https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

देव

देव एक अमूर्त संकल्पना!

विश्व किंवा सृष्टीलाच निसर्ग म्हटले तर ठीक. पण निसर्ग म्हणजे कोणती तरी सर्वश्रेष्ठ किंवा सर्वशक्तीमान शक्ती अशी कल्पना केली की मग निसर्गाचा देव होतो. पण देव ही मूळातच अमूर्त संकल्पना आहे जी प्रत्यक्षात अनुभवता येत नाही. म्हणून तर निसर्गाचे विज्ञान वैश्विक सत्य म्हणून जगात एकच आहे, पण देवाचा धर्म जगात एक नाही. देव ही संकल्पनाच मूळात अस्पष्ट, अमूर्त (abstract) असल्याने जगात अनेक मानव समुदायांचे अनेक देवधर्म आहेत. निसर्गातून वैज्ञानिक सत्याची जाणीव होते, तर काल्पनिक देव संकल्पनेतून दैवी चमत्काराच्या अनेक धार्मिक कथा निर्माण होतात. या विविध कथा अनेक धर्मग्रंथातून वाचायला मिळतात. पण या कथामय चमत्कारांचा अनुभव प्रत्यक्षात घेता येत नाही. मी चमत्काराला नमस्कार करतो व मनातल्या मनात पुटपुटतो "हे निसर्गा, हे देवा, चमत्कार कर व सुख शांती दे"!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.४.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा