https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

विज्ञान तंत्रज्ञान

विज्ञानाची टिंगलटवाळी?

मानवी मेंदूला झालेले निसर्गाचे ज्ञान म्हणजेच विज्ञान व या ज्ञानाचा म्हणजे विज्ञानाचा मानवी मेंदूकडून करण्यात येणारा प्रत्यक्ष सराव म्हणजे तंत्रज्ञान! या तंत्रज्ञानावरील सामाजिक नियंत्रण म्हणजे कायदा, अर्थात कायदा हा तंत्रज्ञानाचाच एक भाग आहे. परंतु विज्ञान रूपात निसर्गाचे ज्ञान मिळवायला व त्याचा तंत्रज्ञान व कायद्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष सराव करायला अर्थात विज्ञानावरील आधारित  तंत्रज्ञान राबवायला मानवी मेंदूच्या काही नैसर्गिक मर्यादा आहेत. पण विज्ञान व तंत्रज्ञान विषयक स्वतःचे अज्ञान झाकून ठेवीत व मानवी मेंदूच्या त्याविषयीच्या नैसर्गिक मर्यादा लक्षात न घेता काही महाभाग विज्ञान, तंत्रज्ञान व कायद्याची टिंगलटवाळी करतात तेंव्हा त्यांची  कीव येते. विज्ञान विषयक अज्ञान व मर्यादा या गोष्टी धार्मिक अंधश्रध्दा निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात.

-ॲड.बी.एस.मोरे©२१.४.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा