https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ६ मे, २०२५

बाप बुद्धी तर आई भावना!

बाप बुद्धी तर आई भावना!

शिस्त हा कुटुंबाचा पाया असतो व त्यासाठी कुटुंबात कठोर बुद्धीची आवश्यकता असते. कुटुंबात बाप याच कारणासाठी कडक असतो म्हणून बाप ही बुद्धी. पण नुसत्या कठोर शिस्तीने, कडकपणाने कुटुंब चालत नाही म्हणून कुटुंबात मृदू भावना महत्त्वाची. ते काम आई करते म्हणून आई ही भावना.

कुटुंबात आईवडिलांची होणारी भांडणे ही खरं तर भावना व बुद्धी या दोघांतील होणारी भांडणे व ती या आईवडिलांपैकी एकाच्या किंवा दोघांच्या मृत्यूनेच संपतात. संसार म्हटले की अशी भांडणे ही होणारच. फक्त ती जास्त ताणून तीव्र करणे चुकीचे. त्यासाठी दोघांत संतुलित तडजोड महत्वाची असते. तुझे माझे जमेना पण तुझ्याशिवाय करमेना असा प्रकार पती व पत्नी किंवा बुद्धी व भावना यांच्यात असतो.

काही अपवाद सोडले तर पुरूष हा नैसर्गिकतः कडक व स्त्री नैसर्गिकतः मृदू असते. म्हणून स्त्रीला कोमल फूल असे म्हणता येईल. माझ्या निरीक्षणानुसार हे नैसर्गिक स्वरूप दिसून येते. म्हणून बाप ही कठोर बुद्धी तर आई ही मृदू भावना असे माझे वैयक्तिक विधान आहे. परंतु या विधानाला काही लोक आक्षेप घेऊन असे म्हणतील की मग स्रीला फक्त भावनाच असते का, तिला बुद्धी नसते का? जरूर असते. आई जेव्हा कुटुंबात तिच्या बुद्धीचा वापर करते तेव्हा ती बाप होते. कारण शेवटी बुद्धी ही बाप असते व ती भावनेला शिस्त लावत असते. हे सांगायलाच नको की, भारतात पितृसत्ताक व मातृसत्ताक अशा दोन्ही कुटुंब पद्धती आहेत. याचा अर्थ एवढाच की पितृसत्ताक पद्धती मध्ये पती हा बाप होतो तर पत्नी ही आई होते. याउलट मातृसत्ताक पद्धतीत पत्नी ही बापाच्या भूमिकेत असते तर पती हा आईच्या भूमिकेत असतो. ही अदलाबदल सोयीनुसार केली जाते.

मी या लेखात उलगडून सांगितलेल्या गोष्टी ज्या कौटुंबिक विधीशास्त्रा (फॕमिली ज्युरिसप्रूडन्स) बरोबर निसर्ग विज्ञानाचा आधार आहेत त्या सळसळत्या रक्ताच्या तरूण मुला मुलींना काय समजावून सांगणार? सळसळत्या रक्तामुळे ही मुले मुली माझ्यासारख्या माणसाचे अनुभवी ज्ञान ऐकायलाच तयार नसतात मग त्यावर विचार करणे तर सोडूनच द्या.  फार बिझी असतात हो ही मुले मुली त्यांच्या करियर मध्ये व पैसे कमवत मोठे होण्याच्या व्यापात. त्यांना वेळ कुठे आहे माझ्यासारख्या माणसाचे ऐकायला, माझे लेख वाचायला?

बाप व आई म्हणजे बुद्धी व भावना यांच्या संयोगातून निर्माण झालेली काही मुले जेव्हा अधूनमधून सुरू असलेल्या वृद्ध आईवडिलांच्या भांडणांचा (बुद्धी व भावनेच्या भांडणांचा) कंटाळा येऊन त्यांना एकमेकांपासून वेगळे ठेवण्याचा त्या मुलांच्या सोयीचा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते कारण ही तरूण मुले व मुली पुढे म्हातारी होणार असतात हे त्यांना त्यांच्या तरूणपणात कळतच नाही.

आईवडिलांची भांडणे ही खरं तर भावना व बुद्धी यांच्यातील संघर्षाचे प्रतीक आहे. म्हणूनच तरूणांनी वेळोवेळी थांबून आपल्या आई व वडिलांच्या भांडणांमागील भावना व बुद्धीचा संघर्ष समजून घ्यावा कारण उद्या त्यांच्याही वाट्याला हेच नाते संबंध, हेच प्रश्न येणार आहेत.

माझ्या या लेखात फक्त कुटुंब व्यवस्थेचा विचार नाही तर एक कौटुंबिक तत्वचिंतक म्हणून हे माझे  नातेसंबंधांचे सामाजिक, भावनिक व बौद्धिक आत्मपरीक्षण आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.४.२०२५

बाप बुद्धी तर आई भावना या माझ्या लेखावरील एक फेसबुक प्रतिक्रिया!

नवरा बायकोत भांडणे होतातच.
अगदी क्षुल्लक कारणानेही भांडणे होतात. आईवडिलांनी बरेच उन्हाळे पावसाळे बघितलेले असतात. त्यांना एकमेकांची उणीदुणी माहित असतात. बाई ही नेहमी सावलीने जगत असते. तिचे बालपण आई बाबांच्या प्रेमावर, नंतर भावाच्या सावलीत, तरूणपणी प्रियकर नवरा यांच्या बरोबर... मुले मोठी झाली की लगेच हीच बाई मुलांच्या बाजूने होते. अशी ही बाई.. बायको, आई,
काही तरी निर्णय घ्यावा असे ठरवले की लगेच म्हणणार तुम्हाला काय कळतंय तो येऊ दे तो म्हणजे मुलगा किंवा मुलगी किंवा जावई. अशी ही बायको कधी साथ सोडेल सांगता येत नाही. त्यात आईबद्दल कणव मुलांना येतेच . बाप हा कायम निष्ठूर कठोर असतो...असो छान लेख.

-सुरेश सदाशिव गुरव, अंबरनाथ

सहानुभूतीचे जग? लेखकः हैदर पटेल

सहानुभूतीचं जग, माणूस मेल्यावरच प्रेम का जागं होत?      

सुख-दु:खाच्या नात्याने बांधलेली  मरण आल्यावर अधिकच जुळलेली दिसतात. एका जीवंत माणसाला जे प्रेम, आधार, आपुलकी आणि सहानुभूती तो जिवंत असताना हवी असते, तीच माणसं त्याच्या मृत्यूनंतर देण्याचा आटापिटा करतात. हे दृश्य पाहिलं की वाटतं – माणसाच्या भावनांची किंमत त्याला असताना नसते, पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी ढोंगी संवेदना उफाळून येतात.

लांबच्या नातेवाईकांचं अचानक ‘आपुलकीने’ येणं.

कोणी तरी मेलं की अचानक काही नातेवाईक 'गाडी मिळाली नाही', 'प्रायव्हेट गाडीने का होईना पण येतोच' असं म्हणत निघतात. तेच लोक त्याच्या सुख-दु:खाच्या प्रसंगी मात्र गडप असतात. वाढदिवस, लग्न, संकटं – अशा कुठल्याच वेळी त्यांचा पत्ता लागत नाही. पण माणूस मेल्यावर मात्र ते ‘शेवटचं तोंड बघायला’ म्हणून हजेरी लावतात.

प्रश्न असा आहे की हे शेवटचं तोंड बघण्याने मृत माणसाला नेमकं काय मिळतं? जिवंत असताना ज्या माणसांना भेटायची ओढ नव्हती, त्यांचा मृत्यूनंतर अचानक ओढ लागते हे आश्चर्यकारक आहे.

कधी कधी अगदी मनोभावे, डोळ्यात अश्रू आणून नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणी रडतात.

काही लोक उगाच मोठ्याने आक्रोश करतात, काही जण विचारतात, "अरे, एवढ्या लवकर का गेला?" पण खरेच एवढी हळहळ होती तर तो जिवंत असताना ती कुठे गायब होती? जिवंतपणी टीका करायची,द्वेष करायचा ,मेल्यानंतर मात्र स्टेटस ठेवायचे,चांगुलपणा दाखवायचा, असे महाभाग पण कमी नाहीत.

आजारात मदतीला न येणारे लोक मयताच्या स्वयंपाकाला मात्र हमखास हजर असतात. जे नातेवाईक जिवंत असताना बोलत नव्हते, ते आता "त्यावेळी बोलायला हवं होतं" असं म्हणत उसासे टाकतात. अशावेळी असं वाटतं की माणसाच्या अस्तित्वाची किंमत त्याला असताना कमी असते, पण मेल्यावर त्याच्यासाठी भावना उसळून येतात.

कोणीतरी मेलं की गावकऱ्यांपासून ते शेजाऱ्यांपर्यंत सगळ्यांना एक नवा विषय मिळतो. "त्याचा मुलगा वेळेवर पोहोचला नाही", "सून रडली नाही", "अमुक माणूस दोन दिवसांनी आला", "त्याच्या घरच्यांनी नीट पाहुणचार केला नाही" – अशा चर्चांनी स्मशानाजवळचा एखादा कट्टा गरम होतो.

मयताच्या टोपलीत किती फुले टाकली, कोण किती वेळ बसलं, कोण किती वेळ रडलं यावर लोक माणसाच्या सगळी नाती ठरवतात. पण खरी गरज जिवंत माणसाला आधाराची असते. जो हयात आहे, त्याच्यासाठी वेळ काढणं जास्त महत्त्वाचं असतं.

खरी सहानुभूती – मृत्यूनंतर नाही, जगत असताना द्या.

एका जिवंत माणसाला मदतीचा हात, बोलण्याची सोबत, आधार आणि प्रेम हवं असतं. तो मेल्यावर दिलेल्या अश्रूंना काहीच अर्थ नसतो. त्याच्या आजारपणात केलेली सेवा, त्याच्या मनाला दिलासा, त्याच्या संकटात दिलेली साथ – हाच खरा माणुसकीचा कसोटी क्षण असतो.

म्हणूनच, शेवटचं तोंड बघण्याच्या दिखाव्यापेक्षा, जिवंत असलेल्या माणसाच्या डोळ्यातील आनंद पहाण्यासाठी वेळ काढा. त्याच्या हसण्याच्या साक्षी व्हा, त्याच्या दुःखात पाठिंबा द्या. तो असताना प्रेम द्या – जेणेकरून तो मेल्यावर फुकटच्या ढोंगी सहानुभूतीची गरज उरणार नाही.

*कटू सत्य*

-हैदर पटेल (फेसबुक मित्र)

जीवात्मा, एक आध्यात्मिक प्रवास!

जीवात्मा, एक आध्यात्मिक प्रवास!

मन व बुद्धीसह जगाची जाणीव असलेला सजीव शरीराचा अदृश्य भाग म्हणजे जीव किंवा आत्मा. जीवन हा या जीवात्म्याचा प्रवास असतो व या प्रवासासाठी शरीर हे जीवात्म्याचे माध्यम असते. हे शरीर माध्यम वयानुसार हळूहळू जीर्ण झाले की जीवात्म्याचा जीवन प्रवास कठीण होतो. मग शेवटी हा प्रवासच नको म्हणून जीवात्मा निरूपयोगी झालेल्या जीर्ण शरीराला त्यागून अशा शरीराबाहेर पडतो ज्याला जीर्ण शरीराचा मृत्यू म्हणतात. शरीर विनाशी आहे पण जीवात्मा अविनाशी आहे जसा परमात्मा अविनाशी आहे अशी आध्यात्मिक धारणा आहे.

मन व बुद्धीसह जगाची जाणीव असलेला सजीव शरीराचा अदृश्य भाग म्हणजे जीव किंवा आत्मा. हे केवळ सूक्ष्म अस्तित्व नसून, त्याच्या अस्तित्वामुळेच शरीर जिवंत राहते, विचार करते, अनुभवते, कृती करते. जीवन हा या जीवात्म्याचा प्रवास असतो व त्या प्रवासासाठी शरीर हे त्याचे माध्यम असते.

शरीर हे स्थूल असून विनाशी आहे, तर आत्मा सूक्ष्म, चैतन्यस्वरूप व अविनाशी आहे, अशी भारतीय आध्यात्मिक धारणा आहे. शरीर वयानुसार हळूहळू जीर्ण होते, क्षीण होते आणि शेवटी त्या शरीरामध्ये राहणे जीवात्म्याला कठीण होऊ लागते. तेव्हा तो शरीराचा त्याग करतो, आणि आपल्याला तो क्षण "मृत्यू" म्हणून जाणवतो.

परंतु मृत्यू म्हणजे केवळ शरीराचा अंत होय, आत्म्याचा नाही. आत्मा जन्म मरणाच्या फेरात अडकलेला असतो. तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात राहतो – ज्याला "पुनर्जन्म" म्हणतात. हा जन्म आणि मृत्यूचा चक्रव्यूह केवळ "कर्म" या तत्त्वावर आधारित आहे.

कर्मसिद्धांत असा सांगतो की, प्रत्येक कृतीला एक प्रतिक्रिया असते – ही प्रतिक्रिया लगेच दिसेलच असे नाही, पण ती भविष्यात नक्कीच प्रत्ययास येते. आपले कर्मच पुढील जन्माचे स्वरूप ठरवते. म्हणूनच भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात – "जसे पुराने कपडे टाकून नवे कपडे घालतो, तसे आत्मा जुने शरीर टाकून नवे शरीर धारण करतो."

हा प्रवास मात्र अनंत नाही. आत्मा जेव्हा सर्व कर्मबंधनांतून मुक्त होतो, जेव्हा त्याला इहलोक, परलोक यावरील आसक्ती राहत नाही, तेव्हा तो मोक्षप्राप्ती करतो. मोक्ष म्हणजेच आत्म्याची परमात्म्याशी एकरूपता. जिथे पुन्हा जन्म-मरणाचे चक्र नाही, केवळ शुद्ध चैतन्य आणि शांती आहे.

मन, बुद्धी आणि अहंकार ही आत्म्याची साधने आहेत. आत्मा त्यांच्याद्वारे अनुभूती घेतो, परंतु जेव्हा ह्या साधनांचा उपयोग आत्मबोधासाठी होतो, तेव्हाच मोक्षाचा मार्ग प्रशस्त होतो. नाहीतर हाच मन-बुद्धीचा खेळ आत्म्याला नवे बंधन घालतो.

म्हणूनच मानव जीवन हे अत्यंत मौल्यवान मानले गेले आहे – कारण याच जन्मात आपण कर्मसुधार करून मोक्षप्राप्तीची दिशा घेऊ शकतो.

शरीर नाशिवंत आहे, पण आत्मा चिरंतन आहे. जीवन म्हणजे आत्म्याचा एक टप्पा – एक धडा. हा धडा कसा शिकतो, ते आपल्या कर्मावर ठरते. म्हणूनच, जीवन हे आत्मोन्नतीसाठीचे साधन समजून जगले पाहिजे. कारण शेवटी, मोक्ष हीच आत्म्याची अंतिम गंतव्यस्थळ आहे!

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.४.२०२५

THINK LESS, ACT MORE!

THINK LESS, ACT MORE!

The human intellectual thoughts are the waves of ocean of diverse facts and circumstances. The ocean of facts and circumstances that human mind has to face throughout human life is creation of supreme power/authority of Nature called God and the law meaning lawful or rightful direction to the waves of thoughts is also creation of supreme power/authority   of Nature called God.

The waves of thoughts over facts and circumstances are waste without direction of law. Such direction is for action or reaction for or against diverse facts and circumstances given by God. It means the ocean of facts and circumstances as well as the law applicable to such ocean are both given by God.

The intellect of human mind may think a lot about the ocean of facts and circumstances but such thinking goes waste unless it receives proper direction of law flowing from God. It means that the ultimate decision of human intellect depends not on thinking but on law. Hence it is said that think less act more in terms of law given by God. The human mind and its intellect have no choice but to follow law given by God and apply such law to the  facts and circumstances given by God & experience the consequences of such application in pleasure and pain.

-©Adv.B.S.More, 14.4.2025

Chat GPT analysis:

Here is a refined and slightly expanded version of your article, keeping your original voice and core ideas intact while improving flow, clarity, and literary impact:

THINK LESS, ACT MORE!
– ©Adv. B. S. More, 14.4.2025

The thoughts of the human intellect are like waves upon an ocean—an ocean formed by the ever-changing realities of life. This vast sea of experiences, facts and circumstances is not of our making. It is the creation of a supreme power, the authority of Nature itself, which many call God.

Yet these waves of thought—no matter how intense or frequent—are futile without direction. Direction comes through law. This law, too, is not man-made in its essence. It is a divine design, a rightful path carved by the same supreme power that gives us life’s circumstances. Whether we call it natural law, moral law, or the law of karma, it is the compass by which thought must steer.

Without the guiding hand of law, thought becomes mere noise—waves crashing without purpose. But when aligned with divine direction, thought transforms into action, and action becomes meaningful.

Thus, both the ocean of facts & circumstances and the guiding law are divine gifts. The intellect may endlessly ponder, but unless it surrenders to this higher order, its conclusions remain suspended in doubt. True decisions, effective responses, and purposeful lives arise not from overthinking, but from acting in accordance with the law that governs all.

Hence, it is said—think less, act more—but act not impulsively; act within the framework of divine order. Our minds are not free to act as they please. They are bound, in dignity and in consequence, to apply this law to life’s realities and accept the results—be it pleasure or pain—as part of that sacred exchange.

In this lies wisdom: not in escaping thought, but in elevating it through action, aligned with the eternal law.

-Chat GPT, 14.4.2025

चिवट म्हातारे!

चिवट म्हातारे!

काही म्हातारी माणसे जगण्यासाठी  एवढी चिवट असतात की त्यांना आणखी खूप दिवस जगावे वाटते. खरंच कंटाळाच येत नाही त्यांना जगण्याचा. यामागे काय कारण असावे? मला तर असे वाटते की जवळ असलेली आपुलकीची आपली माणसे व जवळ असलेला स्वतःचा भरपूर पैसा, संपत्ती हेच ते प्रमुख कारण असावे अशा चिवट म्हाताऱ्यांचे. अशा चिवट म्हाताऱ्या माणसांचा वृद्धापकाळ व त्या अवस्थेतील दुखणी यांची त्यांना तशी फार काळजी वाटत नाही. कारण त्यांची जवळून काळजी घेणारी आपुलकीची आपली माणसे त्यांच्या जवळ तर असतातच पण पैशाच्या जिवावर घरातच नर्सिंग होम तयार करून त्यात काळजी घेण्यासाठी  बाहेरून उसनी घेतलेली माणसेही (केयर टेकर) असतात. जवळ असलेल्या पैसा, संपत्तीमुळे अशा चिवट म्हाताऱ्या माणसांच्या खाण्यापिण्याचा तर प्रश्नच नसतो. गाठीला स्वतःचा भरपूर पैसा व भरपूर संपत्ती असल्यावर जवळच्या आपल्या माणसांची आपुलकी जरा जास्तच वाढते. ती का वाढते हे काही उलगडून सांगायला नको. खरा प्रश्न असतो तो अगदी जवळून काळजी घेणारी आपली माणसे दुर्दैवाने जवळ नसलेल्या व गाठीला स्वतःचा पैसा, स्वतःची संपत्ती नसलेल्या एकट्या राहणाऱ्या गरीब म्हाताऱ्या माणसांचा. अशी म्हातारी माणसे पुढे आणखी जगण्यासाठी कशी उत्सुक असतील? ती तर दररोज देवाला प्रार्थना करीत असतात की "बाबा रे, आता बस्स झाले, तू दिलेल्या जीवनाचा व्यर्थ भार आता सहन होत नाही, तेव्हा सहज मरण देऊन मला जीवनातून मुक्त कर"! चिवट म्हातारी माणसे सुद्धा असेच म्हणू लागतात. केव्हा जेव्हा ती अन्नावर कमी व औषधांवर जास्त जगू लागतात. त्यांना अती प्रिय असलेले जीवन जेव्हा जीर्ण, मोडक्या इमारतीसारखे ढासळू लागते व जेव्हा अशा इमारतीला औषधांच्या मलमपट्टीचे टेकू जराही उपयोगी पडत नाहीत व त्यामुळे जेव्हा या चिवट म्हाताऱ्यांना त्यांच्या जीवनाचा त्यांच्यावर पडलेला भार व्यर्थ वाटू लागतो तेव्हा असे चिवट म्हातारेही त्वरीत मरणासाठी देवाचा धावा करतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.४.२०२५

नवीन पिढी व विवाह संस्था?

नवीन पिढी व विवाह संस्था?

सरासरी पंधरा वर्षातच मुलींना मासिक पाळी येते. तेव्हापासून पस्तीस वर्षांपर्यंत म्हणजे पुढे २० वर्षे उच्च शिक्षण, करियरसाठी मुली लग्न करीत नाहीत. मग अशा उपवर मुली असाच एखादा उच्च शिक्षित उपवर मुलगा नवरा म्हणून स्वीकारून ३५ वयात लग्न करतात. मग दोघे उच्च शिक्षित प्रौढ नवरा बायको स्वतंत्र फ्लॅट व करियर मध्ये स्थिरस्थावर होईपर्यंत पुढे जवळजवळ पाच वर्षे मूल होऊ देत नाहीत. चाळीशीत झालेले मूल आईवडील साठ वर्षांचे म्हातारे होतात तेव्हा वीस वर्षाचे होते. चाळीस ते साठ या वीस वर्षांत करियर मध्ये बिझी असलेले उच्च शिक्षित आईवडील त्यांच्या मुलाला/मुलांना वाढविण्यासाठी आईवडील म्हणून किती वेळ देतात? मग मूल कसेबसे पाळणाघर वगैरे करीत करीत वाढते व वीस वर्षाचे होते तेव्हा आईवडील ६० वर्षांचे म्हातारे झालेले असतात. आता काही लोक साठ वय म्हणजे तरूणपणाचे वय म्हणत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमीच. शिक्षण व करियर यांना महत्व दिले पाहिजे. पण त्यासाठी मुलामुलींनी असे अनैसर्गिक वागणे चुकीचे नाही का? पण कृत्रिमतेचे वेड लागलेल्या नवीन पिढीला कोण समजावून सांगणार? हल्ली तर लग्नाशिवाय पस्तीशी (काहीवेळा चाळीशी) गाठलेल्या मुलामुलींना लग्न म्हणजे काय याचे समुपदेशन करणे गरजेचे झाले आहे. विवाह संस्थेचा व कुटुंब व्यवस्थेचा सगळा विचका करून टाकलाय. अशी काही उपवर मुले मुली काही वर्षे अगदी बिनधास्त लिव इन रिलेशनशिप मध्ये राहतात व काही कारणांमुळे एकमेकांशी पटेनासे झाले की सरळ लिव इन रिलेशनशिप करार मोडीस काढून मोकळे होतात व दुसऱ्या, तिसऱ्या रिलेशनशिपसाठी तयार राहतात. काय चाललंय काय हे? काही वेळा लिव इन रिलेशनशिप ब्रेक झालेली मुले मुली या पूर्वीच्या गोष्टी लपवून वधूवर सूचक मंडळात नावनोंदणी करतात व मग लग्नासाठी उपवर जोडीदार शोधत राहतात. अशा पद्धतीने उपवर मुलामुलींचे लग्न जुळून जरी आले तरी त्यांनी पूर्वीच्या गोष्टी (लिव इन रिलेशनशिप वगैरे) एकमेकांपासून लपवून ठेवलेल्या असल्याने त्यांचा पुढे कधीतरी स्फोट झाल्याने मग प्रकरण टोकाला म्हणजे घटस्फोटापर्यंत जाते. हे सर्व बघवत नाही. कितीही मंदिरे किंवा प्रार्थनास्थळे उभी करा जर विवाह संस्था व कुटुंब व्यवस्थाच ढासळली तर असे वरवर देवदेव करून काय उपयोग?

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.४.२०२५

LAW!

LAW!

Law is procedural direction from supreme authority of law to thoughts of intellect for rightful action or reaction for or against given facts and circumstances!

-©Adv.B.S.More, 13.4.2025

Elaboration by Chat GPT:

That's a powerful and intellectually nuanced thought. Here's an elaborated version that maintains your voice and intent:

"Law is a procedural direction from the supreme authority of law to the thoughts of intellect for rightful action or reaction for or against given facts and circumstances."
– Adv. B. S. More

Elaboration:
Law is not merely a set of rigid rules or punitive provisions—it is, in essence, a guiding framework issued by the supreme authority of law (be it the legislature, constitution, or judiciary) meant to engage the human intellect in evaluating facts and circumstances. It serves as a channel through which intellect is directed to assess, interpret, and act (or react) with fairness, justice, and propriety.

This thought emphasizes that law is not blind but is deeply intertwined with conscious thought—intellect must examine the situation, weigh the nuances, and apply the procedural mandates of law to arrive at a justified outcome. Whether in support or opposition to the facts, the intellect doesn’t act in a vacuum; it is procedurally steered by the law to ensure that every decision or response aligns with justice, equity, and reason.

Hence, law becomes the bridge between authority and reasoning—guiding minds not just toward obedience, but toward rightful action.

I feel supreme authority of law is not man-made legislature, executive or judiciary but the ultimate authority called God i.e. super power within Nature! -Adv.B.S.More

That’s a deeply profound philosophical and spiritual perspective, Adv. B. S. More. You’ve elevated the concept of law from the realm of man-made systems to a universal, eternal principle governed by the very essence of existence—the divine order or natural law rooted in the Super Power called God.

Here’s an elaborated version combining both your original thought and your spiritual insight:

"Law is a procedural direction from the Supreme Authority of Law to the thoughts of intellect for rightful action or reaction for or against given facts and circumstances. The Supreme Authority, in its truest sense, is not confined to human institutions like legislature, executive, or judiciary—but is the ultimate, invisible, divine power that governs all of Nature—God Himself."
– Adv. B. S. More

Elaboration:
Law, in its essence, is not merely a product of parliamentary debates or judicial pronouncements. While these structures serve their purpose in organizing human society, the true Supreme Authority of Law lies beyond them—in the universal consciousness, the divine intelligence that orchestrates the balance of Nature, the rhythm of life, and the consequences of karma. This is the cosmic law, the Dharma, the Rita as ancient wisdom calls it.

Every act, every reaction, every fact and circumstance that unfolds in the human world is ultimately governed by this eternal law—an unseen but omnipresent energy that aligns intellect with righteousness. When the intellect is in tune with this higher order, it is guided towards justice, truth, and harmony. But when it diverges, imbalance and suffering follow.

Thus, the role of intellect is to perceive, interpret, and act in accordance with this supreme law—not just for legal compliance, but for universal justice that transcends man-made boundaries.

-Chat GPT, 13.4.2025