विषाणू माणसाचे मित्र?
निर्जीव पदार्थांपासून सजीवांची उत्पत्ती होताना निर्जीव व सजीव यांच्या सीमारेषेवरील अर्ध निर्जीव व अर्ध सजीव असलेले प्रोटीनयुक्त असंख्य विषाणू हे घटक त्यांच्या आर.एन.ए. सह सजीवांच्या डी.एन.ए. चे मित्र कसे झाले व त्यांच्या या मैत्रीतूनच सजीवांची उत्क्रांती कशी झाली हा लाखो वर्षांपूर्वीचा उत्क्रांती इतिहास खरंच रोमांचकारक! हा इतिहास जीवशास्त्र विज्ञानाच्या जैवतंत्रज्ञान व औषधनिर्माण शास्त्र विषयांत अभ्यासला जातो. जगात कोरोना विषाणूने कहर मांडला असताना या संदर्भातील एक बातमी दिनांक २० एप्रिल, २०२० च्या टाईम्स अॉफ इंडिया वृत्तपत्रात वाचली आणि आश्चर्याने मन थक्क झाले. खरंच किती अवघड करून टाकलेय हे जीवन निसर्गाने? अशा या निसर्गाची देव म्हणून आध्यात्मिक आराधना तरी कशी करावी? पण देव संकल्पना मनातून जाता जात नाही आणि मग माझे आस्तिक मन "हे परमेश्वरा, ओम् शांती" असे म्हणतेच!
-ॲड.बी.एस.मोरे©६.५.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा