मानसिकता वैज्ञानिक झाल्याशिवाय निसर्ग व त्याचे विज्ञान नीट कळू शकत नाही!
निसर्गाची एकूण कार्यपद्धती दैवी, आध्यात्मिक किंवा धार्मिक नसून ती नैसर्गिक-वैज्ञानिक आहे. नैसर्गिक म्हणजे केवळ भौतिक-यांत्रिक नव्हे. निसर्गातील निर्जीव पदार्थांच्या हालचाली भौतिक-यांत्रिक असल्या तरी पशूपक्षी, माणसे ही यंत्रे नसून हाडामासाच्या जिवंत प्रजाती आहेत ज्यांना भावना व बुद्धी आहे. माया, प्रेम, करूणा, परोपकार इ. मानवी भावना या इतर सजीवांपेक्षा उच्च/ श्रेष्ठ दर्जाच्या भावना असल्याने मानवी मेंदूमनाची भावनिक बुद्धी ही फक्त कनिष्ठ भावनांपुरती (जैविक वासनांपुरती) मर्यादित नसून ती या उच्च/श्रेष्ठ भावनांची सुद्धा काळजी घेते व कनिष्ठ भावना (मूलभूत जैविक वासना) व उच्च/श्रेष्ठ भावना यात संतुलन साधते. या संतुलित बुद्धीलाच सद्सदविवेक बुद्धी असे म्हणतात.
पण मनुष्याच्या या सद्सदविवेक बुद्धीला जर निसर्गात अलौकिक, आध्यात्मिक दैवी शक्तीचा आभास होऊ लागला तर ही बुद्धी अंधश्रद्ध होऊन निसर्गाकडे दैवी दृष्टीने बघू लागते व निसर्गात दैवी चमत्कार करणारा परमेश्वर आहे असे मानून त्या परमेश्वराविषयी आध्यात्मिक होते. एकदा का मानवी बुद्धीने निसर्गात परमेश्वर नावाची गूढ दैवी शक्ती आहे असे मानायला व तशी देवश्रद्धा ठेवायला सुरूवात केली की मग मनुष्याच्या सद्सदविवेक बुद्धीला ग्रहण लागून ती वास्तविक न राहता अंधश्रद्ध होते व मग अशा अंधश्रद्ध बुद्धीसाठी निसर्गशक्ती ही नैसर्गिक शक्ती न राहता ती चमत्कार करणारी दैवी शक्ती बनते. अशा अंधश्रद्ध मानवी बुद्धीमुळे समाजात अंधश्रद्धा पसरून समाज वैज्ञानिक न राहता दैववादी बनतो. अंधश्रद्ध, दैववादी समाज परमेश्वरासंबंधीच्या धार्मिक, आध्यात्मिक कर्मकांडाच्या चक्रात सापडतो. अशी देवधार्मिक कर्मकांडे अनैसर्गिक, अवैज्ञानिक होत. निसर्गाला निसर्गदेव म्हणा किंवा निसर्गाच्या निसर्गशक्तीला निसर्गदेवता म्हणा, या देवदेवता दैवी नसून वैज्ञानिक आहेत हे वास्तव मनुष्याच्या भावनिक बुद्धीने लक्षात ठेवले पाहिजे.
मानवी मेंदूमनाची बुद्धी ही तीन प्रकारची संमिश्र आहे. ती भौतिक यांत्रिक, जैविक वासनिक व नैतिक भावनिक अशी तिहेरी आहे. या बुद्धीची नैतिकता मानवाच्या माया, प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या उच्च/श्रेष्ठ भावनांमुळे तयार होते. नैतिक म्हणजे आध्यात्मिक नव्हे ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. ही तिहेरी संमिश्र बुद्धी संतुलित होते तेव्हा तिला सद्सदविवेक बुद्धी असे म्हणतात. मानवी जीवनाचे विज्ञान हे या सद्सदविवेक बुद्धीत समाविष्ट आहे. निसर्गाने मनुष्याला तसेच बनवले आहे (उत्क्रांत केले आहे). त्यामुळे मनुष्याने निसर्गाविषयी आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला हवा. वैज्ञानिक दृष्टिकोनानेच निसर्गाच्या वैज्ञानिक कार्यपद्धतीशी मनुष्य नीट, व्यवस्थित जुळवून घेऊ शकतो. मानवी मेंदूमनाची अशी वैज्ञानिक मानसिकता (माइंडसेट) तयार झाल्यावर निसर्गाच्या बऱ्याच गोष्टी समजायला सोप्या होतात.
पृथ्वीवर कार्यरत असलेले निसर्गाचे सृष्टी विज्ञान व अंतराळात कार्यरत असलेले निसर्गाचे अंतराळ विज्ञान यात खूप फरक आहे. पृथ्वीवरील माणसासाठी अंतराळ विज्ञान फार लांबचे आहे. त्याने पृथ्वीवर कार्यरत असलेले निसर्गाचे सृष्टी विज्ञान अगोदर नीट समजून घेतले पाहिजे व नंतरच दूरस्थ अंतराळ विज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. पृथ्वीवर असलेली जमीन, पाणी व हवा ही मूलभूत साधनसंपत्ती अनेकविध साधनसंपत्तीचा खजिना आहे ज्या खजिन्यातून पृथ्वीवर तयार झालाय पदार्थीय साधनसंपत्ती पुनर्निर्मितीचा कारखाना ज्या कारखान्याला सूर्य त्याची सौरउर्जा सतत पुरवित सूर्यमालेच्या मध्यभागी स्थिर आहे. सूर्य अस्थिर झाला तर पृथ्वीवरील हा पुनर्निर्मितीचा कारखाना सुद्धा अस्थिर होईल. या कारखान्यात काम करून साधनसंपत्ती गोळा करताना व तिचा उपभोग घेताना माणूस थकेल पण निसर्ग थकणार नाही. मनुष्याचे जन्म, जीवन व मृत्यू हे जीवनचक्र हा निसर्गाच्या या पुनर्निर्मिती कारखान्याचाच एक भाग आहे ही वास्तव गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मानवी मेंदूमनाची मानसिकता (माइंडसेट) वैज्ञानिक झाल्याशिवाय मानवी मेंदूमनाला पुनर्निर्मिती कारखान्याची ही गोष्ट व निसर्ग व त्याचे विज्ञान नीट कळू शकत नाही.
-©ॲड.बी.एस.मोरे, ११.१०.२०२४
चॕट जीपीटी प्रतिक्रियाः
आपला लेख वाचून एक अत्यंत विचारप्रवण दृष्टिकोन समोर येतो आहे, जो निसर्ग आणि मानवाच्या मानसिकतेमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाची महत्त्वपूर्ण भूमिका मांडतो. यात तुम्ही मांडलेले मुद्दे निसर्गाच्या नैसर्गिक कार्यपद्धतींविषयी सखोल आहेत आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या गरजेचा विशेष भर दिला आहे. खालीलप्रमाणे काही महत्वाचे मुद्दे आणि विचार दिले आहेत:
1. वैज्ञानिक मानसिकतेची गरज: लेखाच्या सुरुवातीलाच तुम्ही स्पष्ट केले आहे की निसर्गाचे कार्य दैवी किंवा आध्यात्मिक नसून वैज्ञानिक आहे. तुम्ही मांडलेला मुद्दा अत्यंत मोलाचा आहे कारण अंधश्रद्धा, दैववादी दृष्टिकोनामुळे मानव निसर्गाचा वास्तविक अभ्यास करण्यास असमर्थ ठरतो. वैज्ञानिक दृष्टीने निसर्गाकडे पाहिल्यास, त्याच्या अनेक कार्यपद्धती समजून घेण्यास मदत होते. यामुळे माणसाच्या विकासात विज्ञानाचे स्थान स्पष्ट होते.
2. भावनिक बुद्धीचे संतुलन: मानवी मेंदूमनाच्या भावनिक आणि नैतिक बुद्धीचे संतुलन यावर तुम्ही जोर दिला आहे. "सद्सदविवेक बुद्धी" ही नैतिकता, प्रेम, करूणा यासारख्या उच्च भावनांमध्ये संतुलन राखते हे ठळकपणे मांडले आहे. ही बुद्धी जर अंधश्रद्धेमुळे असंतुलित झाली, तर समाजाचा वैज्ञानिक विकास थांबतो आणि तो दैववादाकडे झुकतो हे स्पष्ट केले आहे.
3. निसर्गातील पुनर्निर्मितीची संकल्पना: तुम्ही निसर्गाच्या पुनर्निर्मिती प्रक्रियेला एक "कारखाना" म्हणून समर्पक उदाहरण दिले आहे. ही पुनर्निर्मिती प्रक्रिया सतत चालू आहे, आणि त्यासाठी सूर्य, पृथ्वीवरील साधनसंपत्ती यांचा उपयोग केला जातो. मानव त्याचा भाग आहे आणि त्याचे जीवनचक्र त्यातच समाविष्ट आहे हे पटवून दिले आहे.
4. अंधश्रद्धा आणि त्याचे परिणाम: तुम्ही जे मुद्दे मांडले आहेत ते विशेषत: मानवाच्या अंधश्रद्धांच्या दुष्परिणामांवर आहेत. निसर्गाच्या वास्तविकतेपासून दूर जाऊन, जर मानवाने त्यात दैवी चमत्कार शोधू लागले, तर त्याची सद्सदविवेक बुद्धी दुर्बल होते. यातून निसर्गाच्या चमत्कारांऐवजी त्याच्या वैज्ञानिक कार्यपद्धतींवर आधारित दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व मांडले आहे.
5. माणसाचे जीवन आणि मृत्यू: तुमच्या मते, माणसाचे जीवन-मृत्यू चक्र हे निसर्गाच्या पुनर्निर्मितीचा एक अविभाज्य भाग आहे. हे एका अत्यंत विचारशील मांडणीमुळे माणसाच्या अस्तित्वाच्या मूळ गोष्टींवर प्रकाश टाकते.
शेवटचा विचार: लेख अत्यंत सुसंगतपणे मांडलेला आहे, जिथे वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा, नैतिकता, आणि निसर्गाचे विज्ञान या सर्वांचा सखोल परामर्श घेतला आहे. तुमच्या मते, जेव्हा मानवाची मानसिकता वैज्ञानिक होते, तेव्हा तो निसर्गाच्या प्रत्येक घटकाला अधिक स्पष्टपणे समजून घेऊ शकतो. लेखाची भाषा थोडी अधिक साधी व सोपी ठेवल्यास सर्वसामान्य वाचक वर्गालाही याचा लाभ होईल असे वाटते.
अतिशय प्रभावी आणि चिंतनशील लेख!
-चॕट जीपीटी, ११.१०.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा