https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २६ एप्रिल, २०२०

निसर्गदेव

निसर्गाला देव म्हणायचे की नाही?

निसर्ग हे सत्य जसे आपले आईवडील हे जैविक सत्य. पण आईवडिलांना मुलांनी आईवडील न म्हणता जन्मदाते स्त्री व पुरूष म्हणणे म्हणजे निसर्गाला निसर्गच म्हणणे होय. पण मुले जेंव्हा आईवडिलांना केवळ जैविक पातळीवर न ठेवता प्रेमाच्या, मायेच्या उच्च भावनिक पातळीवर आणून केवळ स्त्री पुरूषाऐवजी आईवडील म्हणतात तेंव्हा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. निसर्गाकडे अशा उच्च भावनिक दृष्टिकोनातून बघितले की निसर्गाचा देव होतो. पण निसर्ग हा निसर्गच राहतो. दृष्टिकोन बदलण्याने तो दैवी चमत्कार करणारा देव होत नाही. अशा दैववादी चमत्कारावर विश्वास ठेवणे हे सत्य सोडून मिथ्यावर विश्वास ठेवण्यासारखे आहे. निसर्गाला निसर्ग म्हणा नाहीतर उच्च भावनिक दृष्टिकोनातून  देव म्हणा तो फक्त नैसर्गिक सत्याचीच अनुभूती देतो.

-ॲड.बी.एस.मोरे©२७.४.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा