https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

श्रेष्ठ विचारधारा

श्रेष्ठ विचारधारा!

विचारधारा कोणतीही असो, आस्तिक-धार्मिक असो की नास्तिक-धर्मनिरपेक्ष असो, भांडवलशाही-आर्थिक असो की साम्यवादी- आर्थिक असो, त्यामागे धूर्त राजकारण असेल किंवा ती जर लोकांना हिंसक बनवित असेल तर ती धोकादायकच मानली पाहिजे. विचाराने क्रांती होते म्हणे! पण लोकांच्या हिंसक वृत्तीला प्रोत्साहन देणारा कोणताही क्रांतिकारक विचार हा भयंकर विध्वंसकच असतो. माणसाची मूळ नैसर्गिक वृत्ती जर हिंसक असेल तर त्या मूळ  नैसर्गिक वृत्तीला अहिंसक व सुसंस्कृत वळण देणारी विचारधारा हीच श्रेष्ठ विचारधारा होय!

-ॲड.बी.एस.मोरे©२३.४.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा