  उद्योगपती झालेले धूर्त, वस्ताद लोक मी बघितले. याला काही अपवाद निघाले पण त्यांच्या आयुष्याची वाट लागली.

अशा स्वार्थी चळवळींपासून मी लांब राहिलो. या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत. शुद्ध राजकारण, शुद्ध समाजकारण, शुद्ध अर्थकारण इतकेच काय शुद्ध ज्ञानकारणही समाजात दुर्मिळ होत गेले व आता तर ते शोधूनही सापडेनासे झालेय. धर्मकारणाविषयी तर न बोललेले बरे. स्वार्थी अर्थकारणासाठी, स्वार्थी राजकारणासाठी व तसेच समाजात अंधश्रद्धा पसरवण्यासाठी धूर्त लोक देवधर्माचा दुरूपयोग, गैरवापर करत असताना स्पष्टपणे दिसत आहे. श्रीमंत भांडवलदार, धूर्त राजकारणी व दहशतखोर गुन्हेगार यांची दुष्ट साखळी घट्ट झाल्याचे दिसत आहे. लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत होत असल्याचे दिसत आहे. पण माझी वकिली व माझी देवप्रार्थना या गोष्टी रोखू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात माझ्या ज्ञान व धैर्याच्या जोरावर मी जी काही थोडीफार सामाजिक चळवळ केली ती आता बंद. माझी ती चळवळ या भयंकर दुष्ट रेट्यापुढे इतकी कमकुवत, इतकी क्षीण ठरली की ती कोणाच्या नजरेसही आली नाही.

आजूबाजूला चाललेल्या या स्वार्थी चळवळी बघून मीही चळवळ केली व ती चळवळ म्हणजे अशिक्षित व गरीब कौटुंबिक वातावरणात खूप हिंमतीने, खूप जिद्दीने, खूप कष्टाने उच्च शिक्षण घेण्याची चळवळ. याच चळवळीतून मी वकील झालो. पण वकील बनून पोटासाठी शेवटी मला काय करावे लागले तर काही सधन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतमजूरी करावी लागली व काही श्रीमंत कारखानदार लोकांच्या कारखान्यांत जाऊन चाकरी करावी लागली.

मी या स्वार्थी चळवळी लोकांच्या दारात वकील म्हणून जाणे ही गोष्टच माझ्या उच्च शिक्षणाचा, माझ्या प्रामाणिक वकिलीचा घोर अपमान होता. पण या वकिलीत कोणाचाही भरभक्कम पाठिंबा नसल्याने मला हा अपमान सहन करावा लागला. माझ्या घराला मी वकिलीचा फलक (बोर्ड) लावला पण माझ्या घराच्या दारात माझ्या ज्ञानाला योग्य किंमत देणारे अशील आलेच नाहीत. शेवटी मलाच स्वार्थी चळवळी लोकांच्या दारात माझे ज्ञान घेऊन जावे लागले. दुसऱ्याच्या दारात जाऊन चांगल्या मालाची विक्री करू पाहणाऱ्या फिरत्या विक्रेत्याच्या मालाची लोक काय किंमत करतात? अगदी तसेच माझ्या ज्ञानाचे झाले.

काय म्हणावे माझ्या या असल्या वकिलीला? पण मी शेवटी फिरता वकील म्हणूनच प्रसिद्ध झालो. गंमत ही की अगदी कालपरवा सुद्धा एका माणसाने मला मेसेज केला की त्याचा काहीतरी कायद्याचा प्रश्न आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी मी त्याच्या नरीमन पॉईंट, मुंबई येथील कार्यालयात येऊ शकतो काय? काय म्हणावे या असल्या मागणीला? प्रश्न त्याचा, कायदेविषयक चर्चा त्याच्या प्रश्नावर करायची आणि त्यासाठी तो मला माझ्या डोंबिवलीच्या घरातून त्याच्या नरीमन पॉईंटच्या आॕफीसात बोलवतोय आणि त्यासाठी तो मला फी किती देणार यावर काही बोलत नाही? फिरता वकील म्हणून प्रसिद्ध झालेला मी वकील माझ्या भेटीची व नुसत्या चर्चेची फी कमीतकमी किती मागावी? निदान १०००० रूपये तरी पण नाही मला तो १००० रू. एवढी कमी फी सुद्धा त्याच्या दारात जाऊनही देणार नाही याची मला खात्री होती. शेवटी मी पडलो भिडस्त! म्हणून त्याला माझे खरे ते वैद्यकीय कारण सांगून शक्य नाही असे स्पष्ट सांगून टाकले. शिवाय त्याने ती तुटपुंजी १००० रू. फी त्या भेटीची व त्या चर्चेची दिली असती तरी माझे मन आता अशा फुटकळ भेटी व चर्चेला तयार नाही.

वकील असून आयुष्यभर श्रीमंतांच्या शेतात जाऊन एकतर शेतमजूरी केली किंवा त्यांच्या कारखान्यांत जाऊन चाकरी केली. भले ही मजूरी किंवा चाकरी कधी तीन तासांची, कधी दोन तासांची तर कधी एक तासाची होती तरी ती स्वतंत्र बाण्याची वकिली मुळीच नव्हती. लोकांच्या दारात जाऊन कसला वकिलीचा रूबाब दाखवणार मी? त्यांच्या दारात लांबून जाणे हे होते शारीरिक कष्ट व त्यांच्या शेतीतील किंवा कारखान्यातील कचरा माझ्या  कायद्याच्या ज्ञान कौशल्याने साफ करणे हे होते बौद्धिक कष्ट. हे दुहेरी कष्ट मी स्वार्थी चळवळी लोकांच्या शेतात व कारखान्यांत जाऊन ६७ वर्षे वयातही गेल्या महिन्यापर्यंत  करीत होतो.

पण आता परमेश्वरालाच ही गोष्ट पटली नसावी. त्याने माझ्या या दारोदारी भटकण्याच्या वकिलीला चांगलाच खुट्टा मारून ठेवलाय. खरं तर परमेश्वराने हे खूपच मस्त काम करून टाकले. त्याने हृदयाचे ठोके नियमित ठेवणारा माझ्या हृदयाचा इलेक्ट्रिक ट्रान्समिटरच बिघडवून टाकला कसला तो ए.व्ही. ब्लॉक माझ्या हृदयात निर्माण करून. आता  डॉक्टरने कसला तो पेसमेकर माझ्या हृदयात बसवण्याचा वैद्यकीय सल्ला दिलाय. कशासाठी बसवू मी ते कृत्रिम उपकरण माझ्या हृदयात? पुन्हा लोकांची ती हमाली लोकांच्या दारात जाऊन करण्यासाठी? नाही म्हणजे नाही, बिलकुल नाही! आता तो पेसमेकर नाही की ती हमाली नाही. माझी चळवळ बंद, बंद, बंद!

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.२.२०२४