https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

2018 THOUGHTS

2018 OLD THOUGHTS OF ADV. B.S.MORE:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ बौध्दांचे नसून सर्व भारतीयांचे आहेत आणि स्वामी विवेकानंद केवळ हिंदूंचे नसून सर्व भारतीयांचे आहेत. -एड.बळीराम मोरे

ज्ञान संपन्नता, विवेक व व्यवहार चातुर्य ही बुद्धिमान मनुष्याची लक्षणे, तर ज्ञान असूया, अविवेक व मूर्खपणा ही बुद्धिहीन मनुष्याची लक्षणे! -एड.बळीराम मोरे


कैदी!

(१) किती लोकांनी "दुश्मन" नावाचा जुना हिंदी चित्रपट पाहिला आहे, ते माहित नाही. पण गुन्हेगाराला शिक्षा देताना गुन्हेगाराची पार्श्वभूमी व गुन्ह्याचे स्वरूप पाहून त्याची मानसिकता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षेचे स्वरूप कसे असावे, यावर भाष्य करणारा तो छान चित्रपट आहे.

(२) आज बऱ्याच दिवसांच्या अंतराने वकिलाचा काळा कोट व पांढरी पट्टी घालून कल्याण सेशन्स कोर्टात हजेरी लावली. दुपारी जेवणानंतरच्या वेळेत रिमांड सुरू झाला. पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींना पी.सी.आर. अर्थात पोलीस कस्टडी रिमांड किंवा ज्यांना अगोदर पी.सी.आर. मंजूर झाला होता त्यांना एम.सी.आर. अर्थात मैजिस्ट्रेट कस्टडी रिमांड, असे हुकूम कोर्टाने वकिलांच्या युक्तिवादांनंतर केले. 

(३) पोलीसांनी आरोपींना अटक केल्यानंतर जामीन होईपर्यंत ते पोलीसांचे किंवा कारागृहाचे कैदी असतात. कैद्यांमध्येही दोन प्रकार असतात. केसचा निकाल लागेपर्यंत जे आरोपी जामीनावर सुटत नाहीत त्यांना कच्चे कैदी म्हणतात आणि केसचा निकाल आरोपीच्या विरूध्द लागून कारागृहाची शिक्षा झालेल्या कैद्यांना पक्के कैदी म्हणतात.

(४) कैद्यांना रोजचे जेवण व इतर जीवनावश्यक सेवा पुरवण्यावर  सरकारला खर्च असतोच, पण त्यांच्या सुरक्षेसाठी कारागृह पोलीस व कारागृहातून कोर्टात ने आण करण्यासाठीही कारागृहाबाहेरील पोलीस यावरही खर्च करावा लागतो. 

(५) मुळातच मनुष्याच्या गुन्हेगारी कृतीला उत्पादक मूल्य नसते, पण उपद्रव मूल्य मात्र असते. वर उल्लेखित सरकारी खर्च हा त्या उपद्रव मूल्यावर केलेला सरकारी खर्च असतो. सरकारचा पैसा हा जनतेचा पैसा असतो. पण प्रगत समाजाने मान्य केलेले मानवी हक्क मनुष्याच्या उपद्रव मूल्याला सुध्दा किंमत देतात, हे विशेष! -एड.बळीराम मोरे
पैशाची ताकद इतकी मोठी आहे की ती बुद्धिहीन मनुष्याला सुध्दा सामर्थ्यशाली बनविते! -एड.बळीराम मोरे
ज्ञान रूपातील सरस्वती शुध्द असली तरी अर्थ रूपातील लक्ष्मी शिवाय ती अचल आहे! -एड.बळीराम मोरे
जीवन हे आहे असंच असतं आणि ते आहे तसंच स्वीकारावं लागतं! -एड.बळीराम मोरे
हाताची घडी तोंडावर बोट, मामाच्या खिशात फाटकी नोट! -बाळू मामा
राजकीय चर्चा!

राजकारण हा विषय शिक्षण, अर्थकारण, सत्ता प्राप्ती व सत्तेचा सदुपयोग किंवा  दुरूपयोग, भाषा, संस्कृती, विकासाचा प्रादेशिक असमतोल व त्यातून निर्माण होणारा प्रांतीयवाद, धर्म, जातपात, इतिहास, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार व त्याचे मानवी विकासातील महत्त्व, मनुष्याची स्वार्थी वृत्ती व त्यातून होणारा भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था अशा अनेक विषयांशी संबंधित असल्याने राजकीय चर्चा ही सर्वांगीण होणे आवश्यक आहे.

-एड.बळीराम मोरे


जानी, तुम्हारे पास नोट है तो मेरे पास काला कोट है! -एड.बलीराम मोरे

हल्ली लोकांना मुद्यांवर वैचारिक चर्चा करण्यापेक्षा गुद्यांवर येऊन हाणामारी करण्यातच जास्त रस असल्याचे दिसते. -एड.बळीराम मोरे

अग्नीचे रूपांतर आगीत आणि पाण्याचे रूपांतर पूरात होणे हे घातकच, अर्थात अती तिथे माती! -एड.बळीराम मोरे

निवडणूक देणग्या असोत नाहीतर कर असो, लोकशाहीला भांडवलशाहीचाच मोठा आधार! -एड.बळीराम मोरे

विश्व हे विशाल व क्लिष्ट आहे तेंव्हा कोणत्याही गोष्टीवर पटकन निष्कर्ष काढू नये! -एड.बळीराम मोरे

पर्यावरण पूरक गोष्टींना प्रोत्साहन देणारी व पर्यावरण घातक गोष्टींना प्रतिबंध करणारी व्यवस्था म्हणजे कायदा! -एड.बळीराम मोरे
आभाळच फाटलं तर ठिगळ कुठं लावणार, वातावरणच प्रदूषित झालं तर प्राणायाम काय करणार? -एड.बळीराम मोरे

निरर्थक गोष्टींत अर्थ शोधण्यापेक्षा अर्थपूर्ण गोष्टींत फायदा शोधावा, कारण फायद्याच्या गोष्टीच कायद्याच्या! -एड.बळीराम मोरे
बुद्धी प्रत्येकाकडे असते, फक्त तिला ज्ञान मिळवून ते वापरण्याची चटक लागली पाहिजे! -एड.बळीराम मोरे

अन्यायाचे फक्त स्वरूप बदलले आहे, अन्याय कायमच आहे, तेंव्हा अन्यायाचे बदललेले स्वरूप ओळखा! 
-एड.बळीराम मोरे

एका हाताने टाळी वाजत नाही!

सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही देशप्रेम वाढविणारी शालेय प्रतिज्ञा तेंव्हाच खरी ठरेल जेंव्हा सारे भारतीय भावाभावात दुजाभाव करणारी जातीपातीवर आधारित व्यवस्था फेकून देतील व सर्व भारतीयांसाठी एकच समान नागरी कायदा प्रेमाने स्वीकारतील. तोपर्यंत ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात येणे एक दिवास्वप्नच राहणार, यात शंका नाही. टाळी कधी एका हाताने वाजत नाही, हे सत्य आहे! -एड.बळीराम मोरे

उद्योगी मनाला शरीराचा नीट औद्योगिक वापर करून घेण्यासाठी कुशल व्यवस्थापक म्हणून बुद्धीची नेहमीच गरज भासते. -एड.बळीराम मोरे

विज्ञानातून कळलेल्या सृष्टीचा सकारार्थी उपयोग आणि नकारार्थी दुरूपयोग सांगणारी बौध्दिक समज, हाच अक्कलेचा कायदा! -एड.बळीराम मोरे

डोकी भडकवणाऱ्या अन्यायाच्या इतिहासाबरोबर डोक्यांनीच लावलेल्या वैज्ञानिक शोधांचा इतिहासही वाचला तर मार्ग निघेल. -एड.बळीराम मोरे

आयपीसी कलम ४९७ मध्ये व्यभिचारी स्त्रीला झुकते माप, आता सर्वोच्च न्यायालय समानतेच्या मुद्यावर विचार करतेय! -एड.बळीराम मोरे

जातीपातीवर आधारित व्यवस्था शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर दोघांनाही अमान्य असल्याने दोघांचेही अनुयायी मित्रच! -एड.बळीराम मोरे

धार्मिक व जातीय मुद्यांना कवटाळून आम्ही शैक्षणिक मागासलेपण व आर्थिक शोषण या मूलभूत मुद्यांना विसरतोय! -एड.बळीराम मोरे

जातीय तणावातून कालचे मित्र जेंव्हा आजचे शत्रू होतात, तेंव्हा जातीयतेचे विष किती जहाल आहे याचा प्रत्यय येतो. -एड.बळीराम मोरे

शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीला देव कोपला असे म्हणणे ही अंधश्रध्दा नव्हे काय? -एड.बळीराम मोरे

जीवनाचा कायदा शिकण्याच्या प्रक्रियेत मनुष्य स्वतःच स्वतःचा मार्गदर्शक बनतो. -एड.बळीराम मोरे

जगाच्या बाजारात ज्याचा त्याने अनुभव विकत घ्यायचा असतो. -आचार्य प्र. के. अत्रे 

ज्या ज्या दिवशी आपली थोडी सुध्दा प्रगती झाली नसेल तो आपला दिवस फुकट गेला असे समजावे. -नेपोलियन

थोर व्यक्ती त्यांच्या महान कार्यातून जिवंत असतात, अतार्किक वागून त्यांच्या आदर्शाचा अपमान नको! - एड.बळीराम मोरे 

पदार्थ व प्राण्यांसह माणसांचीही उपयुक्त आणि उपद्रवी किंवा निरूपयोगी अशी विभागणी करून व्यवसाय, उद्योगधंदा करा! -एड.बळीराम मोरे

इतिहासाकडे मागे वळून बघताना वर्तमान काळातले सत्य व भविष्यातील आव्हान, याचे भान हवे! -एड.बळीराम मोरे

महाराष्ट्रात जातीचे विष पेरणाऱ्या समाजकंटकांनी शिवरायांच्या महाराष्ट्र अस्मितेला गालबोट लावण्याचा विचारही मनात आणू नये. जय भवानी! जय शिवाजी! -एड.बळीराम मोरे

वाघ पुढची पाऊले टाकताना अधूनमधून मागे वळून बघतो, याला घाबरटपणा नाही तर सावधानता म्हणतात! -एड.बळीराम मोरे

माझा धर्म हिंदू व जात मराठा असली तरी जातीधर्मापलिकडची नैसर्गिक मानवताच मला अधिक भावते! -एड.बळीराम मोरे

विविध गुणवैशिष्ट्ये असलेल्या  मूलभूत पदार्थांनी (मूलद्रव्यांनी) बनलेली विविध रसायने समरसतेच्या धाग्याने एकत्र आहेत. -एड.बळीराम मोरे

सृष्टीचा सार संक्षिप्त स्वरूपात मांडताना केवढा मोठा भार शास्त्रीय लेखकावर असतो, हे त्या लेखकालाच माहीत! -एड.बळीराम मोरे

संपूर्ण सृष्टी हे विविधतेत समरसता व विभाजनात एकता असलेले, पण समरसतेत समानता नसलेले एक अजब रसायन आहे. -एड.बळीराम मोरे

अर्थकारणात बेरीज व गुणाकार आणि राजकारणात वजाबाकी व भागाकार, किती विचित्र आहे हे! -एड.बळीराम मोरे

Let us forget bad past and develop progressive Indian society to make India truly advanced country! -Adv.Baliram More

ब्रिटिशांनी आमच्यात भांडणे लावून आमच्यावर नुसते अनेक वर्षे राज्यच केले नाही, तर जाता जाता अखंड हिंदुस्थानाची फाळणी करून वाट लावली! -एड.बळीराम मोरे

फोडा, झोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची राजनीती! -एड.बळीराम मोरे

महाराष्ट्राचा महाराष्ट्रीय विकास हाच महाराष्ट्र धर्म आणि या धर्माची भाषा व संस्कृती फक्त मराठी! -एड.बळीराम मोरे

मराठी तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! जय शिवराय! -एड.बळीराम मोरे

इतिहासाचा उपयोग चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व वर्तमान परिस्थिती सुधारण्यासाठी व्हावा! -एड.बळीराम मोरे

बेजबाबदार अर्थकारण व भ्रष्ट राजकारण यांची युती झाली की कायद्याचे तीन तेरा वाजतात. -एड.बळीराम मोरे

Legislative law is Nature delegated developmental law backed by Nature's inspiration and human innovation. -Adv.Baliram More

Human development is optional, but development  law is compulsory once development option is chosen! -Adv.Baliram More

Legislative law is inexact law, never expect exact justice from it! -Adv.Baliram More

Law delegated by Nature to man is Legislative Law and law totally held by Nature is Natural Law. -Adv.Baliram More

Bachelor of Legislative Law (LL.B.)  means not Bachelor of Natural Law (NL.B.), which no man can have! -Adv.Baliram More

वर्षांमागून वर्षे येतात, दिवसांमागून दिवस जातात. २०१८ या नवीन इंग्रजी वर्षाच्या अस्सल मराठी शुभेच्छा! -एड.बळीराम मोरे
आळंदी!

(१) एका लग्नाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वरांच्या आळंदी या तिर्थक्षेत्री २०१७ ची वर्षअखेर साजरी करतोय. काल ३० डिसेंबरच्या रात्री ज्ञानोबा माऊलीचे मंदिर गाठले. आत जाऊन लांबूनच नमस्कार केला. कारण दर्शन रांग खूपच मोठी होती.

(२) मंदिरात किर्तन चालू होते. भाविक भक्ती भावाने प्रदक्षिणा, ज्ञानेश्वरी वाचन वगैरे गोष्टी करीत होते. पण तिथल्या काही गोष्टी माझ्या तार्किक मनाला पटत नव्हत्या. माझ्या मनात हवी तशी आध्यात्मिक भावना जागृत  झाली नाही. मंदिराच्या बाहेर भाविकांच्या चपलांचा ढीग पडला होता. मंदिराच्या झाडूवाल्याने त्या सगळ्या चपला त्याच्या मोठ्या झाडूने लांब नेऊन टाकल्या. त्यामुळे  मंदिराबाहेर आलेल्या भाविकांची त्यांच्या चपला शोधताना तारांबळ उडाली. खूप गचाळपणा बघायला मिळाला.

(३) मग मंदिराबाहेर येऊन इंद्रायणी  नदीकाठी आलो. कानात ते आठवणीतले गाणे वाजू लागले. "इंद्रायणी काठी, लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची"! पण इंद्रायणी नदीचे पाणी इतके अस्वच्छ आणि नदीकाठचा बकालपणा इतका भयंकर की, पटकन तो नदीकाठ सोडला. इकडे थंडी पण कडाक्याची आहे.

(४) पहिल्यांदाच आळंदी दर्शन घेत होतो. पण पुस्तकात वाचलेली आणि  कानांनी ऐकून मनात साठवलेली आळंदी काही मला बघायला मिळाली नाही. आठवड्यापूर्वीच पंढरपूरला गेलो होतो. तिथेही चंद्रभागा नदीचे वाळवंट गायब झालेले दिसले आणि नदीचे पाणी सुध्दा इतके अस्वच्छ वाटले की, त्या पाण्यात पाय सुध्दा धुवावेसे वाटले नाहीत. याच चंद्रभागा नदीच्या स्वच्छ, निर्मळ पाण्यात मी बालपणी मनसोक्त अंघोळ करायचो आणि बाहेर येऊन नदीकाठच्या वाळवंटात गरम वाळूत लोळत पडायचो. 

महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्रांच्या या दुरावस्थेला जबाबदार कोण?

-एड.बळीराम मोरे


खंडाळा घाट आणि शिंग्रोबा मंदिर!

(१) कित्येक वर्षांनी खंडाळा घाटातील जुन्या नागमोडी रस्त्यावरील प्रवासाचा आनंद घेतला. पुण्याला जाताना लागणारा तो आधुनिक मेगॉ हायवे आणि घाटातील जुना नागमोडी रस्ता यात बराच फरक आहे.

(२) खरे निसर्ग सौंदर्य याच नागमोडी रस्त्यावर अनुभवायला मिळते. आज ३० डिसेंबर, आळंदीला जाताना मुद्दाम वाकडी वाट केली. कल्याण वरून एस. टी. ने पनवेलला आलो आणि मग पनवेल वरून खोपोली मार्गे जाणाऱ्या पनवेल-लोणावळा एस.टी. ने प्रवास केला.

(३) मजा आली. वाटेत शिंग्रोबा मंदिर लागले. शिंग्रोबाला नमस्कार केला. लहानपणी अशी आख्यायिका ऐकली आहे की, म्हणे याच शिंग्रोबाने ब्रिटिशांना खंडाळा घाटातील हा अवघड रस्ता दाखविला. खरे खोटे तो शिंग्रोबाच जाणो. पण सवयीनुसार हात जोडला गेला, हे मात्र खरे. 

(४) पुन्हा बालपणाचा आनंद घेतला आणि लोणावळ्याला एस. टी. स्टँडवरच हा लेख लिहिला.

-एड.बळीराम मोरे

गिरणी कामगार संपले, मिल मालकांचा विकास झाला!

(१) गुरूवारी मध्यरात्री ज्या कमला मिल आवारात अग्नीकांड होऊन १४ जीव हकनाक जळून मेले, त्याच कमला मिलमध्ये वकिली सुरू करण्यापूर्वी मी कॉस्टींग क्लॉर्क म्हणून काम करीत होतो. माझे वडील शेजारच्याच व्हिक्टोरिया मिलमध्ये रिंग खात्यात कामाला होते. 

(२) दत्ता सामंतांचा संप झाला आणि संपूर्ण मुंबईला जागवणारे कापड गिरण्यांचे भोंगे बंद पडले. कमला मिलच्या मालकाने संपानंतर शेजारची व्हिक्टोरिया मिल विकत घेतली. गेल्या वर्षी वडिलांचे सर्विस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी कमला मिलमध्ये गेलो होतो. कमला आणि व्हिक्टोरिया या दोन्ही गिरण्यांच्या जागेचा डोळे दिपवून टाकणारा गगनचुंबी विकास पाहिला आणि मुंबईतील कापड गिरण्यांसह मुंबईतील मराठी गिरणी कामगार इतिहासजमा झाल्याची वस्तुस्थिती  जड अंतःकरणाने स्वीकारली.

(३) बहुसंख्येने असलेला मराठी कामगार ज्या जागेवर उध्वस्त झाला, त्याच जागेवर श्रीमंतांची वातानूकुलीत कार्यालये थाटली गेली आणि पब संस्कृतीचा धिंगाना नाचवणारी वलयांकित हॉटेल्स उदयास आली. 

(४) अग्नीशमन यंत्रणा असो की इतर काही, सुरक्षिततेची तिरडी बांधून करण्यात आलेला हा भकास विकास किती महागात पडलाय, हे कमला मिल अग्नीकांडाने दाखवून दिलेय. सरकार आता काय मलमपट्टी करणार तेच पहात बसायचे!

-एड.बळीराम मोरे

परेल पूल गर्दीकांडात २३ मेले आणि आता कमला मिल अग्नीकांडात १४ मेले, अर्थात सुरक्षिततेच्या तिरडीवर मुंबईचा भकास विकास! -एड.बळीराम मोरे


महाराष्ट्रात अनेक मुद्यांवर असंतोष आहे आणि हे विविध मुद्देच पुढील निवडणूकांत कळीचे मुद्दे ठरणार आहेत. -एड.बळीराम मोरे

राजकारणातील देवत्व जास्त काळ टिकत नाही हेच गुजरातच्या निकालांनी सिद्ध केले आहे. -एड.बळीराम मोरे

नोकरीतील गुलामगिरी नको, तर उद्योगधंद्यातील राजेशाही हवी!

(१) केवळ भावनांशी झोंबाझोंबी करणारे मुद्दे राजकारणात किती दिवस टिकणार, हाच कळीचा मुद्दा आहे. कारण मन भावनांच्या मागे लागून भरकटले की, मनावर काबू ठेवणारी बुद्धी काम करीत नाही हे सत्य आहे.

(२) मूठभर श्रीमंतांच्या आर्थिक गुलामगिरीत बहुसंख्येने असलेला बहुजन समाज वर्षानुवर्षे पिळवणूक सहन करतोय असे मी जेंव्हा लिहिले, तेंव्हा कोणीतरी मी कम्युनिस्ट असे माझ्यावर शिक्कामोर्तब केले. भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेला लोकशाही समाजवाद हा हुकूमशाही कडे झुकलेला कम्युनिजम कसा होऊ शकतो, हे माझ्या बुद्धी पलिकडचे आहे.

(३) भारताने संमिश्र अर्थव्यवस्था  स्वीकारली आहे. याचा अर्थ हाच की, भारतीय अर्थव्यवस्था ही अर्ध  भांडवलवादी आणि अर्ध समाजवादी आहे. पण राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच भारत हा समाजवादी देश आहे हे नमूद केल्याने भारतीय अर्थव्यवस्था ही मूलतः समाजवादी आहे, यात शंकाच नाही. याचे कारण म्हणजे भारतातील बहुसंख्य जनता ही गरीब आहे.

(४) भारताचा समाजवाद हा अमेरिकेसारख्या भांडवलशाही  देशांच्या आणि चीन सारख्या कम्युनिस्ट देशांच्या बरोबर मध्ये आहे. धार्मिक भाषेत सांगायचे झाले तर, भारताने गौतम बुध्दाचा मध्यम मार्ग स्वीकारलेला आहे.

(५) भारतातील मूठभर श्रीमंत १० एकर पेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांना आणि गरीब कुटुंबात जन्म घेऊनही प्रतिकूल परिस्थितीत शैक्षणिक यश मिळविणाऱ्यांना उद्योगपती बनविण्यासाठी कधीही हातभार लावणार नाहीत. मग भारताच्या समाजवादी सरकारने राष्ट्रीयकृत बँकांतला पैसा अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना व गरजू हुशार विद्यार्थ्यांना पुरवून त्यांना सक्षम उद्योगपती बनण्यासाठी खरे प्रोत्साहन का देऊ नये?  

-एड. बळीराम मोरे

सर्वच जातीधर्मातील लोकांची मूठभर श्रीमंतांकडून आर्थिक पिळवणूक होत असेल, तर आम्ही सर्व बहुजन एक होऊ शकतो का? -एड.बळीराम मोरे

मराठमोळे खेळ आणि लोककला लई भारी, पण आम्हाला वेड मात्र त्या क्रिकेटचे आणि हिंदी नटनट्यांचे? -एड.बळीराम मोरे

बहुसंख्य गरिबांना सतत आर्थिक गुलामगिरीत ठेवण्याचे अल्पसंख्य श्रीमंतांचे षडयंत्र कोणते राजकारण मोडून काढणार? -एड.बळीराम मोरे

सगळ्याच गोष्टी शब्दांत व्यक्त करता येत नाहीत, मग शब्दांतूनच व्यक्त होणारा कायदा सर्वसमावेशक कसा? -एड. बळीराम मोरे 

खाजगी भांडवलशाही व सार्वजनिक समाजवाद यात कोणाची सरशी होतेय? -एड.बळीराम मोरे

श्रीमंतांच्या अर्थकारणात गरीब माणसांचे व्यक्त होणे केविलवाणे असते आणि हीच ती स्वातंत्र्याची गुलामगिरी! -एड.बळीराम मोर

साधनसंपत्तीचे लोकहितकारी सार्वजनिकीकरण विरूध्द स्वहितकारी खाजगीकरण या वादावर पोळी कोण भाजतात? -एड.बळीराम मोरे

ज्या समाजात शिक्षणाची अवहेलना, उत्पादकतेचे अवमूल्यन व उपद्रवतेचा उदोउदो होतो, त्या समाजाचा विकास कठीण आहे! -एड.बळीराम मोरे

खाजगीत सरळ सुटणाऱ्या गोष्टी सार्वजनिक चावडीवर नेल्या की त्यांना सतरा फाटे फुटतात! -ॲड. बी.एस.मोरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा