https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

आईवडिलांच्या इस्टेटीच्या वाटण्या कशा कराव्यात?

आईवडिलांच्या इस्टेटीच्या वाटण्या कशा कराव्यात?

भाऊ बहिणींनी आईवडिलांच्या इस्टेटीत वाटण्या मागण्यात गैर काहीच नाही. पण मुलगी दिली तिथे मेली ही पुरूषप्रधान मानसिकता अत्यंत वाईट, घरातील मायाप्रेमाची वाट लावणारी. माझ्या दोन्ही धाकटया बहिणी मोठ्या मनाच्या. माझे वडील मृत्यूपत्र न करता गेले. कारण त्यांचा विश्वास होता की मी म्हणजे त्यांचा थोरला मुलगा भावा बहिणींना योग्य न्याय देणार. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या  घराच्या चार भावंडात चार समान वाटण्या करायच्या मी ठरवले. मी शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या समर्थ होतो. पण माझा धाकटा भाऊ व त्याचे कुटुंब खूप गरीब, अशक्त होते. माझ्या दोन्ही बहिणींनी मला स्पष्ट सांगितले की "दादा, आम्ही दोघी आमच्या २५% हक्कातील फक्त निम्मा म्हणजे १२.५% हक्क घेऊ, आमच्या दोघींच्या १२.५% हक्कांचा मिळून २५% हक्क आम्हाला धाकट्या भावाला द्यायचाय म्हणजे त्याचा २५% हक्क व आमच्या दोघींचा २५% हक्क मिळून त्याचा ५०% हक्क होईल, तू तुझा २५% हक्क घे." एवढ्या समजूतदार बहिणी घरात असल्यावर कसला वाद आणि कसले भांडण? या न्याय वाटणीमुळे आम्ही चौघेही भावंडे आज उतार वयातही एक आहोत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.३.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा