https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

देव

देव एक अमूर्त संकल्पना!

विश्व किंवा सृष्टीलाच निसर्ग म्हटले तर ठीक. पण निसर्ग म्हणजे कोणती तरी सर्वश्रेष्ठ किंवा सर्वशक्तीमान शक्ती अशी कल्पना केली की मग निसर्गाचा देव होतो. पण देव ही मूळातच अमूर्त संकल्पना आहे जी प्रत्यक्षात अनुभवता येत नाही. म्हणून तर निसर्गाचे विज्ञान वैश्विक सत्य म्हणून जगात एकच आहे, पण देवाचा धर्म जगात एक नाही. देव ही संकल्पनाच मूळात अस्पष्ट, अमूर्त (abstract) असल्याने जगात अनेक मानव समुदायांचे अनेक देवधर्म आहेत. निसर्गातून वैज्ञानिक सत्याची जाणीव होते, तर काल्पनिक देव संकल्पनेतून दैवी चमत्काराच्या अनेक धार्मिक कथा निर्माण होतात. या विविध कथा अनेक धर्मग्रंथातून वाचायला मिळतात. पण या कथामय चमत्कारांचा अनुभव प्रत्यक्षात घेता येत नाही. मी चमत्काराला नमस्कार करतो व मनातल्या मनात पुटपुटतो "हे निसर्गा, हे देवा, चमत्कार कर व सुख शांती दे"!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.४.२०२०

PARENTS

PARENTS ARE LIVING GODS!

Good children regard their biological creators not as sex instinctive man and woman but as their parents by high moral emotion. This moral human conduct is also natural human conduct and NOT any divine conduct inspired by any God!

-Adv.B.S.More©28.4.2020

रविवार, २६ एप्रिल, २०२०

निसर्गदेव

निसर्गाला देव म्हणायचे की नाही?

निसर्ग हे सत्य जसे आपले आईवडील हे जैविक सत्य. पण आईवडिलांना मुलांनी आईवडील न म्हणता जन्मदाते स्त्री व पुरूष म्हणणे म्हणजे निसर्गाला निसर्गच म्हणणे होय. पण मुले जेंव्हा आईवडिलांना केवळ जैविक पातळीवर न ठेवता प्रेमाच्या, मायेच्या उच्च भावनिक पातळीवर आणून केवळ स्त्री पुरूषाऐवजी आईवडील म्हणतात तेंव्हा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. निसर्गाकडे अशा उच्च भावनिक दृष्टिकोनातून बघितले की निसर्गाचा देव होतो. पण निसर्ग हा निसर्गच राहतो. दृष्टिकोन बदलण्याने तो दैवी चमत्कार करणारा देव होत नाही. अशा दैववादी चमत्कारावर विश्वास ठेवणे हे सत्य सोडून मिथ्यावर विश्वास ठेवण्यासारखे आहे. निसर्गाला निसर्ग म्हणा नाहीतर उच्च भावनिक दृष्टिकोनातून  देव म्हणा तो फक्त नैसर्गिक सत्याचीच अनुभूती देतो.

-ॲड.बी.एस.मोरे©२७.४.२०२०

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

निसर्ग म्हणे...

निसर्ग म्हणे मानवी मेंदूला!

निसर्ग म्हणे मानवी मेंदूला, अरे विस्मयचकित करून टाकणारे जग आहे ना माझे! अरे माझ्या या आश्चर्यकारक जगाकडे बघताना माझ्यातला देव काय बघत बसलास! तुझ्या कल्पनेतला तो धार्मिक देव मी नव्हेच! मी निसर्ग आहे! निसर्ग म्हणतात मला! मग माझ्या पाया पडत काय बसलास? आजूबाजूला बघ जरा! सगळीकडे मीच तुला दिसेल! पण तो विविध पदार्थांत, त्यांच्या विविध गुणधर्मांत व त्यांच्या विविध हालचालीत! सर्वांची एक विशिष्ट साखळी बघ, सर्वांची एक विशिष्ट हालचाल बघ! या विविध पदार्थांशी, त्यांच्या साखळीशी, त्यांच्या गुणधर्म व हालचालीशी असलेला तुझा संबंध ओळख व त्यानुसार तुझीही विशिष्ट हालचाल कर. तुझी ही हालचाल माझ्या रचनेशी ताळमेळ असणारी म्हणजेच नैसर्गिक हवी. तुझ्या धार्मिक प्रार्थनेशी मला काहीही देणे घेणे नाही. तुझ्या नैसर्गिक वागण्यात तू चुकलास की मग तुला तुझ्या अनैसर्गिक कर्माची कडू फळे ही भोगावीच लागणार. नैसर्गिक वागणूक काय व कशी असावी हे तुला माझ्या विविध सजीव, निर्जीव पदार्थांच्या गुणधर्मांतून व त्यांच्या विविध प्रकारच्या नैसर्गिक हालचालीतूनच शिकावे लागणार. या शिक्षणाला तर विज्ञान म्हणतात आणि या विज्ञानाच्या कौशल्यपूर्ण सरावाला, वापराला तंत्रज्ञान म्हणतात. मी एवढा मोठा आहे व माझे हे जग एवढे मोठे आहे की विज्ञान व तंत्रज्ञान ही तुझ्याकडून सतत, अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत देव व धर्म आणून तू स्वतःला भ्रमिष्ट करू नकोस. त्यात तुझा उगाच वेळ वाया जाईल. आता बघ, हा कोरोना विषाणू कोणी निर्माण केला? माझ्या  जगातील नैसर्गिक हालचालीत कोणाकडून काहीतरी चूक झालीय का याचा नीट शोध घे. या शोधातून तुला नक्की या विषाणूवर औषध सापडेल. पण तोपर्यंत त्रास हा होणारच! पण तू चिवट आहेस. मागे किती संकटे आली तुझ्या  जगण्याच्या मार्गात! पण तू तुझ्या बुद्धीचा नीट वापर करून शांतपणे स्वतःला किती व्यवस्थित  सावरून घेतलेस! आता पण तसेच होणार! तू माझी धार्मिक प्रार्थना करीत बसू नकोस. तुझ्या  बुद्धीने अशाप्रकारे केविलवाणे होणे मला कसे आवडेल? वैज्ञानिक प्रयत्न कर, नक्की मार्ग सापडेल!

तुझाच,

निसर्ग!

-ॲड.बी.एस.मोरे©२६.४.२०२०

टीपः

हे माझे काल्पनिक स्वगत आहे. मी निसर्गालाच वैज्ञानिक देव मानतो व निसर्गातच वैज्ञानिक देव पाहतो.

-ॲड.बी.एस.मोरे©२६.४.२०२०

Markhor

HOW SAD MARKHOR DIED THIS WAY!

May be not because the way Markhor is trapped, even if it had hands, it would not be of any use to it!😞

Markhor is a Wild Himalayan Goat and national animal of Pakistan. Markhor is snake killer and snake eater! Markhor is a large wild goat with very long twisted horns. Markhor is thought to have been named using Persian word for snake either because of the large wild horns of Markhor or due to its ability to kill snakes in the wild, although the exact reason is unknown.

Source: Noman Gull, World of Biological Sciences Group

Corona war victory

VICTORY IN CORONA WAR?

Man's victory in war against novel corona virus called covid-19 is very difficult in absence of specific drug remedy capable of destroying this virus and controlling its spread worldwide. The present uncertain situation in the midst of this war is like that of specific enemy identified but specific weapon for destruction of such enemy remains hiding!

-Adv.B.S.More©26.4.2020

Meditation

MEDITATION IN PRODUCT DISTANCING!

The world has become noisy and chaotic by so many non-essential products having three basic forms viz. intellectual products, economic products and political products. The human greed and jealousy are basic stimulants of these products. The marketing giants are shrewd in bombardment of these products on human minds through their diverse marketing channels and convincing human minds with necessity to buy these non-essential products. The meditation lies in avoiding eye, ear and mouth contact with all these  non-essential products. In specific, poor and weak persons who are incapable of buying non-essential products should follow product distancing rule strictly in relation to such non essential products which are in fact the special luxuries of economically rich and politically strong people. Since these luxury  products are eye, ear and mouth polluting, one should keep his or her eyes, ears closed and mouth shut, even writing pad shut, in relation to these non-essential or luxury products. This strict product distancing is true meditation in my personal view!

-Adv.B.S.More©26.4.2020