https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

नानी!

नानी!

पंढरपूर जवळील मगराची वाडी या खेडेगावातील रूक्मिणी नानीचा (माझ्या चुलतीचा) १ जानेवारी हा वाढदिवस लक्षात राहण्यासारखा. १९४२ ते २०२४ म्हणजे ८२ वर्षे जगली म्हणजे भरपूर जगली. नश्वर शरीराचा अंत होणे हे नैसर्गिक वास्तव असल्याने ते स्वीकारावेच लागते. मगराच्या वाडीची नानी पंढरपूरातच जन्मली, पंढरपूरातच तिचा नानाबरोबर (माझा धाकटा चुलता कै. संदिपान मारूती मोरे) विवाह झाला (पंढरपूरातील कै. सुंदरा मावशीचा मुलगा कै. पांडुरंग शंकर गायकवाड या माझ्या चुलत चुलत्याच्या दारात घातलेल्या लग्न मंडपात नानीचे लग्न लागले हे मला आठवते) व पंढरपूरातच तिचा मृत्यू होऊन चंद्रभागा नदीतच तिची राख, तिच्या अस्थी विसर्जित झाल्या हा एक योगायोग म्हणावा लागेल. नानी वरळी बी.डी.डी. चाळीतल्या छोट्या खोलीत नानाबरोबर आमच्या एकत्र कुटुंबात राहिली, मग पुढे वरळी, कोळीवाड्यात राहिली जिथे मी जाऊन हक्काने तिच्या हातचे जेवण करायचो. पण तिच्या शेवटच्या काळात मी तिची भेट घेऊ शकलो नाही याची खंत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!

-बाळू, २८.८.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा