https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ४ मे, २०२५

मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम!

भगवान रामाला मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतात?

¶ भगवान श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात.
एक आदर्श जीवन, नितीमत्ता, एक आदर्श राज्यकर्ता या नात्याने जनतेप्रती व एक आदर्श कुटुंबकर्ता या नात्याने कौटुंबिक कर्तव्ये याविषयी उच्चतम मापदंड किंवा मर्यादा श्रीरामाने आपल्या आचरणातून निर्माण केले आहेत. आदर्श वागणूकीसाठी एक संदर्भ म्हणून श्रीरामाच्या जीवनमूल्यांचे दाखले पिढ्यानपिढ्या दिले जात आहेत आणि भविष्यातही दिले जात राहतील !! श्रीरामाच्या आदर्श जीवनमूल्यांपेक्षा आणखीन काही उच्च आदर्श मुल्ये असुच शकत नाही….आदर्श तत्त्वांची ती सर्वोच्च अंतीम मर्यादा आहे….. यामुळेच तर प्रभु श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून संबोधले जाते….एक ओझरती नजर टाकली तरी प्रभु श्रीरामाच्या आदर्शत्वाची आपल्याला प्रचिती येते…त्याचीच ही थोडीशी संक्षिप्त झलक 🙏

¶ आदर्श पुत्रः

श्रीराम आई-वडिलांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत असे. आई-वडिलांनी केलेली आज्ञा लगेच आचरणात आणत असत.

¶आदर्श मित्र:

श्रीराम एक आदर्श मित्र होते. त्यांनी सुग्रीव आणि बिभीषण यांना संकटकाळी साहाय्य केले. साहाय्य केल्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा केली नाही.

¶आदर्श राज्यकर्ता:

श्रीराम हे आदर्श राज्यकर्ते होते. ते जनतेची आईच्या ममतेने काळजी घेत असत. आई जशी सतत मुलांच्या विकासाचा आणि त्यांचे जीवन आनंदी व्हावे; म्हणून प्रयत्न करते, तसेच श्रीराम सतत प्रयत्न करायचे.

¶आदर्श बंधू:

आदर्श भाऊ कसा असावा, याचे आदर्श उदाहरण म्हणजे राम-लक्ष्मण ! श्रीराम आपला भाऊ लक्ष्मण याच्याशी प्रेमाने वागत असे. प्रत्येक प्रसंगात तो त्याला साहाय्य आणि योग्य मार्गदर्शन करत असे. ते एकमेकांविना राहू शकत नसत.

¶सत्यवचनी - एकवचनी - धर्मपालक:

श्रीराम सत्यवचनी होते. श्रीरामाने एकदा वचन दिले की दिले, मग त्यात कधीच बदल होत नसे. सत्य, धर्म आणि कर्म यांचा सुरेख संगम त्यांचेठायी होता.

¶एकपत्नी:

प्रभु रामचंद्र यांचा सितामाईप्रती असलेला एकात्म भाव हा आजही दाखला म्हणून दिला जातो.

¶ अप्रतिम शौर्य आणि संघटन:

प्रभू श्रीरामाच्या शौर्याचे आणि संघटन कौशल्याचे प्रमाण देणारे किती तरी प्रसंग रामायणात आहेत की जे आजही आपणास सातत्याने प्रेरणा देत आहेत.

¶वडिलांप्रति आदर:

प्रभू श्रीरामांकडून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी नेहमी आपल्या वडिलांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन केले. त्यांनी वडिलांच्या आज्ञेचा हसत स्विकार करून १४ वर्ष वनवास स्विकारला. वडिलप्रेम, वडिलांचा आदर काय असते याचा आदर्श श्रीरामाकडून घेतला पाहिजे.

¶गुरूचा सन्मान:

वडिलांप्रमाणेच गुरूचाही नेहमी सन्मान केला पाहिजे. गुरूचा आदर केल्याने व्यक्ती महान बनतो हे आपण श्रीराम कडे पाहून शिकू शकतो. विश्वामित्रा पासून ते महर्षी वशिष्ठ यांच्या प्रती असलेली त्यांची अपार भक्ती आपण जाणतो. अंधारात प्रकाशाचे जे महत्त्व असते तेच गुरूचे जीवनात असते, असे श्रीरामांनी म्हटले आहे. त्यांचे गुरू प्रेम, गुरू सन्मानाचा गुण नक्कीच आचरणात आणला पाहिजे.

¶सर्वधर्म समभाव:

प्रभू श्रीरामांनी नेहमी सर्व जाती धर्माचा सन्मान केला. रामायनात केवटच्या प्रती असलेले प्रेम आणि शबरीच्या भक्तीची कथा याचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांचा गुण आपण सगळ्यांनी आचरणात आणल्यास महान होऊ शकतो. सर्व धर्म, जातीतील लोकांबद्दल समान भाव ठेवला पाहिजे.

¶स्थितप्रज्ञता आणि संयम:

जीवनात परिस्थिती कशीही असो आपण आपला संयम ढळू देऊ नका. प्रभू श्रीरामांच्या जीवनात अनेकवेळा विपरीत परिस्थिती उद्भवली. धनुष्य भंग झाल्यानंतर परशुरामांकडून वारंवार छळ करूनही त्यांना राग आला नाही. असाच संयम आपण ठेवला पाहिजे.

¶निर्मोही:

अयोद्धा ते श्रीलंका पर्यंतच्या त्यांच्या प्रवासात त्यांनी कधीच अतिक्रमण केले नाही. रावणाचा अंत केल्यानंतर श्रीराम लंकेचे राजा होऊ शकत होते. मात्र त्यांनी राजयोगाचा लोभ न करता विभीषणाला सिंहासनावर बसवले. त्यांचा हा गुण प्रत्येकाने आचरणात आणला तर कितीतरी प्रश्न सहज सुटू शकतात. एखाद्या गोष्टी लालसा, लोभ माणसाला आंधळा बनवते, ज्यामुळे हातून चुकीचे काम घडू शकते. त्यामुळे जीवनात कधीच लोभ करू नका.

¶ आता या पार्श्वभूमीवर आपण कसे आहोत, कुठे आहोत , राज्यकर्ते कसे आहेत, कुठे आहेत, याचे आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.. प्रभु रामचंद्राच्या या जीवनमूल्यांच्या मापदंडाच्या पार्श्वभूमीवर आपल्यातील गुणावगुणांचे स्थान निश्चित केले तर आपल्याला योग्य मार्गावर येण्यास निश्चितपणे दिशा मिळते.

¶ दिवसेंदिवस घटत चाललेली सहिष्णूता, प्रेमभाव, भ्रातृभाव, श्रध्दा, सचोटी, सौहार्दता, निस्पृहता, कौटुंबिक स्नेहभाव, सामाजिक बंधने, सत्यपणा, सचोटी, मैत्रभाव, संवेदनशीलता, वचनबद्धता, निष्ठा यांचा लोप होत चाललेला दिसतोय…. मर्यादा पुरुषोत्तमाच्या उच्चतम मापदंडाच्या तुलनेत आपण कुठेच नाही, अशी स्थिती निर्माण होत चालली आहे….. त्या मापदंडाच्या किमान काही अंश जरी आचरणात आणला तरी आपले जीवन सुखी-संपन्न होईल !!

¶ श्रीराम भक्तीच्या युक्तितून शक्तिचा मार्ग शोधण्याच्या धुर्तपणापेक्षा श्रीरामाची आदर्श तत्वे जर आचरणात आणली असती तर एव्हाना किमान रामराज्याच्या दिशेने वाटचाल तरी सुरु झाली असती !! रामायण कथा, पारायणे, प्रवचने ही फक्त ऐकायचीच असतात… त्यांचा फक्त त्या दिवसापुरता इव्हेंट करायचा असतो…..तो झाला की मग विषय समाप्त…आणि मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न……सांप्रतकाळी सरसकट असेच चालू आहे !!

¶ जेंव्हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्राची आदर्श जीवनमूल्ये अंगिकारली जातील... तेंव्हाच 'रामराज्य' अवतरेल…अन्यथा ते फक्त स्वप्नच राहील !!

भगवान राम हा भगवान विष्णूचा सातवा अवतार होता. धर्म स्थापित करण्यासाठी तो पृथ्वीवर आला. त्याने आपली सर्व कामे हद्दीत राहून केली.

हे लक्षात येते की जेव्हा सीतेच्या स्वयंवरात रामाने धनुष्य उगारले तेव्हा त्याने लगेच लग्न केले नाही. त्याऐवजी, त्याने आपले वडील म्हणून राजा दशरथाच्या आज्ञेची प्रतीक्षा केली. रामाच्या लग्नाबद्दल बोलणे हा दशरथाचा अधिकार होता.

समानता, त्यांनी हद्दीत राहून अशी अनेक कामे केली आणि त्यांना "मर्यादा पुरुषोत्तम श्री राम" म्हणून ओळखले जाऊ लागले.

रामाने सदैव आपल्या मर्यादेचे भान ठेवलं. कोणत्याही परिस्थितीत तो डगमगला नाही. त्यांच्याकडे प्रचंड अशा शक्ती होत्या. त्यांनी जर मनांत आणलं असतं तर ते काय करू शकले नसते? पण त्यांनी शक्ती वापरतानाही काळाचे आणि वेळेचे भान ठेवलं. हेच त्यांना पुरुषांमधील उत्तम पुरुष बनवत.

रामाने त्याला घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन कधी केले नाही. आपला पुरूषार्थ मर्यादा पाळूनच सिद्ध केला. बंडखोरी करून नाही. नियम रीत पाळली म्हणून त्याला मर्यादा पुरूषोत्तम म्हणतात.

रामाने संशयी वृत्तीने सीतेला अग्निपरीक्षा व वनवास भोगण्याची शिक्षा दिली, असे असतांना स्रिया रामाला आदर्श व मर्यादा पुरुषोत्तम का मानतात?

प्रभू रामाने सीता मातेला तिची शुद्धता आणि निर्दोषता सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा (अग्नीपरीक्षा) घेण्यास सांगितले कारण अफवा पसरत होत्या की राक्षस राजा रावणाच्या बंदिवासात असताना तिचे अपहरण आणि अपमान करण्यात आले होते. अग्निपरीक्षा करून, सीता लोकांना हे सिद्ध करू शकली की ती अजूनही पवित्र आहे आणि त्यांच्या कुटुंबाचा सन्मान राखला आहे. सार्वजनिक शंका दूर करण्याचा आणि सामाजिक सुव्यवस्था राखण्याचा एक मार्ग म्हणूनही या कृतीकडे पाहिले गेले.

प्रभू रामचद्रांनी कधीच सीतेच्या पवित्रतेवर संशय केला नाही, परंतु प्रजेच्या भीतीमुळे त्यांना हे सोंग करावं लागलं, त्यांना नको होते की सीता मातेच्या पवित्रतेवर कोणीही संशय घ्यावा.

रघुकूल रित सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई।।

प्रभू श्रीराम यांना मर्यादापुरूषोत्तम का म्हटले जाते?

श्रीरामांनी धर्मपालनाची मर्यादा स्वप्नातही ओलांडलेली नाही. धर्माचे मूर्तिमंत रूप म्हणजे प्रभू श्रीराम.

जसे या पङ्क्तित म्हटले आहे —

रामो विग्रहवान् धर्मः।

राम हा धर्माचे प्रत्यक्ष रूप आहे.

हे सगळे मर्यादा या शब्दातून दर्शवले जाते.

पुरुषोत्तम म्हणजे साध्या शब्दात सर्वश्रेष्ठ.

प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरूषोत्तम का म्हटले जाते?

आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसांबरोबर नम्रतेने वागणे.

मोठ्यांचा वडिलधारे मंडळी यांचा योग्य तो आदर ठेवणे

त्यांना कोणत्याही परिस्थितीत दुरुत्तरे न करणे.

या सर्वांचे पालन प्रभू श्री रामचंद्र हे करीत होते.

म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते.

रामाने संशयी वृत्तीने सीतेला अग्निपरीक्षा व वनवास भोगण्याची शिक्षा दिली, असे असतांना स्रिया रामाला आदर्श व मर्यादा पुरुषोत्तम का मानतात?
सदर प्रश्नच चुकीचा आहे.कारण संशयी वृत्तीने अग्निपरीक्षा व वनवासात पाठवले हे गृहीतकच चूक आहे.

किंवा तुमच्या मतानुसार जरी शिक्षा दिली हे माहीत असून पण सगळेच आदर्श व मर्यादा पुरूषोत्तम म्हणून आदर देतात म्हणजेच असली गोष्ट सगळ्यानाच स्वतः सीतामाईने हसत हसत स्विकारली.म्हणजे योग्य आहेच

'मर्यादा पुरूषोत्तम' म्हणजे काय?
भगवान श्री राम यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात कारण त्यांनी आयुष्यात कुठेही सन्मानाचे उल्लंघन केले नाही. पालक आणि गुरूंच्या आदेशाचे पालन करत त्यांनी 'का' हा शब्द कधी आणला नाही. तो एक आदर्श मुलगा, शिष्य, भाऊ, पती, वडील आणि राजा बनला, ज्याच्या राज्यात लोक आनंदाने व समृद्धीने भरले होते.

'मर्यादा पुरूषोत्तम' म्हणजे काय?
या विश्वात सांसारिक सुख भोगत असताना लालसा न करता धर्माने घालून दिलेल्या बंधन पाळत असताना हताश न होता आपली कर्तव्य निभावणं , दिलेल्या शब्दाचे वचनाचे पालन करण आपल्या मर्यादेत राहणं या सर्व गोष्टींचा आदर्श राम आहे राम हा सांसारिक नात्यातील परमोच्च उदाहरण आहे , आदर्श पुत्र , एकनिष्ठ पती , आज्ञाधारी मुलगा प्रजाहित दक्ष राजा , एक चांगला मित्र , होता म्हणून रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात

रामाने संशयी वृत्तीने सीतेला अग्निपरीक्षा व वनवास भोगण्याची शिक्षा दिली, असे असतांना स्रिया रामाला आदर्श व मर्यादा पुरुषोत्तम का मानतात?

अंतर्यामी भगवान श्री रामाने सीता मातेला अग्नी परीक्षा फक्त समाजासाठी द्यावी लागली म्हणून मर्यादा पुरुषोत्तम?

स्त्रोतः क्वोरा डायजेस्ट

वृद्धापकाळ कोणाला सुखाचा तर कोणाला दुःखाचा!

वृद्धापकाळ कोणाला सुखाचा तर कोणाला दुःखाचा!

(१) सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त होऊन पेन्शन घेणाऱ्या किंवा बँकेत स्वतःसाठी चांगली रक्कम शिल्लक ठेवणाऱ्या काही लोकांसाठी व पिढीजात श्रीमंत लोकांसाठी वृद्धापकाळ तसा आजारपणातही सुखावह असतो कारण दैनंदिन जेवणखाण व हॉस्पिटल, औषध पाण्याची काळजी नसते. मरेपर्यंत त्यांचे जीवन तसे सुरक्षित असते.

(२) गरीब कुटुंबात जन्मून छोटासा धंदा, व्यवसाय करून पोटावर जगणाऱ्या लोकांना शरीर धडधाकट असताना जे पैसे मिळतात ते सर्व संसारावर खर्च करावे लागल्याने वृद्धापकाळात त्यांची बँकेत काही शिल्लक नसते. अशा लोकांसाठी त्यांचा वृद्धापकाळ हा अतिशय दयनीय असतो.

(३) जवळ पेन्शनची सोय नसलेली किंवा बँकेत काही शिल्लक नसलेली गरीब माणसे त्यांच्या मुलांसाठी उपकारापुरती उरतात. कष्टकरी आई बापांचे उपकार जाणणारी मुले आई वडिलांना म्हातारपणी वाऱ्यावर सोडत नाहीत पण काही मुले निर्दय पणे म्हाताऱ्या आईबापांचा आपल्या संसारात त्रास नको म्हणून सरळ त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करतात. खूप दयनीय अवस्था असते अशा गरीब म्हाताऱ्या आईबापांची. पण बाहेर दोघेही कामाला जाणारी काही उच्च शिक्षित, नवश्रीमंत हुशार व स्वार्थी मुले व सूना किंवा मुली व जावई गरीब म्हाताऱ्या आईला त्यांच्या लहान मुलांना त्यांच्या घरात नीट सांभाळण्यासाठी स्वतःजवळ ठेवून घेतात व कटकट करणारा म्हातारा बाप/सासरा जवळ नको म्हणून त्याची रवानगी त्याच्याच बायकोच्या परवानगीने वृद्धाश्रमात करतात. जगण्याच्या स्वार्थासाठी अशा वृद्ध पुरूषाची बायकोही अशा तडजोडीला तयार होते.

(४) गरीब माणसाचा वृद्धापकाळ हा अशाप्रकारे भिकार काळ असतो. सहन होत नाही व सांगताही येत नाही असा हा काळ असतो.

(५) अशा भिकार अवस्थेत बाहेर कुठे माणसांतील माणुसकी शोधणे, समाज कायद्यातील न्यायाच्या पाठीमागे लागणे किंवा अध्यात्मात परमेश्वराचा आधार शोधणे हे केवळ मृगजळ असते. परमेश्वर तरी अशा किती गरीब, असहाय्य म्हाताऱ्यांना पुढे होऊन मदत करणार? काही म्हातारे सुखी तर काही म्हातारे दुःखी हा तर त्या परमेश्वराचाच अनाकलनीय खेळ असतो ज्या अनाकलनीय खेळाला काही लोक प्रारब्ध, नशीब, नियती वगैरे म्हणून मोकळे होतात व दुःखी म्हाताऱ्या लोकांना परमेश्वराची जपमाळ ओढत बसा म्हणून फुकटचा सल्ला देऊन मोकळे होतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.४.२०२५

Matrimonial Worry!

MATRIMONIAL WORRY OF FATHER FOR GROWN-UP DAUGHTER

A Frank Letter to a Friend – Dated 19.10.2014

Dear Learned Friend,

Thank you for your encouraging message regarding my daughter’s marriage. However, I must admit I was shocked to learn that your MBA-qualified daughter, who works as a manager in a foreign bank, has told you outright that she is not going to marry. Shocking indeed!

My daughter too is an MBA, holding a respectable marketing position with a good income. Unlike your daughter, she says, “Yes, I will marry.” But saying so is one thing, and doing it is another.

Let me share a real-life example. There is a beautiful unmarried woman—yes, woman, not girl—aged 35, a well-established Chartered Accountant earning over ₹10 lakhs per month. She used to say the same thing to her father—that she would marry "soon"—but the years passed. She couldn’t find a partner who matched her in looks, education, or income. Tragically, her father passed away, burdened by this worry. And what now? She is on a tour of Dubai with her mother, enjoying life, while the man who cared deeply for her left this world with a heart full of concern. This is the bitter truth of material life.

After a point, we parents must understand: our responsibility ends once we've educated and raised our children—say until age 25. Beyond that, it’s their life, their decisions, their fate. I’ve chosen to let go. I won’t spend the remaining years of my life worrying or pretending to “care” for someone who is fully capable of making her own choices.

I have my own mind, my own legal acumen, and my own right to live freely. Let us be practical, not emotional. Our usefulness to our children is over. Giving advice now often invites insult. They’ve become smarter than us—or at least they think so. They now want to teach us life lessons we neither asked for nor need.

They’ve grown wings and are flying in a much larger world. Let them fly. We don’t need to guide their flight; our sky was different, smaller. They have much of life left; ours is nearing its final chapters. We are slowly sinking into old age and eventual death. Why worsen that journey by clinging to worries that no longer serve us?

Please accept the hard truth: “No utility, no love.”

I know my frankness is not always welcomed, but as a friend, I owe you honesty. Live the rest of your life for yourself. Let go of the grown-up, self-reliant children. In today’s world, money and material success have overpowered the values of marriage and family. Our era—of morals, emotions, and family bonding—is fading. Let us leave gracefully, without illusions.

With regards,
Your friend and well-wisher,
Adv. B. S. More
19.10.2014

Postscript (Written on 2nd April, 2025):
Reflecting on this letter a decade later, I still stand by the core sentiment: that once our children are educated, capable, and independent, we must withdraw our emotional overinvestment in their personal decisions. However, I now realize that letting go does not mean becoming indifferent. It means maintaining dignity, boundaries, and peace of mind—while still offering quiet, unconditional support when genuinely needed.

Let the new generation soar with their ambitions; let the older generation rest with grace and wisdom. That, I believe, is the evolution of parenthood.

—© Adv. B. S. More, 2.4.2025

इथे तर सगळं कोरड असतं!

कुटुंब व्यवस्था हाच खरा भारतीय संस्कृतीचा पाया!

विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर रशिया, अमेरिका सारखे प्रगत देश अंतराळ क्षेत्रात झेपावले असले तरी शेवटी त्या क्षेत्रात मानवी वस्ती प्रस्थापित करणे कठीण आहे. त्यामुळे पृथ्वीवर स्वर्ग कसा निर्माण करता येईल हा विचार पृथ्वी विज्ञान व तंत्रज्ञानात महत्वाचा. त्यासाठी भौतिकता व आध्यात्मिकता किंवा ज्यांना चैतन्य शक्ती परमेश्वर मान्य नाही त्यांच्या साठी भौतिकता व नैतिकता यात संतुलन साधणारी संस्कृती जगभर निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. माझ्या मते कुटुंब व्यवस्था हाच भारतीय संस्कृतीचा पाया आहे. सर्व जगात दीर्घकाळ टिकणारी भारतीय कुटुंब व्यवस्था नांदावी असे मला वाटते. यासाठी मी भारतीय संस्कृती नुसार दीर्घकाळ टिकणाऱ्या कुटुंब व्यवस्थेचा सार असलेल्या "वसुधैव कुटुंबकम" या भारतीय सांस्कृतिक  वाक्यप्रचाराकडे बघतो. हे वाक्य केवळ मानवाशी संबंधित नसून सर्व जीवसृष्टींचा यात समावेश आहे. हा परस्परसंबंध सीमा किंवा सीमांद्वारे मर्यादित नाही. ते संपूर्ण विश्व व्यापते. हे वाक्य संपूर्ण मानवता हे एक कुटुंब आहे याची समज वाढवण्याचा प्रयत्न करते. हे वाक्य सांस्कृतिक आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडे असलेल्या वैश्विक मूल्यांवर जोर देते. हे वाक्य सहानुभूती, परस्पर विश्वास आणि आदर यांना प्रोत्साहन देते. हा संस्कृत वाक्प्रचार महाउपनिषद सारख्या हिंदू ग्रंथांमध्ये आढळतो, ज्याचा अर्थ, "जग एक कुटुंब आहे" असा आहे. "वसुधैव कुटुम्बकम्‌' या कल्पनेचा पहिला उल्लेख महा उपनिषदात येतो. वसुधा अर्थात पृथ्वी, इव म्हणजे ही, कुटुम्बकम्‌ अर्थात कुटुम्ब. संपूर्ण पृथ्वी ही एकच कुटुंब आहे.

अलिकडच्या काळात भारतीय तरूण तरूणींचा ओढा भारतीय संस्कृतीचे महत्व न ओळखता पाश्चात्त्य संस्कृती कडे जास्त वाढत चाललाय. विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर भौतिक प्रगती कितीही केली तरी पाश्चात्त्य संस्कृतीचा ओढा हा अधोगतीकडे नेणारा आहे हे निश्चित!

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.३.२०२५

बुद्धीचा योग्य वापर!

स्थितप्रज्ञ!

कुटुंब व्यवस्था!