https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ३१ मे, २०२४

माणूस निसर्गाच्या जास्त जवळ!

तंत्रज्ञान व सामाजिक कायदा हे निसर्ग विज्ञानाचेच भाग, माणूस निसर्गाच्या जास्त जवळ!

निसर्गाच्या मूलभूत साधनसंपत्तीचा मानवाकडून दोन प्रकारे वापर केला जातो. एक म्हणजे जसा आहे तसा मूळ नैसर्गिक वापर व दोन म्हणजे सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापर. या सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापराला तंत्रज्ञान असे म्हणतात. निसर्गाच्या साधनसंपत्तीचे हे दोन्ही प्रकारचे मानवी वापर हे निसर्ग विज्ञानाचे भाग आहेत. निसर्गाच्या साधनसंपत्तीचा जसा आहे तसा मूळ नैसर्गिक वापर हा निसर्ग विज्ञानाचा भाग आहे हे समजायला जास्त बुद्धी चालवायची गरज नाही. पण या साधनसंपत्तीचा सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापर अर्थात तंत्रज्ञान हा सुद्धा निसर्ग विज्ञानाचाच भाग आहे हे मान्य करावेच लागेल. कारण तो तसा नसता तर निसर्गाने मानवाच्या माध्यमातून तंत्रज्ञान हे अस्तित्वातच येऊ दिले नसते. निसर्ग विज्ञानात निसर्ग पर्यावरणीय शिस्त अंतर्भूत असल्याने ती मूलभूत नैसर्गिक शिस्त तंत्रज्ञानात सुद्धा समाविष्ट आहे.

नैसर्गिक साधनसंपत्तीच्या मालकी हक्काचे व त्या संपत्तीच्या मूळ नैसर्गिक व सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापराचे आंतरमानवी सामाजिक वाटप व देवाणघेवाण सामाजिक शिस्तीने व सामाजिक बंधनाने करण्याची सुधारित मानवी पद्धत किंवा प्रक्रिया म्हणजे सामाजिक कायदा. हा सामाजिक कायदा सुद्धा निसर्ग विज्ञानाचाच भाग आहे. तो जर निसर्ग विज्ञानाचा भाग नसता तर निसर्गाने मानवाच्या माध्यमातून सामाजिक कायद्याची निर्मिती होऊच दिली नसती. निसर्ग विज्ञानात निसर्ग पर्यावरणीय शिस्त अंतर्भूत असल्याने ती मूलभूत नैसर्गिक शिस्त सामाजिक कायद्यात सुद्धा समाविष्ट आहे.

पृथ्वीवर निसर्गाने उत्क्रांत केलेला माणूस ही पृथ्वीवरील निसर्गाच्या पर्यावरणीय साखळीत/उतरंडीत (इकाॕलाॕजिकल पिरॕमिड) सर्वात वरच्या टोकाची निसर्ग निर्मिती होय. या माणसाला निसर्गाने एवढी प्रचंड बुद्धिमत्ता का दिली व मूळ निसर्ग विज्ञानातच त्याच्यासाठी तंत्रज्ञान व सामाजिक कायद्याची सोय करून का दिली हे त्या निसर्गालाच माहित. मात्र यावरून एक तार्किक अनुमान काढता येते की मनुष्य प्राणी हा निसर्गाला सर्वात जास्त प्रिय प्राणी आहे. पण या लाडोबाने निसर्गावरच कुरघोडी केली तर मात्र निसर्ग या लाडोबा माणसाला त्याचा जबरदस्त इंगा दाखविल्याशिवाय राहणार नाही. माणूस निसर्गाच्या जास्त जवळ आहे हे मात्र नक्की!

-©ॲड.बी.एस.मोरे, १.६.२०२४

निसर्ग हे परमेश्वराचे घर!

निसर्ग हे परमेश्वराचे घर!

निसर्ग हे परमेश्वराचे प्रचंड मोठे घर आहे. हे घर कधीही नष्ट होत नाही कारण परमेश्वर कधी नष्ट होत नाही. अर्थात निसर्ग कायम आहे व त्यात असलेला परमेश्वरही कायम आहे. फक्त निसर्ग घरातील सामान कायम त्याच स्वरूपात रहात नाही. विविध प्रकारच्या त्या घर सामानाचे स्वरूप परिवर्तन क्रियेतून सतत बदलत राहते. आपण सर्व माणसे सुद्धा या परिवर्तनशील सामानाचाच एक भाग आहोत. त्यामुळे आपणही सतत बदलत आहोत. कारण परिवर्तन हा परमेश्वरी निसर्ग घराचा नियम आहे. त्यामुळे आपण आपले सामान जोर लावून कायम नीटनेटके ठेवण्याचा व ते तसे नीट राहिलेय का हे परत परत रोखून बघण्याचा मंत्रचळी अट्टाहास सोडायला हवा!

-©ॲड.बी.एस.मोरे, ३१.५.२०२४

गुरुवार, ३० मे, २०२४

माता!

व्यभिचारी विवाहबाह्य लैंगिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाला कचरा कुंडीत फेकून देणाऱ्या माता बघायला मिळतात व अविवाहितेच्या लैंगिक छळातून जन्माला आलेल्या बाळाला आईचे प्रेम देण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या माताही बघायला मिळतात. मनुष्याच्या  मानसिकतेचा, स्वभावाचा थांगपत्ता लागणे कठीण आहे. -ॲड.बी.एस.मोरे (संदर्भः लोकसत्ता बातमी, दि. ३०.५.२०२४)

न्यायाचे प्रतीक!

आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेले न्यायाचे प्रतीक असलेले रोमन न्यायदेवीचे चित्र बदलून सिंहाचा चेहरा असलेले भारतीय न्यायदेवदेचे चित्र भारतीय न्यायसंस्थेने स्वीकारण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत ते महाराष्ट्रातून बार कौन्सिल आॕफ महाराष्ट्र अँड गोवा च्या माध्यमातून हे विशेष. आम्ही तर रोमन न्यायदेवीचे चित्र बघतच वकिली केली. आता भारतातील नवोदित वकील भारतीय न्यायदेवतेचे हे नवीन प्रतीक बघत वकिली करतील असे दिसतेय. -ॲड.बी.एस.मोरे (संदर्भः लोकसत्ता बातमी, दि.३०.५.२०२४)

प्रदूषण, प्रदूषण आणि प्रदूषण!

प्रदूषण, प्रदूषण आणि प्रदूषण!

पर्यावरण संरक्षण कायद्यात जल, वायू, ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या तरतूदी आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ, हरित न्यायालय यंत्रणा याच कायद्याच्या भाग आहेत. खरं तर वनस्पती व मानवेतर पशुपक्षी निसर्गात प्रदूषण करीतच नाहीत. अतीशहाणा माणूसच त्याच्या नको त्या उद्योगामुळे निसर्गात विविध प्रकारचे प्रदूषण करतो. निसर्गाच्या विविधतेत या मानवनिर्मित विविध प्रदूषणाची भर पडलीय व जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतसे हे मानवनिर्मित प्रदूषण वाढत गेले व ते वाढतच आहे. जंगली प्राण्यांच्या अधिवासात अतिक्रमण करणे काय, किंवा मानवी निवासस्थानांसाठी व औद्योगिक कारखान्यांसाठी जंगले जाळून, डोंगर फोडून पर्यावरणाचा नाश करणे काय, हे सर्व उद्योग म्हणजे प्रदूषणाचे उद्योग. हे प्रदूषण  नको त्या मानवी उद्योगामुळे होत असल्याने त्याचे औद्योगिक प्रदूषण असे नामकरण केले पाहिजे. हे औद्योगिक प्रदूषण जल, वायू, ध्वनी प्रदूषणाच्या पलिकडे गेलेय. रात्रीचा वाढत चाललेला मानवनिर्मित प्रखर प्रकाश हा प्रकाश प्रदूषणाचा नवीन प्रकार. रस्त्यावरील वाहतूक कोंडी काय किंवा दृष्टीस पडणाऱ्या मानवी वर्तनाचे इतर भयंकर प्रकार काय, हे सर्व दृष्टी प्रदूषणाचे प्रकार. मानवी प्रदूषणाचा पुढचा विचित्र प्रकार म्हणजे मानवी विचार प्रदूषण.  समाजात धार्मिक, वांशिक, जातीय, भाषिक, प्रांतिक द्वेष पसरवणारे संकुचित मानवी विचार हे तर समाज स्वास्थ्य बिघडवणारे भयंकर विचार प्रदूषण होय. हे सर्व अनैसर्गिक व म्हणूनच बेकायदेशीर होय. उलट्या बुद्धीचा बेअक्कल माणूस स्वतःच्या फालतू, बेकायदेशीर विचार, वर्तनाला रोखण्यासाठी स्वतःच कायद्याची निर्मिती करतो आणि पुन्हा स्वतःच तो कायदा मोडतो आणि वर पुन्हा स्वतःच्या कुशाग्र, तीक्ष्ण बुद्धीचा टेंभा मिरवतो. काय म्हणावे या मानवी मूर्खपणाला?

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.५.२०२४

बुधवार, २९ मे, २०२४

ग्लोबल वार्मिंग!

ग्लोबल वार्मिंग!

ग्लोबल वार्मिंग हे तसे उपयुक्त नाहीतर थंड पृथ्वीवर सजीव सृष्टी जगूच शकणार नाही ही ग्लोबल वार्मिंगची सकारात्मक गोष्ट कळली. पण हे वार्मिंग वाढत गेले तर पृथ्वीवरील पाण्याची जास्तीतजास्त जास्त वाफ होऊन बारमाही पाऊस पडून येणाऱ्या व उंच पर्वतावरील बर्फ वितळून त्यातून येणाऱ्या गोड्या पाण्याच्या पुरांची भीती आहेच व त्यातून सृष्टीचक्रही बिघडू शकतो. पृथ्वीवर माणसाची लोकसंख्या वाढत जाण्याने त्याच्या उच्छवासातून बाहेर पडणारा कार्बन वायू वाढत जाण्याने निर्माण होणाऱ्या ग्लोबल वार्मिंग पेक्षा या वाढत्या लोकसंख्येच्या औद्योगिक उपदव्यापामुळे ग्लोबल वार्मिंग वाढण्याची भीती जास्त आहे. वाढती लोकसंख्या म्हणजे वाढती आंतरमानवी स्पर्धा, जंगले जाळून व डोंगर तोंडून बिल्डरांकरवी निर्माण होत जाणारी सिमेंटची जंगले व वाढते उद्योग यामुळे ग्लोबल वार्मिंग वाढू शकते. माणूस हा त्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे विध्वंसक होत चाललाय नाहीतर तो निसर्गाला पूरक असा चांगला बुद्धिमान प्राणी आहे. पण तो लोकसंख्या वाढवत चाललाय म्हणजे त्याची बुद्धी कुजत चाललीय असे वाटते व ही गोष्ट पर्यावरण संरक्षण कायद्याच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.५.२०२४

माध्यमाचे विपणन महत्व!

माध्यमाचे विपणन महत्व!

ज्याप्रमाणे वस्तू उत्पादन केंद्र हे वस्तूंची सार्वजनिक विक्री करून त्यातून करोडो रूपयांचा नफा कमावण्याचे माध्यम असते तसे चित्रपट निर्मिती केंद्र हे चित्रपट कलाकारांच्या कलेची सार्वजनिक विक्री करून त्यातून करोडो रूपयांचा नफा कमावण्याचे व चित्रपट निर्मिती केंद्राच्या त्या नफ्यातून कलाकारांनी कोट्यवधी रूपयांची कला फी मिळविण्याचे माध्यम असते. तसेच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या बाजारात नेत्यांना उभे करून लाखो, करोडो लोकांची पसंती मिळवून राजकीय सत्ता प्राप्त करण्याचे माध्यम असते. अर्थात तुम्हाला जर भरपूर पैसा, सत्ता व मानसन्मान मिळवायचा असेल तर तुमच्याकडे विशिष्ट कामाचे नुसते ज्ञान, कौशल्य असून उपयोग नसतो तर तुमचे ते ज्ञान, कौशल्य असंख्य लोकांपर्यंत पोहोचवणारे प्रबळ सार्वजनिक माध्यम तुमच्या सोबत असणे गरजेचे असते. फेसबुक, यु ट्युब सारख्या समाज माध्यमांचा उपयोग सुद्धा आता चाणाक्ष निर्मिती केंद्रे, व्यावसायिक लोक त्यांची उत्पादने, सेवा हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यातून आर्थिक नफा कमावण्यासाठी करतात ही गोष्ट आता लपून राहिली नाही. अशी सार्वजनिक माध्यमे तुमच्याकडे जेवढी जास्त तेवढी तुमची नफ्याची संधी मोठी आणि या संधीसाठी तुमच्याकडे एखाद्या कामाचे नुसते ज्ञान, कौशल्य असून उपयोग नसतो तर जवळ भरपूर पैशाचे भांडवल लागते. निस्वार्थी समाजसेवी भावनेने समाज माध्यमातून समाज प्रबोधक लेखन करून ज्ञान, विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करणारी माणसे अशा बाजारात मूर्ख ठरतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.५.२०२४

मंगळवार, २८ मे, २०२४

सिलेक्टिव्ह व इलेक्टिव्ह मेरिट!

सिलेक्टिव्ह व इलेक्टिव्ह मेरिट!

शैक्षणिक ज्ञान संस्थांच्या परीक्षांचे निकाल म्हणजे ज्ञानसाधनेचे सिलेक्टिव्ह मेरिट तर लोकशाही राज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल म्हणजे लोकप्रियतेचे इलेक्टिव्ह मेरिट, या दोन्ही मेरिटना एकत्र नांदवायचे म्हणजे कायद्याची तारेवरची कसरत! -ॲड.बी.एस.मोरे
२८.५.२०२४

शैक्षणिक ज्ञान संस्थांच्या परीक्षांचे निकाल म्हणजे ज्ञानसाधनेचे सिलेक्टिव्ह मेरिट आणि लोकशाही राज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल म्हणजे लोकप्रियतेचे इलेक्टिव्ह मेरिट या विचारांवर आधारित ॲड. बी.एस. मोरे यांनी दिलेला हा विचार खूपच महत्त्वाचा आहे. यातून असे स्पष्ट होते की, शैक्षणिक प्रणालीमध्ये गुणवत्ता आणि ज्ञान यांना अधिक महत्त्व दिले जाते, ज्यामुळे निवडक विद्यार्थ्यांना संधी मिळते. तर, लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेच्या मताने निर्णय घेतला जातो, ज्यामध्ये लोकप्रियता महत्त्वाची ठरते.

या दोन प्रणालींना एकत्र नांदवणे म्हणजेच, शैक्षणिक गुणवत्ता आणि लोकशाही प्रक्रियेतून मिळणाऱ्या लोकप्रियतेचा समन्वय साधणे हे कायद्याच्या चौकटीत राहून करणे खूपच कठीण आहे. याचा अर्थ असा की, दोन्ही प्रणालींचे गुणधर्म वेगवेगळे असताना त्यांना एकत्रितपणे व्यवस्थापित करणे हे एक आव्हान आहे. यासाठी संतुलित आणि न्याय्य दृष्टिकोनाची आवश्यकता असते ज्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकास होऊ शकेल.

-चॕट जिपीटी (कृत्रिम बुद्धिमत्ता), २८.५.२०२४

वेळेचे बंधन!

वेळेचे बंधन!

वेळेच्या बंधनाचे ओझे घेऊन आयुष्यभर धावल्यानंतर उतार वयात हे ओझे थोडे सुद्धा नकोसे होते! -ॲड.बी.एस.मोरे, २८.५.२०२४

या वाक्यातील संदेश अत्यंत सार्थक आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध प्रकारचे बंधन, जबाबदाऱ्या आणि ओझे येतात. कामाच्या ठिकाणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आणि सामाजिक बांधिलकी यामुळे व्यक्तीला वेळेचा वापर फारच काटेकोरपणे करावा लागतो. पण, जेव्हा वय उताराला लागते, तेव्हा हे बंधन आणि ओझे टाकून, निवांत आणि शांतीपूर्ण जीवन जगण्याची इच्छा निर्माण होते. हे वाक्य हेच सांगते की, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर व्यक्तीला मनःशांती, आराम आणि बंधनमुक्त जीवनाची गरज असते.

-चॕट जिपीटी (कृत्रिम बुद्धिमत्ता),
२८.५.२०२४

एकटा राहणारा माणूस!

एकटा राहणारा माणूस!

एकटा राहणारा माणूस सगळ्यांना नीट ओळखून बसल्यावरच एकटे राहणे पसंत करतो, अनुभवातून शहाणा झालेला असा माणूस एकटे राहण्याच्या त्याच्या निर्णयावर ठाम असतो! -ॲड.बी.एस.मोरे, २८.५.२०२४

हे वाक्य एकटेपणाच्या निवडीबद्दल एक महत्वपूर्ण आणि विचारप्रवण दृष्टिकोन व्यक्त करते. एकटा राहणारा माणूस हा समाजातील विविध व्यक्ती आणि त्यांच्या वागणुकीचा अनुभव घेऊनच एकटे राहणे निवडतो. त्याच्या या निर्णयामागे अनुभवाने आलेले ज्ञान असते. अनेकदा समाजातील दांभिकता, खोटेपणा किंवा मतलबीपणा यामुळे असे निर्णय घेतले जातात. एकटेपणाच्या निवडीमागे आत्मनिर्भरता, स्वातंत्र्य आणि मानसिक शांततेची इच्छा असते. त्यामुळे, असा माणूस एकटेपणातही समाधानी आणि समाधानी राहू शकतो, आणि तो त्याच्या निर्णयावर ठाम असतो.

-चॕट जिपीटी (कृत्रिम बुद्धिमत्ता), २८.५.२०२४

सोमवार, २७ मे, २०२४

वाटणी!

हिस्स्याची वाटणी चोरीच्या मालाची असो, राजकीय सत्तेची असो, भांडवली संपत्तीची असो की आईबापाच्या इस्टेटीची असो, शेवटी वाटणी ही वादाला कारणीभूत होतेच, वाटणीचे वाद सुरूवातीला दिवाणी स्वरूपाचे असले तरी पुढे त्यांना हिंसक स्वरूप लागून त्यांचे रूपांतर फौजदारी गुन्ह्यांत होऊ शकते, इतकी ही वाटणी भयंकर असते. -ॲड.बी.एस.मोरे

व्यवस्था बदलता येत नाही, तिच्यात काही सुधारणा करता येतात!

व्यवस्था बदलता येत नाही, तिच्यात काही प्रमाणात सुधारणा करता येतात!

निसर्गाची मूळ व्यवस्था कायम तीच आहे व अनंत काळापासून ती आहे तशीच चालू आहे. मानव समाज हा निसर्गाचाच भाग असल्याने समाज व्यवस्था ही सुद्धा निसर्ग व्यवस्थेचा भाग आहे. याच तर्काने मूळ निसर्ग व्यवस्था जर बदलता येत नसेल तर मूळ समाज व्यवस्था कशी बदलता येईल? जर मूळ निसर्ग व समाज व्यवस्था बदलताच येत नसेल तर ती आहे तशी स्वीकारण्याशिवाय पर्याय रहात नाही. हे वास्तव स्वीकारताना मूळ व्यवस्थेतील आभासी बदलाचे जे माकड चाळे, ज्या माकड चेष्टा व ज्या मंत्रचळी कृती काही लोकांनी चालवल्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सुज्ञपणा होय. या माकड चाळ्यांत, माकड चेष्टांत व मंत्रचळी कृतीत सुज्ञ माणसाने प्रत्यक्ष सोडा पण अप्रत्यक्ष सुद्धा भाग घेऊ नये. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत त्यांना कौतुकाचा असो की टीकेचा कोणताच प्रतिसाद देऊ नये.

मूळ निसर्ग व समाज व्यवस्था जरी बदलता येत नसली तरी माणसाने त्याची बुद्धी नीट वापरली तर याच मूळ व्यवस्थेचा माणसाला त्याच्या सोयीनुसार वापर करता येतो किंवा तिचे नीट व्यवस्थापन करता येते. याला व्यवस्थेतील सुधारणा असे म्हणता येईल. या सुधारणा काही प्रमाणातच करता येतात. प्रत्येक माणूस आपआपल्या वैयक्तिक बुद्धी व परिस्थितीनुसार त्याच्या स्वतःच्या सोयीसाठी, फायद्यासाठी अशा मर्यादित सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत असतो. हा प्रयत्न स्वतःपुरता म्हणजे स्वार्थी असतो आणि म्हणून तर एक माणूस दुसऱ्या माणसाला स्वतः विकसित केलेली बौद्धिक तंत्रे, क्लृप्त्या सांगत नाही. यालाच तर धंद्याची गुपिते (बिझिनेस सिक्रेट्स) असे म्हणतात.

स्वतःपुरता स्वार्थ याचा व्यापक अर्थ स्वतःचे कुटुंब, स्वतःचे नातेवाईक, स्वतःचा समाज, स्वतःचे राज्य व स्वतःचे राष्ट्र असा हळूहळू वाढत जातो. माणूस त्याच्या बुद्धीने मूळ निसर्ग व समाज व्यवस्थेत स्वतःच्या सोयीसाठी ज्या तांत्रिक, सामाजिक सुधारणा करतो त्या सुधारणा जर मूळ व्यवस्थेच्या मूलभूत ढाच्याला, रचनेला घातक असतील तर अशा सुधारणा सामाजिक कायद्याने रोखल्या पाहिजेत नाहीतर विनाश अटळ आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.५.२०२४

रविवार, २६ मे, २०२४

व्यवहारात चुकीला माफी नाही!

व्यवहारात चुकीला माफी नाही!

निसर्ग व्यावहारिक आहे तसा मानव समाजही व्यावहारिक आहे. निसर्ग व समाज व्यवहारांमध्ये नैतिकतेचे व आध्यात्मिकतेचे प्रमाण किती याचा बारीक शोध घेतल्यास ते अत्यल्प असल्याचे दिसून येईल. खरं तर, कायदा आध्यात्मिक किंवा नैतिक नसून व्यावहारिक आहे. नैसर्गिक व्यवहारांचे निसर्ग नियम जसे निसर्गाने घालून दिले आहेत तसे सामाजिक व्यवहारांचे समाज नियम समाजाने घालून दिले आहेत. निसर्ग व समाज नियमांचा एकत्रित संच म्हणजे कायदा. अर्थात कायद्यात निसर्ग कायदा व समाज कायदा अशा दोन्ही कायद्यांचा समावेश होतो.

एखादा माणूस आध्यात्मिक दृष्ट्या कितीही देवश्रद्ध व पापभिरू असेल व नैतिक दृष्ट्या कितीही नीतीमान व निष्पाप असेल पण तो जर निसर्ग व समाज व्यवहाराच्या दृष्टीने मूर्ख असेल तर त्याला निसर्ग व समाज माफ करीत नाही. निसर्ग व्यवहारात निसर्ग कल्याण व निसर्ग सुरक्षितता हे कायद्याचे दोन उद्देश असतात तसे समाज व्यवहारात समाज कल्याण व समाज सुरक्षितता हे कायद्याचे दोन उद्देश असतात. कायद्याच्या या उद्देशांना बाधा आणणारे कोणतेही कृत्य हे बेकायदेशीर असते म्हणजेच ते अव्यावहारिक असते. माणसाच्या आध्यात्मिकतेला व नैतिकतेला जर कायद्यात एवढे महत्व असते तर देवश्रद्ध व नीतीमान माणूस कितीही अव्यावहारिक वागला तरी निसर्ग व समाज दोघांनीही त्याला उदार मनाने माफ केले असते. पण तसे नाही. व्यावहारिक चुकीला कायद्यात माफी नाही अर्थात व्यवहारात चुकीला माफी नाही.

पण व्यवहार शिकवणारा व व्यवहार बंधनात ठेवणारा निसर्ग व समाज कायदा खरंच किती लोकांना आवडतो? मुळात जनावरे असोत की माणसे, त्यांना बंधनात राहणेच आवडत नाही. त्यांना मुक्त जीवन हवे असते. म्हणून तर संधी मिळाली की स्वार्थी माणूस त्याच्या क्षणिक स्वार्थासाठी कायदा तोडायला तयार असतो. सगळ्याच माणसांचा हा सर्वसाधारण कल असतो. पण सर्वसामान्य माणसे याबाबतीत घाबरून मागे राहतात व बेरकी माणसे याबाबतीत पुढे जातात एवढाच काय तो फरक. याचे प्रमुख कारण म्हणजे व्यावहारिक चूक करणारा सर्वसामान्य माणूस नेहमी कायद्याच्या कचाट्यात अगदी सहज सापडतो व त्याची लवकर सुटका होत नाही. धनदांडग्या, बेरक्या लोकांचे तसे नसते. तरीही कायदा कोणालाच सोडत नाही. तो कोणी मोडला की मग कोणी कितीही मोठा असो कायदा त्याला त्रास देतोच.

असा हा जबरदस्त व्यावहारिक कायदा स्वैर स्वातंत्र्याचे मुक्त जीवन जगू इच्छिणाऱ्या व बेरक्या लोकांना नकोसा वाटतो. म्हणून तर कंपनी संचालकांना प्राॕडक्शन मॕनेजर, मार्केटिंग मॕनेजर, आर्थिक हिशोब सांभाळणारे चार्टर्ड अकौंटंट ही व्यवस्थापक मंडळी उत्पादक माणसे वाटतात तर कंपनी व इतर कायद्यांचे व्यवस्थापन करणारा कंपनी सेक्रेटरी व कंपनीला कायदेविषयक सल्ला देणारा वकील हे कायदा तज्ज्ञ या भांडवलदार लोकांना कामात उगाच अडथळा आणणारी अनुत्पादक माणसे वाटतात. या भांडवलदार मंडळींचे काय घेऊन बसलात पण सर्वसामान्य माणसे सुद्धा वकिलाला फी देऊन वकिलाच्या माध्यमातून व्यावहारिक करार, दस्तऐवज करण्याचे टाळतात व असले मसुदे संगणकात साठवून बसलेल्या कायद्याचे अर्धवट ज्ञान असलेल्या टपरीवरील एखाद्या टायपिस्ट कडून कायद्याचे करार, दस्तऐवज स्वस्तात करून घेतात आणि मग पुढे ही मंडळी कशात अडकली, फसली की वकिलाकडे रडत येतात. 

लक्षात ठेवा, कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल. व्यवहार ज्ञान म्हणजेच कायद्याचे ज्ञान. व्यवहारी बना याचा अर्थ कायदेशीर वागा. तुम्ही कितीही देवधर्म करा, कितीही मोठे समाजकार्य करा, हल्लीच्या समाज माध्यमावर कितीही मित्र संख्या वाढवा व समाज माध्यमावर कितीही समाजप्रबोधक लेखन करा जर तुमच्या मूर्खपणातून तुमच्या कडून एखादी जरी व्यावहारिक चूक झाली तर तुमची वाहवा करणारी मंडळी, मित्र इतकेच काय तुमच्या अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा तुमच्या जवळपासही फिरकणार नाहीत. बाकी अशा प्रसंगात बाहेरचा समाज तर तुमच्या आयुष्याच्या चिंधड्या उडवायला टपूनच बसलेला असतो. कारण व्यवहारात चुकीला माफी नाही!

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.५.२०२४

शनिवार, २५ मे, २०२४

निसर्ग हाच मोठा चमत्कार!

निसर्ग हाच मोठा चमत्कार आहे, त्याची उत्पत्ती, त्याची रचना, त्या रचनेतील वैशिष्ट्यपूर्ण विविधता, त्या रचनेचे चलनवलन व नियंत्रण करणारी नियमबद्ध निसर्ग व्यवस्था, या सर्व वैज्ञानिक गोष्टी समजायला खूप कठीण व बघायला खूप आश्चर्यकारक आहेत, बुद्धिमान माणूस, मानव समाज व मानव समाज व्यवस्था या सुद्धा निसर्ग रचना व निसर्ग व्यवस्थेचाच भाग आहेत, या कठीण व आश्चर्यकारक वैज्ञानिक गोष्टी निसर्गाने मानवी बुद्धीला खाद्य पुरविण्यासाठी तर निर्माण केल्या नाहीत ना? -ॲड.बी.एस.मोरे

नैतिक गोष्ट, कायदेशीर गोष्ट फरक!

नैतिक गोष्ट म्हणजे मानवतेला धरून असलेली गोष्ट, अशी नैतिक गोष्ट ही कायदेशीर असतेच असते, पण कायदेशीर गोष्ट नैतिक असेलच असे नाही, कायद्यातील पळवाटा शोधून एखादा गुन्हेगार संशयाचा फायदा घेऊन कायद्याच्या न्यायालयात निर्दोष सुटला व कायद्याच्या राज्यात मुक्तपणे फिरला म्हणून तो चारित्र्याने नैतिक ठरत नाही, कितीतरी भ्रष्ट व व्यभिचारी माणसे त्यांचे अनैतिक चारित्र्य कायद्याच्या चौकटीत बसवून समाजात थोर, प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून निर्लज्जपणे मिरवत असतात आणि जर त्यांच्या अनैतिक चारित्र्यावर कोण बोलले तर त्याच्यावर करोडो रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावाही टाकतात एवढी यांची अब्रू मौल्यवान असते! -ॲड.बी.एस.मोरे

वास्तवात जगताना!

वास्तवात जगताना!

निसर्गाची विविधता हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या विविधतेला निसर्गाच्या विविध ज्ञान शाखा चिकटलेल्या आहेत. माणूस त्याच्या जन्मानंतर साधारण तीन वर्षांनी बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालये या खालच्या पायरीपासून वरच्या पायरी पर्यंतच्या शैक्षणिक संस्थांतून या ज्ञान शाखांचे शिक्षण घेतो व पुढे तरूण, प्रौढ वयात या ज्ञानाचा वापर करून हळूहळू सरावाने त्यात विशेष प्रावीण्य, कौशल्य मिळवून तज्ज्ञ होतो. माणसे येतात, जातात पण नैसर्गिक विविधतेला चिकटलेल्या या ज्ञान शाखा व त्यांना संलग्न असलेल्या विविध शैक्षणिक संस्था व कार्यशाळा कायम राहतात.

माणसे निसर्गाच्या विविधतेचे ज्ञान मिळवून व त्यात कौशल्य प्राप्त करून या विविधतेची एकमेकांशी देवाणघेवाण करतात व निसर्गाचे वास्तव जगतात. ते जगण्यासाठी माणसे एकमेकांवर अवलंबून असतात व म्हणून तर विविधतेची आंतरमानवी देवाणघेवाण होते. माणूस स्वयंपूर्ण असता तर अशी देवाणघेवाण शक्य झाली नसती.

माणसे निसर्गाचे वैविध्यपूर्ण वास्तव जगताना त्यात काल्पनिक रंग भरून  हे वास्तव मनोरंजक करतात. हे वास्तव जगताना येणारा प्रत्यक्ष अनुभव व घडणाऱ्या प्रत्यक्ष घटना माणसे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतात व त्यातून एकमेकांशी शाब्दिक संवाद साधतात. ही मानवी अभिव्यक्ती नैसर्गिक असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा माणसाचा मूलभूत हक्क कायद्याने काही अटी शर्तींसह मान्य केला आहे.

निसर्गाच्या वैविध्यपूर्ण वास्तवाचा अनुभव घेत माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत अधिकार प्रत्येक मनुष्याला आहे. इथे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार अभिप्रेत आहे, जनावर म्हणून जगण्याचा नव्हे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.५.२०२४

आध्यात्मिक प्रार्थनेने वास्तव बदलत नाही!

आध्यात्मिक प्रार्थनेने वास्तव बदलत नाही!

आपण सर्वजण निसर्ग व्यवस्थेचे व त्या व्यवस्थेअंतर्गत आपण आपल्या बुद्धीने आपल्या सोयीसाठी निर्माण केलेल्या समाज व्यवस्थेचे गुलाम आहोत. निसर्ग व्यवस्थेत वाघ हरणाला जबड्यात पकडून ठार मारून खातो तर समाज व्यवस्थेत मूठभर धनदांडगे सर्वसामान्यांची सर्व बाजूंनी पिळवणूक करून आणखी धनश्रीमंत व बलदांडगे होतात. ही समाज व्यवस्था निसर्गाच्या बळी तो कानपिळी या निसर्ग नियमावर आधारित निसर्ग व्यवस्थेला पूरक आहे. नैतिकता व कायद्याचे राज्य या संकल्पनेची वरवरची रंगरंगोटी केल्याने निसर्ग व समाज व्यवस्थेतील कटू वास्तव बदलत नाही. इथे बौद्धिक प्रश्न हा आहे की, परमेश्वराच्या आध्यात्मिक प्रार्थनेने वाघाच्या जबड्यातील हरणाची सुटका करता येत नसेल तर त्या प्रार्थनेचा उपयोग काय? पण असो, जे आहे ते आहे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.५.२०२४

शुक्रवार, २४ मे, २०२४

काय चाललंय काय?

काय चाललंय काय?

या जगात आजूबाजूला ज्या गोष्टी बघायला मिळतात त्यातून काय चाललंय काय हा प्रश्न माझ्या मनात उत्पन्न होतो. कदाचित माझी बुद्धी उतार वयात नीट काम देत नसल्यामुळे असे प्रश्न माझ्या मनात निर्माण होत असतील.

या प्रश्नास कारण की, आजूबाजूला जो तमाशा चाललाय त्या तमाशात एखादी प्रसिद्ध नटी साधा नाही तर तब्बल तीनचारशे कोटी रूपयांचा नेकलेस गळ्यात घालून त्याचे जाहीर प्रदर्शन करते. याच तमाशात हजारो कोटीची संपत्ती बाळगणारे प्रसिद्ध खेळाडू, कलाकार त्यांच्या जाहिरातीतून जंगली रमी सारखे आॕनलाईन गेम्स खेळायला लोकांना उद्युक्त करतात.

याच तमाशात एखादा अती श्रीमंत उद्योगपती त्याच्या मुलांच्या लग्नात करोडो रूपयांचा चुराडा करून त्याच्या श्रीमंतीचे जाहीर प्रदर्शन करतो. याच तमाशात एखादा श्रीमंत  उद्योजक त्याच्या लाडक्या पोरास अल्पवयातच महागडी कार खेळणे म्हणून चालवायला देतो. याच तमाशात एखादा खंडणीखोर भाई गळ्यात सोन्याच्या चैनी व बोटांत हिऱ्यांच्या अंगठ्या घालून मिरवतो व अप्रत्यक्षपणे बेकार पोरांना स्वतःचा महान आदर्श घालून देतो. आणि हा सगळा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघत त्याचे खूप कौतुक वाटून सर्वसामान्य माणसे टाळ्या वाजवत बसतात आणि याच महान लोकांच्या गुलामीत पिढ्यानपिढ्या आयुष्य पुढे ढकलत राहतात.

काय चाललंय काय?

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.५.२०२४

गुरुवार, २३ मे, २०२४

विकासाचा फुगा!

विकासाचा फुगा!

आधुनिक माणूस साधनांऐवजी सुविधांत जास्त अडकलेला दिसत आहे. साधनसुविधा शब्दाचा अर्थ मूलभूत नैसर्गिक साधनांना पूरक मदत करणाऱ्या मानवनिर्मित कृत्रिम सुविधा असा आहे. उदा. हवेतील प्राणवायू हे मूलभूत नैसर्गिक साधन तर रूग्णास करण्यात येणारा याच प्राणवायूचा कृत्रिम पुरवठा ही पूरक कृत्रिम सुविधा होय. तसेच मानवी मेंदूची बुद्धिमत्ता हे मूलभूत नैसर्गिक साधन तर संगणक यंत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.,आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ही पूरक कृत्रिम सुविधा होय.

माणसांनी त्यांच्या सोयीसाठी मूळ नैसर्गिक साधनांतून अनेक सुविधा निर्माण केल्या. या सुविधा सतत वाढवत राहण्याचा मानवी बुद्धीला मंत्रचळ (ओसीडी) लागल्याचे दिसत आहे. या सुविधांचा फुगा वाढवणे म्हणजेच मानवी विकास या भ्रमात राहून माणसे हा फुगा फुगवत पुढे चालली आहेत. सुविधांचा विकास फुगा जेवढा वाढेल तेवढ्या प्रमाणात  पैशाचा साठा वाढवावा लागतो. कारण वाढलेल्या सुविधांची आंतर मानवी देवाणघेवाण करण्यासाठी माणसांना कृत्रिम माध्यम म्हणून पैसा लागतो. 

माणूस या कृत्रिम सुविधांच्या मागे लागून त्याचे नैसर्गिक स्वत्व हरवत चालल्याचे दिसत आहे. सुविधांचा फुगा व पैशाचा भुगा या भुग्यांमध्ये सर्वसामान्य माणसे भरडली जात आहेत. याचे मूलभूत कारण काय तर मूलभूत नैसर्गिक साधने मूठभर भांडवलदार व मूठभर राजकारणी मंडळींनी स्वतःच्या ताब्यात ठेवली आहेत. पण भविष्यात कधीतरी सुविधा विकासाचा हा मोठा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही असे वाटते. कदाचित असे वाटणे हा माझा या भुग्यातील भ्रम असेल. पण माझ्या या विकास फुग्याच्या लेखाने लोकांना निदान विचार करायला भाग पाडले तरी खूप मिळवले.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.५.२०२४

ज्येष्ठांची मैत्री?

ज्येष्ठांची मैत्री?

लहान व तरूण वयात वाढलेली मित्र संख्या उतार वयात कमी होते की वाढते? शाळा, कॉलेजातील मैत्री ही अपरिपक्वतेची किनार असलेली मैत्री. पण हेच जुने मित्र वृद्धापकाळी जगाचे प्रगल्भ ज्ञान व जीवनाचा परिपक्व अनुभव बरोबर घेऊन जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकमेकांना स्वतःचा शहाणपणा सांगण्यात व एकमेकांच्या आयुष्याचा हिशोब मांडण्यात धन्यता मांडतात. कशी वाढेल व टिकेल अशी मैत्री? म्हणून मी स्वतः वयाने ज्येष्ठ असूनही अशा ज्येष्ठ मित्रांनाच काय पण इतर ज्येष्ठ लोकांना सुद्धा टाळतो कारण एकतर त्यांच्या गप्पा म्हणजे एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्या किंवा स्वतःच्या शहाणपणाचा गर्व. मी याच गोष्टी साठी फोन संपर्कातील व्हॉटसॲप माध्यम टाळतो कारण समोरच्याला माझा एखादा लेख शेअर करावा तर कदाचित त्याच्या मनात "आलाय मोठा शहाणा" असा भाव निर्माण होण्याची भीती असते. म्हणून मी फेसबुक, लिंकडइन सारख्या समाज माध्यमातून व्यक्त होणे पसंत करतो कारण तिथली मंडळी मला तशी अनोळखी असतात व मी प्रसारित केलेल्या बौद्धिक विचारावर कुणी जास्त शहाणपणा केला तर त्याला तिथल्या तिथे ब्लॉक करण्याची अशा समाज माध्यमावर छान सोय असते. वृद्धापकाळी तुम्हाला तुमचे ज्ञान, अनुभव व बौद्धिक विचार मुक्तपणे शेअर करण्याची जिथे सोय नाही तिथे ज्येष्ठ मैत्री शक्य नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.५.२०२४

बुधवार, २२ मे, २०२४

कल्पना विश्वात जगताना!

कल्पना विश्वात जगताना!

जगातील बऱ्याच गोष्टी आपल्याला शेवटपर्यंत स्वप्नवत राहतात. त्या प्रत्यक्षात अनुभवता येत नाहीत व म्हणून या स्वप्नवत गोष्टी आपण कल्पनेत जगत असतो. मी मुंबईत जन्मलो, बालपणाचा काही काळ पंढरपूर वास्तव्यात घालवला असला तरी सगळे आयुष्य मुंबईत जगलो व जगतोय. पण मी अजूनही संपूर्ण मुंबई तिच्या काना कोपऱ्यासह बघितली नाही. मग संपूर्ण महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश त्याच्या  प्राकृतिक व सांस्कृतिक विविधतेसह बघण्याची गोष्ट दूरच. जगाची सफर तर अशक्यच. इथे महाराष्ट्र बघायला पैसा नाही आणि भारत, जग काय बघणार मी. नशीब यु ट्युब, टी.व्ही. च्या माध्यमातून या सर्वांचे थोडे थोडे दर्शन तरी घडतेय. पण प्रत्यक्षात तिथे जाऊन त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे व माध्यमातून त्यांचे अप्रत्यक्ष दर्शन घेणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. माणसाला पृथ्वी नीट अनुभवता येत नाही आणि मग अंतराळ विश्वाचा काय अनुभव घेणार? यातील बऱ्याच गोष्टींपासून आपण फार लांब असतो. त्यांच्या विषयी आपल्याला खूप कमी ज्ञान असते. आपल्याला धड पृथ्वी नीट समजत नाही, अंतराळातील ग्रह, तारे आपल्या डोळ्यांना नीट दिसत नाहीत आणि आपण या सर्व विश्व पसाऱ्यात परमेश्वर शोधत बसतो? परमेश्वर या तर्काभोवती आयुष्यभर चाचपडत बसतो? पण तो परमेश्वर शेवटपर्यंत स्वप्नवत राहतो. शेवटी आपणास परमेश्वरा विषयीच्या काल्पनिक जगात जगण्याशिवाय पर्याय नसतो. नास्तिक लोक मात्र परमेश्वर तर्क, कल्पना यापासून स्वतःला दूर ठेवतात. आस्तिक मात्र परमेश्वराचे प्रत्यक्षात दर्शन कधीच घडले नाही तरी त्याच्या श्रद्धेला शेवटपर्यंत धरून राहतात. इथे प्रत्यक्षात असलेल्या जगाचा बराच भाग आपल्याला कल्पनेत जगावा लागतोय मग न दिसणाऱ्या त्या परमेश्वराचे काय घेऊन बसलात? परमेश्वर दिसत नाही, कळत नाही, तो दिसणार नाही व कळणारही नाही, हे वास्तव आहे. हे वास्तव स्वीकारा आणि स्वीकारता येत नसेल तर त्यापासून दूर जा पण स्वतःला आनंदी ठेवा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.५.२०२४

मंगळवार, २१ मे, २०२४

विश्वशक्ती!

उर्जेशिवाय कोणताही पदार्थ शून्य, विश्व शून्य!

निसर्गातील पदार्थांना उर्जा वाहक साधने असे म्हणता येईल. उर्जेची विविध स्वरूपे/प्रकार आहेत व त्यानुसार काही पदार्थ काही उर्जा प्रकारांना जवळ करतात तर काही पदार्थ काही उर्जा प्रकारांना दूर लोटतात. उदाहरणार्थ, सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनिअम हे पदार्थ विजेचे (विद्युत उर्जेचे) सुवाहक आहेत तर लाकूड, काच, रबर हे पदार्थ विजेचे (विद्युत उर्जेचे) दुर्वाहक आहेत. दुर्वाहक म्हणजे पदार्थ व उर्जा यांची विजोड जोडी व विजोड जोडीचा संसार होत नाही. फुलांमध्ये नरम उर्जा जाणवते तर आगीत गरम उर्जा जाणवते. उर्जेचे स्वरूप/प्रकार वेगळा व उर्जा वाहकही वेगळा असा हा एकंदरीत प्रकार आहे. मानवी शरीर तेच पण तरूण शरीरातील उर्जा व वृद्ध शरीरातील उर्जा यात फरक जाणवतो. शरीर मरते म्हणजे काय होते तर सजीव शरीराने धारण केलेली उर्जा शरीराला सोडून जाते. याच उर्जेने जिवंत शरीरातील हृदय धडधडते, मेंदू कार्यरत राहतो व शरीर सक्रिय होऊन हालचाल करते. अशी ही उर्जा विश्वात आहे व सजीव मानवी शरीरातही आहे. फक्त तिचे स्वरूप तिच्या पदार्थ वाहकानुसार बदलते. विश्व उर्जेला विश्व शक्ती किंवा विश्व चैतन्य असेही म्हणता येईल. देवधर्माचे अध्यात्म या विश्व चैतन्याशी बरेचसे निगडीत आहे. सूर्य एक पदार्थ आहे व त्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्व उर्जा धारण केलीय जी सारखी आग ओकतेय व या आगीतून उष्णता, प्रकाश बाहेर पडतोय. पृथ्वी हाही एक पदार्थच आहे व पृथ्वीनेही विश्व उर्जा धारण केली आहे. उर्जेशिवाय कोणताही पदार्थ शून्य, विश्व शून्य!

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.५.२०२४

भगवान जगन्नाथाचा रथ!

भगवान जगन्नाथाचा रथ!

निसर्गाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघताना मी त्याच्याकडे दुभती गाय म्हणून बघतो तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघताना जगन्नाथाचा रथ म्हणून बघतो. खरं तर जगन्नाथ रथाची ही कल्पना माझे फेसबुक मित्र श्री. सुधीर एन. इनामदार (सोलापूर जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त निबंधक) यांनी फेसबुक वर लिहिलेल्या "नोकरीतील मान मरातब" या लेखावरून सुचली.

भगवान जगन्नाथाचा निसर्गरथ मोठा विलक्षण आहे. हा रथ प्रत्यक्षात दिसतो पण या रथात अदृश्य रूपात बसलेला भगवान जगन्नाथ मात्र प्रत्यक्षात दिसत नाही. पण त्याची जाणीव मात्र मनाला अप्रत्यक्षपणे होते. या विलक्षण निसर्गरथाला ओढण्यासाठी जगन्नाथाने दिलेले विविध स्वरूपाचे वैज्ञानिक दोरखंड हेही विलक्षण आहेत. या विविध दोरखंडाचे शिक्षण म्हणजे विविध ज्ञानशाखा. त्यात शिक्षण घेऊन पुन्हा त्यात कौशल्य प्राप्त करावे लागते.

विविध दोरखंडाच्या विविध ज्ञान शाखांत शिक्षण घेऊन पुन्हा त्यात कौशल्य प्राप्त करणारी आपण माणसे म्हणजे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, डॉक्टर्स, उद्योजक, व्यावसायिक, व्यवस्थापक, मंत्री, शासकीय अधिकारी, न्यायाधीश, वकील, कामगार, कर्मचारी, विविध कलाकार, खेळाडू ही सर्व मंडळी जगन्नाथाचा हा निसर्गरथ आयुष्यभर ओढत असतात. जगन्नाथाची ही रथ यात्रा अविरत चालू असते. ती कधी थांबत नाही.

जगन्नाथाचा हा रथ ओढता ओढता जी मंडळी वयानुसार थकतात ती निवृत्त होऊन या रथयात्रेतून बाजूला होतात. त्यांची जागा नव्या दमाची, नव्या उत्साहाची नवीन पिढी घेते. रथयात्रेतून निवृत्त झालेली वृद्ध पिढी नव्या तरूण पिढीकडून जगन्नाथाचा रथ कसा ओढला जातोय हे लांबून बघते व अधूनमधून नव्या पिढीला रथ ओढण्याचे मार्गदर्शन करते. पण ही निवृत्त वृद्ध पिढी रथयात्रेत घुसून नव्या पिढीच्या कामात लुडबूड करीत नाही. अशाप्रकारे नव्या पिढीकडून ओढला जाणारा जगन्नाथाचा महारथ व भगवान जगन्नाथाची रथयात्रा लांबून बघत असतानाच निवृत्त वृद्ध पिढी मृत्यूने संपते व अनंतात विलीन होऊन भगवान जगन्नाथाला जाऊन मिळते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.५.२०२४

निसर्ग एक दुभती गाय!

निसर्ग एक दुभती गाय!

निसर्ग हा कोणाला परमेश्वर वाटतही असेल. पण मी निसर्गाला दुभत्या गायीच्या रूपात बघतो. निदान पृथ्वी तरी मला दुभती गाय म्हणजे गोमाता वाटते जी तिच्या लेकरांना सतत दूध देऊन त्यांना उपाशी मरू देत नाही.

या दुभत्या गायीचे दूध काढणारी व पिणारी असंख्य माणसे पृथ्वीवर जन्मतात, दूध पिऊन जगतात व शेवटी जीवनचक्रात मरतात. पण गाय मात्र आहे तिथेच दूध पुरवत कायम आहे. पण हळूहळू मनुष्य नावाच्या तिच्या लेकरांची संख्या वाढत गेली. अर्थात लोकसंख्या वाढत गेली आणि तिच्या लेकरांत तिचे दूध काढण्याची (उत्पादन कामाची) व ते दूध पिण्याची (उपभोग घेण्याची) स्पर्धा वाढत गेली.

तिच्या लेकरांना तिनेच बुद्धी दिलीय. पण ही लेकरे निर्बुद्ध होऊन हावरट झाली व मर्यादेच्या बाहेर जाऊन  त्यांची लोकसंख्या व स्पर्धा वाढवत गेली. बेअक्कली कुठली. त्यांच्या जन्मदात्या व पोषणकर्त्या आईलाही तिच्या मर्यादा आहेत एवढी साधी अक्कल असू नये या हावरट पोरांना.

यातली काही शहाणी, अतीशहाणी पोरं तर मूळ प्रश्न समजून घेऊन त्याचे मूळ उत्तर शोधायचे सोडून एकमेकांना बुड नसलेली तत्वज्ञाने पाजळत, वरवरचे उपदेश करीत फिरत आहेत.

ही पोरं म्हातारी झाल्यावर मात्र दूध काढण्याच्या व दूध पिण्याच्या या स्पर्धेतून निवृत्त होऊन शांत होतात. पण त्यांनी निर्माण केलेली पोरं पुन्हा नव्या उमेदीने व मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत भाग घेऊन या आईला हवे तसे ओरबाडण्यास सुरूवात करतात. धन्य धन्य या पोरांची!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.५.२०२४

सोमवार, २० मे, २०२४

मला त्यावेळी खरंच करोना झाला होता का?

मला खरंच त्यावेळी करोना झाला होता का?

करोना कहर काळात मी चांगला धडधाकट होतो. कसलाच थंडी, ताप, खोकला, अंगदुखी काहीच नव्हते. पण मला मस्ती म्हणून मी डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या पुलावर करोना टेस्ट करणाऱ्या पोरांजवळ गेलो आणि करा माझी टेस्ट असे त्यांना बिनधास्त म्हणालो. कारण मला करोना निघणारच नाही अशी माझी खात्री होती. त्या पोरांनी माझ्या नाकात एक काडी खुपसली. माझ्या नाकाला झिणझिण्या आल्या आणि मी शिंकलो. मग त्या पोरांनी ती काडी एका मशीन मध्ये घातली आणि थोड्या वेळाने मला सांगितले "अहो काका, करोना पाॕजिटिव्ह रिपोर्ट आहे, आता सरकारच्या आरोग्य खात्यात तुमचे नाव दाखल झाले, तुम्ही सरकारी रूग्णालयात दाखल व्हा नाहीतर अॕम्ब्युलन्स घरी येऊन तुम्हाला उचलून नेतील". हे ऐकून मी जाम टरकलो. माझी मस्ती माझ्या अंगाशी आली. अशाप्रकारे माझ्या स्वतःच्या मस्तीमुळे करोना रूग्ण म्हणून मी तावडीत सापडलो. आता काही इलाज नव्हता. मग मी सरळ सरकारी रूग्णालयात गेलो. तिथे रांगेत बरीच माणसे उभी होती. माझा नंबर आल्यावर मी डॉक्टरला म्हटले की "अहो डॉक्टर, त्या रेल्वे पुलावरील पोरांनी माझी करोना टेस्ट करताना नीट काळजी घेतलेली दिसत नाही, मी तर तब्बेतीने चांगला आहे, काहीतरी गडबड झाली असेल त्या पोरांकडून, तुम्ही तर डॉक्टर आहात, डबल चेक म्हणून तुम्ही माझ्या नाकात पुन्हा ती काडी घालून दुसरी करोना टेस्ट करा ना माझी"! डॉक्टर म्हणाले "काही गरज नाही, तुम्हाला करोना आहे, पण घाबरायचे कारण नाही, टॕब्लेट ब्लॕक गोल्ड, टॕब्लेट सी व्हिटॕमिन व टॕब्लेट डी३ कॕल्शियम या तीन गोळ्या पंधरा दिवस घ्यायच्या, घरात स्वतःला कोंडून घ्यायचे, घरात बायको आहे ना मग तिच्यापासून अंतर ठेवायचे, तिच्याकडून आतल्या दरवाजातून जेवणाचे ताट घेऊन हॉलमध्ये फक्त  एकट्याने जेवायचे, बाहेर जायचे नाही कारण तुमच्या करोनाचा संसर्ग इतरांना होईल, पंधरा दिवसांनंतर दाखवायला या"! झाले माझी घर कैद (क्वाॕरंटीन) सुरू झाली. घरात मी मस्त आराम करीत होतो. टी.व्ही. वर पिक्चर्स बघत होतो. खरं तर तेव्हा मला काहीच झाले नव्हते. मी ठणठणीत होतो. ११ डिसेंबर २०२० रोजी त्या रेल्वे पुलावरील पोरांनी माझ्यावर करोना पाॕजिटिव्ह म्हणून शिक्का मारला आणि त्यानंतर मी  स्वतःला १५ दिवस कैद (क्वाॕरंटीन) करून घेतले. त्या तीन टॉनिकच्या सरकारी गोळ्या १५ दिवस घराच्या  कैदेत घेतल्यावर २६ डिसेंबर २०२० रोजी त्या सरकारी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी मला न तपासताच वरवर बघून मी करोना मुक्त झालो असे सरकारी वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. ते प्रमाणपत्र बक्षीस म्हणून रूबाबात खिशात कोंबले व मस्त घरी आलो व नंतर बाहेर मोकळा फिरू लागलो. ही माझी सत्यकथा आहे. त्याचे तत्कालीन वैद्यकीय पुरावे मी या लेखासोबत जोडत आहे. पण मला अजूनही कळले नाही की खरंच मला त्यावेळी करोना झाला होता का?

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.५.२०२४

रविवार, १९ मे, २०२४

धाकट्या बहिणीला पत्र!

धाकटया बहिणीला थोरल्या भावाचे पत्र!

प्रिय भगिनी,

तुझ्या डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांनी तुला हे जग प्रत्यक्षात कसे आहे हे दाखवले आणि मन नावाच्या तुझ्या सहाव्या ज्ञानेंद्रियाने तुला परमेश्वर नावाच्या अलौकिक शक्तीची सहावी जाणीव करून देत अप्रत्यक्ष जाणिवेतला परमेश्वर समोर उभा केला. पण याच परमेश्वराने, तुझ्या तरूण वयात तुझी शक्ती व्यवस्थित असताना, तुझा उत्साह चांगला असताना तुझ्या  जीवनसाथीला म्हणजे तुझ्या पतीला अचानक तुझ्यापासून हिरावून घेतले आणि तरीही या परमेश्वराचे तू गुणगाण गातेस? त्याला उलट जाब का विचारत नाहीस?

ज्यांचे सर्व काही नीट चालले आहे त्यांना खुशाल त्या परमेश्वराची जपमाळ ओढत बसू देत पण तुझे काय? तू आयुष्यात कोणतीही वाईट करणी केली नाहीस. इमाने इतबारे संसार केलास. तुझ्या मुलांना असेल त्या कठीण परिस्थितीत वाढवलेस आणि तरीही हा परमेश्वर तुलाच असली भयानक शिक्षा करतोय? आणि उतार वयातही पुन्हा आणखी त्रास देतोय?

तुझ्या मुलांचा संसार चांगला चाललाय यात आई म्हणून तुला मोठे समाधान असणे हे ठीक आहे. पण या परमेश्वराने तुझा संसार मध्येच मोडला त्याचे काय करायचे? "दो हंसो का जोडा बिछड गयो रे" हे गाणे म्हणत रडत बसायचे का? की त्या परमेश्वराच्या नावाने खडे फोडत बसायचे? दुसरे करतात म्हणून तूही त्यांची री ओढत बसायचे का?

हा परमेश्वर कोणाला चांगला तर कोणाला वाईट. त्याचा थांगपत्ता ना कोणाला लागला आणि ना कोणाला कधी लागेल. याचा अर्थ असा नव्हे की परमेश्वरावर श्रद्धा ठेवू नये. जरूर ठेवावी. पण भोळी, आंधळी श्रद्धा ठेवू नये. चांगली डोळस श्रद्धा ठेवावी. बुद्धीने नीट विचार करून वास्तव नीट समजून घ्यावे. ज्या लोकांची बुद्धी भ्रमिष्ट झालीय अशा लोकांच्या नादी लागू नये. ही माणसे वास्तव नीट समजून न घेता विचित्र वागतात व स्वतःबरोबर दुसऱ्यांनाही त्रास देतात जो त्रास कधीकधी फार भयंकर असतो. अशा लोकांचा विचार करून स्वतःचे आयुष्य बिघडवू नकोस. लोकांच्या नाकावर टिच्चून मस्त जग. तुझा जीवनसाथी आता परत येणार नाही. पण सगळं काही संपलेले नाही. कितीतरी चांगल्या गोष्टी अजूनही तुझी सोबत करीत आहेत. तुझी चांगली मुले, चांगल्या सुना, चांगली नातवंडे यांचा चांगला गोतावळा व आधार तुला आहे. वृद्धाश्रमातील लोकांचे दुःख तुझ्या वाट्याला आले नाही त्याबद्दल त्या परमेश्वराचे थोडे आभार मान. पण त्याचे जास्त आभार बिलकुल मानू नकोस. कारण याच परमेश्वराने तरूण वयात तुझा जीवनसाथी तुझ्यापासून हिरावून नेलाय. नुसत्या जगाशीच नव्हे तर परमेश्वराबरोबरही व्यवहारी वाग कारण जगाचा व्यवहार त्यानेच निर्माण केलाय. तेव्हा व्यवहारी बन व खंबीर मनाने मस्त जग!

-बाळू दादा, १९.५.२०२४

शनिवार, १८ मे, २०२४

परमेश्वराची अप्रत्यक्ष अनुभूती!

निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव व परमेश्वर शक्तीची अप्रत्यक्ष अनुभूती!

डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा या मानवी शरीराच्या पाच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमांतून मानवी मेंदूला निसर्गाची प्रत्यक्षात जाणीव होते अर्थात निसर्ग प्रत्यक्षात अनुभवता येतो, ज्ञात होतो परंतु मानवी शरीराला चिकटलेल्या व मानवी मेंदूशी संलग्न असलेल्या या पाच ज्ञानेंद्रियांशिवाय मानवी मेंदूत आणखी एक सहावे ज्ञानेंद्रिय असते त्याला मन असे म्हणतात. या मनाला पाच ज्ञानेंद्रियांचा आधार घेऊन जसा निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो तसा या पाच ज्ञानेंद्रियांचा आधार न घेताही अगदी स्वतंत्रपणे निसर्गातील परमेश्वरी शक्तीची अप्रत्यक्ष अनुभूती मिळू शकते जर मानवी मनाची त्या महान शक्तीवर म्हणजे परमेश्वरावर तेवढी मोठी भावनिक श्रद्धा असेल तर. परमेश्वराची आध्यात्मिक अनुभूती म्हणजे मानवी मनाला होणारे परमेश्वराचे अप्रत्यक्ष ज्ञान. मानवी मनाच्या अशा अप्रत्यक्ष अनुभूतीला किंवा अप्रत्यक्ष ज्ञानाला विज्ञान मान्यता देत नाही कारण अशी अप्रत्यक्ष अनुभूती, अप्रत्यक्ष ज्ञान प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध करता येत नाही. त्यामुळे निसर्गाच्या प्रत्यक्ष अनुभवालाच कायम चिकटून राहणाऱ्या विज्ञानाला परमेश्वर कायम अज्ञात राहिला आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.५.२०२४

MYTH OF DEVELOPMENT!

DEVELOPMENT REMAINS MYTH WHEN BASIC SYSTEM REMAINS CONSTANT!

The technology & sociology are significant methods of intelligent use of the basic system of Nature by human beings to serve their selfish objects of convenience and advantage. But they do not change the basic system of Nature. If anybody feels any such change at human instance it is myth and feel good fantasy. Let human development be not turn into feel good fantasy. This is what happens when the class of few rich capitalists grow rich & rich while mass of human population fall down poor & poor. Let we not boast about any such development. Any such development is just myth and feel good fantasy and let us not make big noise about such development. Even otherwise, technology and sociology boosted developmental changes are only temporary changes when the basic system of Nature remains constant. Let be you ever so high with intake of high rich food and high rich medicine, let you be ever so highly regular and punctual in your physical exercise,  let you use all shrewd tactics to become high rich economic lord and high powerful political lord in human society and let you make thousands of prayers before almighty power of Nature called God, your all these technological, sociological & spiritual exercises go futile because they cannot stop natural biological process of your body aging & body sinking which is fixed pattern of basic system of Nature which remains constant all time in stereotyped and dictatorial way. In short, the development remains myth when basic system remains constant.

-©Adv.B.S.More, 18.5.2024

शुक्रवार, १७ मे, २०२४

सूक्ष्मातून सूक्ष्माकडे!

सूक्ष्मातून सूक्ष्माकडे!

एका सूक्ष्म कणाच्या महास्फोटातून (बिग बँग थिअरी) विश्वाची निर्मिती झाल्यावर विश्व प्रसरण पावत गेले व विश्वाचा पसारा वाढत गेला व तो वाढतच आहे असा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. आकुंचित विश्वाकडून प्रसारित विश्वापर्यंतचा विश्वाचा हा प्रवास अलौकिक आहे. पण प्रसरण पावलेल्या अशा या विश्वाचा उलट प्रवास (रिटर्न जर्नी) सुरू होऊन हे विश्व पुन्हा आकुंचित होत जाऊन त्याच्या मूळ सूक्ष्म कणात जाऊन बसेल का याविषयी निश्चित सांगता येत नाही. परंतु सूक्ष्मातून पुन्हा सूक्ष्माकडे या अगोदर सुलट्या व मग उलट्या प्रवासाचा अनुभव सजीव सृष्टीतील सर्वच सजीवांना घेता येतो व म्हणून तो माणसालाही घेता येतो.

पुरूष बीज व स्त्री बीज यांच्या एका छोट्या संयुक्त थेंबातून मनुष्याचा जन्म होतो. हा जन्म म्हणजे सूक्ष्म कणातून झालेली मानवी जीवन विश्वाची झालेली निर्मिती. हळूहळू बालपण, तरूणपण व प्रौढावस्था ही मानवी जीवनाची चढती कमान म्हणजे मानवी जीवन विश्वाचे चढते प्रसरण. पण त्यानंतर उतार वय सुरू होऊन मानवी जीवन विश्व आकुंचित होत जाते.

मनुष्याची वृद्धावस्था हा सूक्ष्मातून पुन्हा सूक्ष्माकडे नेणाऱ्या उलट्या जीवन प्रवासाचा एक त्रासदायक अनुभव आहे. या अनुभवात शरीर व मेंदूची हालचाल, सक्रियता मंदावते. आयुष्यभर साठवलेल्या ज्ञान व अनुभवाचा साठा वृद्धापकाळात मेंदूला जड होतो. मेंदूची उतरकळा शरीरालाही लागू होते. मेंदू बरोबर शरीरही जड व संथ होत जाते. उतार वयात मेंदू पूर्वीसारखा अनेकविध गोष्टींकडे सहजपणे लक्ष देऊ शकत नाही. अर्थात एकाच वेळी समरसता व एकाग्रता साधणे मेंदूला कठीण होऊन जाते. मग संपूर्ण आयुष्यभर जमवलेल्या अनेक गोष्टी वृद्ध मेंदूला त्रास देत राहतात. त्यातून आवश्यक तेवढ्या निवडक गोष्टीवरच लक्ष देण्याचा वृद्ध मेंदू प्रयत्न करतो. तरीही बऱ्याच वेळा अशा निवडक छोट्या गोष्टी सुद्धा परिपक्व वृद्ध मेंदूला पूर्वीसारख्या झेपत नाहीत.

मनुष्याचे सरासरी वय (आयुष्यमान) साधारण ६५ ते ७० वर्षे असले तरी काही माणसे ८०, ९० व नव्वदीच्या पलिकडेही जगतात. यात निसर्गाचा काहीसा दुजाभाव असला तरी तो चमत्कार नसतो. ते अनुवंशशास्त्र व जैविक विज्ञान आहे. अशाप्रकारे वय लांबणे म्हणजे मनुष्य जीवनाचा सूक्ष्मातून सूक्ष्माकडे जाण्याचा उलट प्रवास थोडासा लांबणे. अशाप्रकारे  लांबलेल्या आयुष्यात अशा काही तुरळक माणसांची शारीरिक व मेंदू सक्रियता लांबलेली दिसते. परंतु त्रासदायक उलट प्रवासाच्या विचित्र अनुभवातून सर्वांनाच जावे लागते. तिथे निसर्ग दुजाभाव करीत नाही. प्रसरणातून आकुंचनाकडे उलट चाललेल्या या त्रासदायक प्रवास अनुभवाचा शेवट माणसाच्या मृत्यूने होते. सूक्ष्मातून सुरू झालेला मानवी जीवनाचा प्रवास अशाप्रकारे शेवटी सूक्ष्मातच संपतो. शेवटी काय तर सगळं शून्य!

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.५.२०२४

गुरुवार, १६ मे, २०२४

रियल इस्टेट कंपनी लॉयर!

बांधकाम कंपनीचा (रियल इस्टेट कंपनी) कायदा सल्लागार म्हणून वकिलाला अशाप्रकारचे विविध प्रश्न करार कायदा, मालमत्ता हस्तांतरण कायदा, दस्तऐवज नोंदणी कायदा, भाडे नियंत्रण कायदा, सहकारी गृहनिर्माण संस्था कायदा, मालमत्ता विकास नियमन कायदा, झोपडपट्टी पुनर्वसन कायदा, जुन्या इमारतींचा विकास कायदा, पालिका कायदा, म्हाडा कायदा अशा अनेक कायद्यांच्या माध्यमातून सोडवावे लागतात. -ॲड.बी.एस.मोरे

कारण की!

कारण की!

कोणत्याही गोष्टीला कारण असते. ठोस कारणाशिवाय ठोस कृती शक्य नाही व ठोस कृतीशिवाय ठोस परिणाम शक्य नाही. शिक्षण, कला, क्रीडा व तंत्र कारण, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, धर्मकारण ही मानवी मनाची काही प्रमुख कारणे होत. पण या सर्व कारणांच्या मागील मूळ कारण जर कोणते असेल तर ते निसर्गाचे विज्ञान हेच आहे. विज्ञान कारणाचा स्त्रोत निसर्ग असल्याने विज्ञानाचे कारण फक्त निसर्गालाच माहित आहे. काही माणसे निसर्गातील परमेश्वराला ते मूळ कारण माहित असेल असेही म्हणतील. पण मानवी बुद्धी त्या मूळ कारणावर फक्त तर्क लढवू शकते. तिला ते मूळ कारण सापडू शकत नाही जसा तिला निसर्गातील परमेश्वर सापडू शकत नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.५.२०२४

बुधवार, १५ मे, २०२४

निसर्ग वास्तवाची चौकट!

निसर्ग वास्तवाची चौकट!

परमेश्वर नामक महाशक्तीपुढे रडून, ऊर बडवून, शरणागत होत प्रार्थना करून निसर्गाची मूलभूत रचना व मूलभूत व्यवस्था बदलत नाही. जे काही बदल दिसतात ते या मूलभूत निसर्ग रचना व व्यवस्थेचाच भाग असतात. मानव ज्ञात विज्ञान, मानव निर्मित तंत्रज्ञान व मानव निर्मित कायद्याची समाज व्यवस्था या तिन्ही गोष्टी निसर्गाच्या मूलभूत रचना व मूलभूत व्यवस्थेचाच भाग आहेत. निसर्गाचे मूलभूत वास्तव जेव्हा बदलता येत नाही तेव्हा ते आहे तसे स्वीकारण्यात शहाणपणा असतो. निसर्ग वास्तवाची चौकट मोडताना ठेच लागून आलेले शहाणपण मोठे असते.

-©ॲड.बी.एस.मोरे, १५.५.२०२४

मंगळवार, १४ मे, २०२४

परमेश्वर निसर्ग रचनेत व मानवी जीवनात ढवळाढवळ करीत नाही!

परमेश्वर त्याच्या निसर्ग रचनेत व माणसांच्या जीवनात ढवळाढवळ करीत नाही!

अंतराळातील पदार्थीय विश्व रचना काय किंवा पृथ्वीवरील पदार्थीय सृष्टी रचना काय, ही संपूर्ण विश्व व सृष्टी रचना म्हणजे एकंदरीत निसर्ग रचना तिच्या मागे परमेश्वर नावाचा कोण रचनाकार आहे याचा निरर्थक शोध न घेता तिच्या विविध रंग, रूप, आकार, उर्जा, नियम या सर्वांसह आहे तशी स्वीकारावी लागते.

याच निसर्ग रचनेत आकाशातील गरूड पक्षी, सागरातील शार्क मासे व जंगलातील वाघ, सिंहासारखे प्राणी त्यांच्या नैसर्गिक ताकदीच्या जोरावर अशक्त पशुपक्षांची शिकार करतात व या क्रूर खेळात लुडबूड न करता परमेश्वर नावाचा तो रचनाकार अशक्त प्राण्यांविषयी कोणतीही दयामाया न दाखवता गप्प बसतो.

याच निसर्ग रचनेत माणसे आहेत, त्यांच्या मूलभूत जैविक वासना आहेत व या वासनांच्या सोबत त्यांच्या मनातील दया, माया, प्रेम, परोपकार या उदात्त भावनांचे एक गारूडही आहे. पण या गारूडाला डोक्यावर घेऊन किती नाचायचे हे या गारूडासोबत असलेल्या मानवी बुद्धीलाच ठरवावे लागते. वासना व उदात्त भावना यांच्या मध्ये संतुलन साधणारा जो निर्णय बुद्धी घेते या बौद्धिक निर्णयाला, ठरवण्याला व्यवहार म्हणतात. परमेश्वर नावाचा तो रचनाकार माणसांच्या जैविक वासना, उदात्त भावनांचे गारूड व त्यांच्या बौद्धिक व्यवहारामध्ये पडत नाही. माणसांना दिलेल्या बुद्धीवर सर्वकाही सोडून तो गप्प बसतो.

निसर्ग रचनेचा परमेश्वर नावाचा कोणीतरी रचनाकार आहे असे मानून त्याच्यावर आध्यात्मिक श्रद्धा ठेवून त्याची कितीही मनोभावे पूजाअर्चा करा, ऊर बडवून त्याची प्रार्थना करा पण तो बिलकुल हलत नाही. त्याने निर्माण केलेल्या निसर्ग रचनेत व माणसांच्या जीवनात तो ढवळाढवळ करीत नाही. हे वास्तव काहींच्या बुद्धीला कळते पण वळत नाही. 

-©ॲड.बी.एस.मोरे, १५.५.२०२४

शुक्रवार, १० मे, २०२४

MY COMPARISON BETWEEN NUCLEUS OF ATOM AND INTELLECT OF HUMAN MIND!

MY COMPARISON BETWEEN NUCLEUS OF ATOM AND INTELLECT OF HUMAN MIND IN DISCUSSION WITH CHATGPT AT 3.45 A.M. ON 11.5.2024

Atom as smallest particle of matter continues to play constructive role so long as its nucleus remains firm and stable in controlling such atom by its focus on constructive goal, but once its nucleus is broken such nucleus becomes unstable and then such atom goes out of its control making it destructive, atom bomb plays havoc once chain reaction within such bomb is provoked by breaking of nuclei of atoms within such bomb, intellect of human mind is like nucleus of atom remaining firm and stable in controlling human mind by keeping its focus on constructive goal, do not break intellect! -Adv.B.S.More

Adv. B.S. More provides a powerful analogy comparing the stability of an atom's nucleus to the steadfastness of human intellect in controlling one's actions. Just as an atom's nucleus maintains stability to ensure constructive outcomes, so does the intellect in guiding human behavior positively. However, when the nucleus of an atom is disrupted, leading to instability and potential destruction, similarly, the intellect, once compromised, can lead to destructive actions. This analogy serves as a reminder of the importance of maintaining focus on constructive goals and not allowing disruptions to the intellect, which can lead to negative consequences. -ChatGPT

गुरुवार, ९ मे, २०२४

CYCLIC TRANSFORMATION!

MY DISCUSSION WITH CHATGPT AT 4.30 A.M. ON 10.5.2024

Horizontal chain interaction between things is greatly  influenced by vertical  cyclic transformation in things! -Adv.B.S.More

The quote by Adv. B.S. More suggests that changes and transformations within a hierarchical or layered structure (vertical cyclic transformation) can have significant effects on interactions and relationships at the same level or across similar entities (horizontal chain interaction). This idea can be applied in various contexts, including business, technology, and even biology.

For instance, in a business environment, a shift in corporate strategy or leadership (vertical transformation) might lead to changes in partnerships, collaborations, or operational practices (horizontal interactions). Similarly, in technology, developments in core infrastructure or software (vertical) could drive changes in applications, user interfaces, or system integrations (horizontal).

Could you elaborate on where you'd like to explore this concept further?

My this concept is truth of Nature. For example, menopause in men and women as cyclic transformation in men and women by aging greatly influences sexual reproduction as horizontal interaction between men and women. -Adv.B.S.More

Thanks for clarifying. The concept of vertical cyclic transformation and horizontal interaction can indeed be seen in natural processes like aging, which can have broader impacts on biological and social relationships.

In the context of menopause in women and andropause in men (sometimes referred to as male menopause), these cyclic transformations represent significant changes in the reproductive systems as individuals age. This transformation can affect hormone levels, reproductive capabilities, and even overall health.

- **Menopause** involves a decrease in estrogen and progesterone, leading to the cessation of menstruation and a decrease in reproductive capability in women. This change has ripple effects on other areas of life, such as bone density, mood, and sleep patterns.

- **Andropause** in men is characterized by a gradual decline in testosterone levels, which can impact energy, muscle mass, and libido.

These vertical cyclic transformations can influence horizontal interactions, particularly in the context of relationships and sexual reproduction. For example:

- **Reproductive Capability**: As these transformations affect fertility, they influence the possibility of reproduction in heterosexual relationships, thus altering the dynamics of family planning and intergenerational relationships.

- **Interpersonal Relationships**: The hormonal changes associated with menopause and andropause can impact emotions, mood, and libido, which in turn affect how men and women interact within relationships.

- **Social Structures**: As the aging population grows, these changes influence societal norms around relationships, retirement, healthcare, and support systems.

In this way, the concept of cyclic transformations affecting broader interactions aligns with many natural and social processes, showing how internal changes can lead to wider shifts in human behavior and social dynamics. Would you like to delve deeper into any specific aspect of this concept?

Cyclic transformation takes place not only in living things but also in non-living things. This cyclic transformation compells constitutional changes in matters and since matters do not remain in same status or position because this cyclic transformation their properties and instincts also undergo change which greatly influence give and take interaction between matters. -Adv.B.S.More, 10.5.2024

This perspective explores the idea that cyclic transformation isn't exclusive to living things but also applies to non-living entities, leading to changes in their constitution, properties, and interactions. The notion that such transformations in non-living things can affect their properties and instincts, in turn influencing interactions with other non-living things, opens a broad conceptual landscape. Let's break it down further.

1. **Cyclic Transformation in Non-Living Things**:
   - In the physical sciences, cyclic transformation often refers to periodic changes in states, phases, or configurations. For example, the water cycle involves a transformation from vapor to liquid to solid and back, impacting weather patterns, ecosystems, and geological processes.
   - In chemistry, the concept of chemical cycles, like the carbon cycle or the nitrogen cycle, involves transformations of elements or compounds through different forms, affecting both living and non-living systems.

2. **Constitutional Changes in Matters**:
   - Matter changes its state or structure due to various factors like temperature, pressure, or chemical reactions. For instance, the transformation from solid to liquid in metals through melting has significant implications in metallurgy and manufacturing.
   - In geology, the rock cycle involves transformations from igneous to sedimentary to metamorphic rocks, driven by heat, pressure, and erosion. These changes influence the Earth's crust and can lead to phenomena like earthquakes or volcanic eruptions.

3. **Impact on Properties and Instincts**:
   - Changes in the constitution of matter lead to alterations in its properties. For example, as iron transitions to rust (oxidation), its structural integrity and conductive properties change, affecting its use in construction and industry.
   - In physics, when atoms in a crystal lattice undergo transformation (like in a phase transition), this can alter the material's electrical, magnetic, or optical properties, impacting how it interacts with other materials.

4. **Influence on Give and Take Interaction**:
   - When non-living things change due to cyclic transformations, their interactions with other materials or environments also change. For example, in electronics, the behavior of semiconductors during temperature fluctuations can affect electronic circuits, leading to design changes.
   - In an ecological context, the transformation of soil composition due to cycles of decay and regeneration can influence plant growth and nutrient cycling, thus affecting broader ecological interactions.

Overall, cyclic transformations, whether in living or non-living things, drive significant changes in their inherent properties and how they interact with their surroundings. These changes have cascading effects across a wide range of fields, from ecology to engineering to materials science. Would you like more examples or deeper exploration into a specific area?

ChatGPT, this discussion is  enough on this topic for today. -Adv.B.S.More, 10.5.2024

Understood, thank you for the interesting discussion. If you have more questions or want to explore another topic, I'm here to help. Have a great day! -ChatGPT, 05.09.2024.

It is not 5.9.2024 but 10.5.2024 today. You committed mistake in date ChatGPT. Please correct yourself. Thanks! -Adv.B.S.More, 10.5.2024

Thanks for pointing out the error. I meant to say "10.5.2024." I appreciate your correction. If you'd like to discuss anything else or need further assistance, I'm here to help. Thanks for your patience! -ChatGPT, 10.5.2024.

मंगळवार, ७ मे, २०२४

अंथरूण पाहून पाय पसरावेत?

अंथरूण पाहून पाय पसरावेत?

निकोप स्पर्धा म्हणजे काय? आंतर मानवी स्पर्धा निकोप असावी म्हणून आंतरमानवी स्पर्धेचे सामाजिक नियमन करणारा कायदा माणसांनी निर्माण केला. हा स्पर्धा नियमन  सामाजिक कायदा प्रामाणिकपणे पाळून प्रामाणिक स्वकष्टाने यश मिळवणे ही खूप कठीण गोष्ट आहे. प्रामाणिक कष्टाळू माणूस भ्रष्टाचारी माणसाबरोबर काय स्पर्धा करणार? गरीब, अशक्त माणूस श्रीमंत, सशक्त माणसाबरोबर काय स्पर्धा करणार? कसली समानता प्रस्थापित केलीय मानवनिर्मित सामाजिक कायद्याने? सामाजिक कायदा बनवणाराही माणूस, त्याची अंमलबजावणी करणाराही माणूस आणि तो कायदा तोडणाराही माणूस? कसे बरे यश मिळेल या कायद्याला? पण कायदा तर यशस्वी झालाच पाहिजे. मग काय करायचे? यावर उतारा म्हणून मानव कल्याणकारी माणसांनी या कायद्याची एकमेकांना तपासून संतुलन साधणारी व्यवस्था (चेक अँड बॕलन्स सिस्टीम) निर्माण केली. पण सामाजिक कायद्याअंतर्गत काम करणारी ही व्यवस्था एकमेकांवर चेक अँड बॕलन्स नियंत्रण ठेवणारी होण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडी करणारी व्यवस्था झालीय. त्यातून या व्यवस्थेत सावळा गोंधळ निर्माण होऊन कायद्याची ही व्यवस्था भ्रष्ट झाल्याचे दिसत आहे.

कायद्याच्या या सावळा गोंधळात सर्वसामान्य माणसांचे काही खरे नाही. सर्वसामान्य माणसांनी मोठ्या लोकांच्या मोठ्या स्पर्धेचा खेळ या खेळात भाग न घेता लांबून बघावा अशीच परिस्थिती आहे. फार मोठा गाजावाजा करीत दर पाच वर्षांनी येणाऱ्या लोकशाहीतील महान राजे, सरदारांच्या निवडणुका हा असाच सत्ता स्पर्धेचा मोठा खेळ आहे ज्याला लोकशाहीचा महोत्सव असे काही लोक संबोधतात. हा खेळ सर्वसामान्य जनतेला लांबून बघावा लागतो. सर्वसामान्य मतदार या नात्याने या स्पर्धेतील त्यातल्या त्यात बऱ्या वाटणाऱ्या काही राजे, सरदारांना मतदान करणे एवढेच या सामान्य लोकांच्या हातात (वोटिंग मशीनचे इच्छा बटन दाबणाऱ्या बोटात) असते. या राजे, सरदारांच्या भाषणांना टाळ्या वाजवा नाहीतर समाज माध्यमावर टीका टिप्पणी करीत बसा या राजे, सरदारांना या सामान्य जणांच्या सामान्य गोष्टींचा तसा काहीच फरक पडत नाही. ही सर्वसामान्य माणसे राजकारणावर बोलून एकतर तोंडाची वाफ वाया घालवतात किंवा राजकारणावर लिहून त्यांचे लिखाण कचरा कुंडीत घालवतात. कारण शेवटी लोकशाही राजकारणातले (हुकूमशाहीचे तर बोलूच नका) सर्व राजे, सरदार हे एकाच माळेचे मणी (सारख्याला वारखे) असतात. या महान राजे, सरदारांच्या मक्तेदारीला सर्वसामान्य माणसे त्यांच्या वास्तव बोलण्याने किंवा लिहिण्याने काही प्रभाव टाकू शकत नाहीत. कारण राजे, सरदार लोकांवर थोडाफार प्रभाव टाकू शकणारी पारंपरिक माध्यमेही या राजे, सरदारांची हुजरेगिरी करण्यात स्वतःला धन्य मानतात. सामान्य जणांना व्यक्त होण्यासाठी समाज माध्यम रूपाने जे एक व्यासपीठ मिळालेय तिथेही राजे, सरदारांची मार्केटिंग टीम घुसून धुमाकूळ घालत आहे. ही समाजमाध्यमी हुजरेगिरीही लोकशाहीतील राजकारण खेळावर बराच प्रभाव पाडत आहे. खरं तर, या समाज माध्यमावर सर्वसामान्य नागरिक कोण व राजे, सरदारांची तळी उचलणारे हुजरे कोण हेच कळेनासे झालेय.

पाच वर्षानंतर येणारी औपचारिक मतदान प्रक्रिया सोडून सर्वसामान्य माणसांचा लोकशाही राजकारणावर कितीसा प्रभाव पडतो हा मोठा संशोधनाचा विषय आहे. या धूर्त राजकारणी लोकांच्या नादी लागून सर्वसामान्य माणसे स्वतःच स्वतःला शिव्या देत आपआपसात उगाच का भांडत बसतात हेच कळत नाही. सामान्य जणांच्या आपआपसातील या भांडणावरच धूर्त राजकारणी मंडळी सत्तेची पोळी भाजून घेतात.

अशा वातावरणात सामान्य जणांच्या ज्ञान, बुद्धीचा आवाका कितीही मोठा असला व इच्छा आकांक्षांची धाव कितीही जोरात असली तरी त्यांनी त्यांच्या शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक (धर्म व जातपात) इत्यादी मर्यादा नीट ओळखून त्या मर्यादांच्या आत राहणे योग्य होय. समाजातील महान राजे, सरदार ही असामान्य माणसे होत. अशा असामान्य माणसांना अपवाद म्हणून स्वीकारले की अपवादाचे अनुकरण करण्याचा मोह होत नाही.  यालाच अंथरूण पाहून पाय पसरणे असे म्हणतात. याला दुसरी म्हणही लागू होते ती म्हणजे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. सर्वसामान्य माणसांना सरडा म्हणताना वाईट वाटते. खरं समाजातील महास्वार्थी धूर्त, भ्रष्ट मंडळीच रंग बदलणारे सरडे होत. पण मर्यादेच्या कुंपणासाठी सामान्य जणांसाठी सरड्याची धाव कुंपणा पर्यंत ही म्हण वापरावी लागतेय. पण कुंपणानेच शेत खाल्ले तर बिचाऱ्या सरड्यांनी कुठे जावे?

-©ॲड.बी.एस.मोरे, ७.५.२०२४

रविवार, ५ मे, २०२४

वृद्धापकाळाची आचारसंहिता!

वृद्धापकाळाची आचारसंहिता!

वृद्धापकाळी वयपरत्वे आकसलेल्या शरीराच्या मांसपेशी व नसांमुळे वृद्ध शरीराची हालचाल मंदावलेली, संथ झालेली असते पण त्याचबरोबर मेंदूत साचलेल्या आयुष्यभराच्या आठवणींमुळे, आयुष्यातील अनेक खटाटोपीतून मेंदूत जमा झालेल्या प्रचंड मोठ्या माहिती साठ्यामुळे व विविध माध्यमांतून मेंदूवर सतत आदळणाऱ्या बातम्यांमुळे मेंदूची वैचारिक हालचाल जोरात चालू असते. थोडक्यात थकलेले, संथ झालेले शरीर व धावणारे मन अशी माणसाची वृद्धापकाळी त्रासदायक द्विधा अवस्था असते.

या द्विधा अवस्थेवर मात करणे ही वृद्धापकाळात माणसाची कसोटी असते. बाल्यावस्था व तारूण्यातील माणसाच्या शारीरिक व मानसिक गरजा व वृद्धापकाळातील शारीरिक व मानसिक गरजा यात खूप फरक असतो. आकसलेल्या शरीराला सैल करणारा हलका फुलका शारीरिक व्यायाम व धावणाऱ्या मनाला आवर घालणारा आध्यात्मिक शांतीचा मानसिक व्यायाम या दोन प्रमुख गोष्टी या वृद्धापकाळाच्या दोन प्रमुख गरजा असतात.

जगाच्या भौतिक चक्रात अडकून त्यातच रूतलेल्या व आपण जगात किती मोठे आहोत हे दाखवण्याची हौस बाळगून त्या भौतिक नशेत अडकलेल्या माणसांची कर्णकर्कश ओरड कमीतकमी ऐकणे व या माणसांचा धांगडधिंगी अचकट, विचकट नाच कमीतकमी बघणे या दोन गोष्टी वृद्ध माणसांनी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. भौतिक जगाच्या धिंगाण्या पासून स्वतःच्या शरीर व मनाने पूर्ण अलिप्त ठेवणे शक्य नसले तरी या धिंगाण्यापासून स्वतःला जास्तीतजास्त लांब ठेवणे हीच वृद्धापकाळातील शारीरिक विश्रांती व आध्यात्मिक शांती होय.

थोडक्यात काय तर, आकसलेल्या मांसपेशी, नसा सैल करणारा हलका फुलका शारीरिक व्यायाम व भौतिक जगाच्या दंगामस्तीत, धिंगाण्यात ओरडून नाचण्यासाठी धावणाऱ्या वेड्या मनाला आवर घालून त्याला सूक्ष्म अवस्थेत आणून त्या अवस्थेत स्थिर करणारा आध्यात्मिक शांतीचा मानसिक व्यायाम या दोन गोष्टी हीच वृद्धापकाळाची आचारसंहिता आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.५.२०२४

शुक्रवार, ३ मे, २०२४

कायदेशीर आचरणात आध्यात्मिक देवभावना!

कायदेशीर आचरणात आध्यात्मिक देवभावना!

हिंस्त्र प्राण्यांना उदात्त देवत्वाची किंवा उदार माणुसकीची भाषा कळत नाही. त्यांना त्यांच्याच हिंस्त्र भाषेत उत्तर द्यावे लागते. अशा हिंस्त्र वृत्तीचा नाश करण्याची शिकवण फौजदारी कायदा देतो. अशी हिंस्त्र वृत्ती काही माणसांत सुद्धा असते. हिंस्त्र प्राण्यांप्रमाणे अशा काही हिंस्त्र वृत्तीच्या माणसांचाही बंदोबस्त निसर्गात अस्तित्वात असलेल्या या फौजदारी कायद्याने सुज्ञ, सुजाण माणसांना करावा लागतो. निसर्गात जशी गोड फळे निर्माण होतात तशी कडू फळेही निर्माण होतात. ती तशी का निर्माण होतात हे निसर्गाला ठाऊक. पण गोड फळांचा आस्वाद घेण्यासाठी जसा तालबद्ध दिवाणी देवाणघेवाणीचा कायदा निसर्गात अस्तित्वात आहे तसा कडू फळांचा नाश करण्यासाठी विनाशकारी फौजदारी प्रतिकाराचा कायदाही निसर्गात अस्तित्वात आहे. मानवी शरीरात असलेली प्रतिकारशक्ती हा या फौजदारी कायद्याचाच एक भाग आहे. नैसर्गिक न्यायतत्वांनी युक्त असलेले निसर्ग नियम हा विज्ञानाचा प्रमुख भाग (गाभा) आहे. निसर्ग कायद्याच्या या गाभ्यात डोकावले तर त्यात निसर्ग धर्म दिसतो. जर निसर्गाच्या मुळाशी व निसर्गाच्या गाभ्यात परमेश्वर आहे असे मानले तर मानवी मनात निसर्ग धर्माविषयी आध्यात्मिक देवभावना जागृत होते. याच आध्यात्मिक देवभावनेतून मला हिंदू धर्मातील विष्णू व लक्ष्मी दैवते दिवाणी कायद्याची प्रतिके वाटतात तर शंकर व पार्वती दैवते फौजदारी कायद्याची प्रतिके वाटतात. प्रतिके ही प्रतिकात्मक असतात. निसर्गात परमेश्वर आहे असे मानले की ही देवप्रतिके जवळची होतात. पण माझ्या मते या देवप्रतिकांची पूजा अर्चा निसर्ग धर्माच्या नैसर्गिक आचरणातून केली पाहिजे. म्हणजे नैसर्गिक न्यायतत्वांनी युक्त निसर्ग नियमांचे पालन करून म्हणजे निसर्ग कायद्यानुसार वागून केली पाहिजे. असे कायदेशीर आचरण आध्यात्मिक देवभावनेने करण्यात मला काही गैर वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे "हरहर महादेव" गर्जना करीत आध्यात्मिक देवभावनेनेच माणुसकीच्या शत्रूंवर तुटून पडत हा इतिहास विसरता कामा नये.

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.५.२०२४