https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

पंढरपूरची चंद्रभागा नदी मैली झाली!

पंढरपूरची चंद्रभागा नदी मैली झाली! 

पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची अवस्था आता भयंकर प्रदूषणामुळे बकाल झाली आहे. मैलामिश्रित पाणी, औद्योगिक वसाहतीतील केमिकल युक्त पाणी यामुळे चंद्रभागेला आता ओढ्याचे स्वरूप आले आहे. नदीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून शेवाळाने या नदीचे विस्तीर्ण पात्र व्यापले आहे. या नदीत पवित्र (?) स्नान करूनच मग पांडुरंगाचे दर्शन घेण्याची जुनी आध्यात्मिक प्रथा आता बंद पडते की काय असे वाटू लागलेय. उजनी धरण पावसाळ्यात भरले की ते पाणी भीमा नदी पात्रात सोडले जाते व मग चंद्रभागेला पूर येऊन पाणी दगडी पुलावरून वाहू लागते आणि काही काळापुरती चंद्रभागा वरून स्वच्छ झाल्यासारखी वाटते पण पूर ओसरला की पुन्हा घाणीचे साम्राज्य नदी पात्रात पसरते. लहानपणी मी पंढरपूरला असतानाची चंद्रभागा नदी पापी लोकांनी अशी मैली केली मग मी तिकडे आता कशाला जाऊ? -बाळू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा