निसर्ग सृष्टी व तिच्या कायदेशीर व्यवस्था!
निसर्ग सृष्टीत विविध प्रकारचे निर्जीव व सजीव पदार्थ जसजसे उत्क्रांत होत गेले तसतशी त्यांच्या अंतर्गत नैसर्गिक देवाणघेवाणीची कायदेशीर व्यवस्था तिच्यातील गुणदोषांसह उत्क्रांत होत गेली असावी व तशाच पद्धतीने निसर्ग सृष्टीत माणूस उत्क्रांत झाल्यानंतर माणसांच्या अंतर्गत सामाजिक देवाणघेवाणीची कायदेशीर व्यवस्था तिच्यातील गुणदोषांसह उत्क्रांत होत गेली असावी. या दोन्ही व्यवस्था त्यांच्यातील गुणदोषांसह आता पुढे सरकल्याने त्यांना मागे घेता येत नाही. फार तर त्यांच्यातील दोष जमेल तेवढे कमी करून या दोन्ही व्यवस्थांमध्ये थोडीफार सुधारणा करीत पुढे जाणे एवढेच उत्क्रांत झालेल्या मानवी बुद्धीला शक्य आहे. पदार्थांची निसर्ग सृष्टी व या सृष्टी मधील या दोन्ही व्यवस्था अशाच आपोआप निर्माण झाल्या की या गोष्टी परमेश्वर नावाच्या गूढ निसर्ग शक्तीने निर्माण केल्या याविषयी नास्तिक व आस्तिक लोकांत वाद आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, ८.३.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा