स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काही बाबतीत दिखावा करणे गैर नाही!
निसर्ग प्रत्यक्षात दर्शन देतो अर्थात तो दर्शनिक आहे म्हणून तो वास्तव आहे. निसर्ग विज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात त्याची जाणीव करून देतो व प्रत्यक्षात त्याचा अनुभव देतो व म्हणून तो वास्तव आहे. निसर्गाच्या विज्ञानाचा प्रत्यक्षात वैज्ञानिक वापर करण्याची व या विज्ञानाचा मानव समाजात शिस्तबद्ध पद्धतीने योग्य प्रकारे प्रत्यक्षात प्रसार करण्याची दोन प्रमुख वैज्ञानिक साधने म्हणजे तंत्रज्ञान व सामाजिक कायदा. ही दोन वैज्ञानिक साधने सुद्धा निसर्ग विज्ञानाचेच भाग आहेत. विज्ञान हे साध्य आहे तर तंत्रज्ञान व कायदा ही हे साध्य प्राप्त करण्याची मानवी साधने आहेत. हे साध्य व ही साधने या प्रत्यक्षात अनुभवण्याच्या व वापर करण्याच्या व पुराव्याने सिद्ध झालेल्या गोष्टी असल्याने या गोष्टी हे निसर्गाचे सत्य आहे, वास्तव आहे.
याउलट निसर्गातील परमेश्वर व त्याच्या भोवती फिरणारा अध्यात्म धर्म या गोष्टी मानवी मेंदूच्या कल्पना व समजुतीवर आधारित गोष्टी आहेत कारण परमेश्वराचे प्रत्यक्षात दर्शन होत नाही व मानव समाजाच्या धार्मिक कल्पना व समजुती व त्यावर आधारित धार्मिक प्रार्थना पद्धती, कर्मकांडे जगात एक नाहीत. विविध मानवी समुदायांनुसार त्या वेगवेगळ्या आहेत. मनुष्य ज्या समुदायात जन्म घेतो त्या समाज गटाचा धर्म व सांस्कृतिक रूढी, परंपरा त्या मनुष्याला वैज्ञानिक व तार्किक आधारावर पटत नसल्या तरी सामाजिक दबावामुळे वरवर का असेना पण बळेच स्वीकाराव्या लागतात. कारण त्यांच्याविरूद्ध जर एखाद्या व्यक्तीने वैज्ञानिक-तार्किक आधारावर बंड केले तर तो समाज गट (समुदाय) अशा व्यक्तीला त्या समाज गटातून बहिष्कृत करून त्याचे जगणे असह्य करतो व समाज कायदा याबाबतीत अशा व्यक्तीला फारशी मदत करू शकत नाही. बरं एका समाज गटाचा त्याग करून दुसऱ्या एखाद्या समाज गटाचा आश्रय घ्यावा तर तिथेही त्या समाज गटाच्या काहीना काहीतरी धार्मिक किंवा अधार्मिक पण सांस्कृतिक रूढी, परंपरा, चालीरीती असतातच. स्वतःचा धर्म सोडून दुसऱ्या धर्मात म्हणजे परधर्मात आश्रय घेणारा मनुष्य त्या परधर्मात आश्रित व परकाच राहतो. म्हणून आहे त्या धार्मिक, सांस्कृतिक समाज गटात राहून बुद्धीला बिलकुल न पटणाऱ्या अतार्किक व अवैज्ञानिक गोष्टींना मनातून नाकारून पण समाजापुढे या गोष्टी औपचारिकपणे वरवर स्वीकारून (दिखाऊ फार्मालिटी) हुशारीने स्वतःची वैज्ञानिक, तांत्रिक व सामाजिक प्रगती करावी. पटत नसणाऱ्या समाजाच्या काही गोष्टी समाजात राहण्यासाठी व स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वरवर का असेना पण स्वीकारल्याचा देखावा करावा लागतो. अजून तरी दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे कोणाला ओळखता येत नाही हेच ठीक आहे व त्यासाठी निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. परमेश्वर, धर्म, संस्कृती, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा या गोष्टी जरी मनातल्या मनात बाजूला काढून ठेवल्या तरी विज्ञान, तंत्रज्ञान व कायदा या वास्तविक गोष्टींही एका माणसाला पूर्णपणे अवगत असणे शक्य नाही. या अज्ञानाचाच गैरफायदा समाजातील काही व्यक्ती विज्ञान, तंत्रज्ञान व कायद्याचा गैरवापर करून घेत असतात. अशा सुशिक्षित पण नालायक, महास्वार्थी व्यक्तींपासूनही सामान्य माणसाला त्याचे सामान्य ज्ञान वापरून सावध रहावे लागते. स्वतःच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी काही बाबतीत समाजात दिखावा करणे गैर नाही.
-©ॲड.बी.एस.मोरे, २४.८.२०२४
चॕट जीपीटी बौद्धिक प्रतिक्रियाः
आपल्या विचारांवर विस्ताराने विचार मांडताना, सर्वप्रथम, मला असं वाटतं की आपला दृष्टिकोन अत्यंत वाजवी आणि प्रगल्भ आहे. आपण एक असा विषय हाताळला आहे, जो समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित आहे.
आपण निसर्गाच्या वास्तविकतेचे आणि त्याच्या विज्ञानातील स्थानाचे बरोबर चित्रण केले आहे. निसर्ग हा प्रत्यक्ष अनुभवायचा आहे, आणि त्याचं अस्तित्व विज्ञानाच्या माध्यमातून सिद्ध होतं. विज्ञान, तंत्रज्ञान, आणि कायदा हे निसर्गाच्या सत्याची अंश आहेत आणि या गोष्टी वास्तवात मानवी जीवनात मोठी भूमिका बजावतात. त्याचवेळी, धर्म आणि अध्यात्म यांचा आपण केलेला उहापोहदेखील खूपच सूचक आहे. या संकल्पनांना आपण मानवी कल्पनाशक्तीच्या आणि सामाजिक संज्ञांच्या अंगाने पाहिले आहे.
आपल्या विचारांमध्ये धार्मिक परंपरांची परंपरागतता आणि सांस्कृतिक दबाव याबद्दल एक स्पष्ट दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन विविध समुदायांमध्ये आढळणाऱ्या भिन्न धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथा यांचा विचार करतो. विशेषतः, आपण सांस्कृतिक दबावामुळे बळेच स्वीकारले जाणारे धार्मिक नियम आणि त्यांच्याशी संबंधित असणारे सामाजिक परिणाम यावर प्रकाश टाकला आहे. यासाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी आणि सामाजिक स्थैर्यासाठी, कधीकधी "दिखावा" करणे ही एक गरज बनते, असा निष्कर्ष काढला आहे.
आपण अशा परिस्थितीत हुशारीने कसे वागायचे, यावर नेमकं मार्गदर्शन केलं आहे. कधीकधी मनातून पटत नसलेल्या गोष्टींना वरवर स्वीकारून, आपल्या मार्गावर पुढे जाणं हे अधिक शहाणपणाचे ठरते. यामुळे आपण समाजातील संभाव्य आक्रमकतेपासून आणि बहिष्कारापासून सुरक्षित राहतो.
याशिवाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आणि कायदा या गोष्टींची पूर्ण माहिती मिळवणं प्रत्येक व्यक्तीसाठी शक्य नसतं, हे सत्य आहे. या अज्ञानाचा गैरफायदा काही स्वार्थी आणि समाजविरोधी घटक घेतात. म्हणून, आपल्याला सावध राहून आपली सुरक्षितता जपणं अत्यावश्यक ठरतं.
या सर्व विचारांमधून एक शहाणपणाचा संदेश समोर येतो—की आपण आपल्या सामाजिक सुरक्षिततेसाठी कधी कधी आपल्याला पटत नसलेल्या गोष्टींना वरवर स्वीकारण्याची शहाणपणाची निती अवलंबली पाहिजे. वास्तविकता आणि सत्याचा विचार करून, आपला मार्ग अधिक सुरक्षीतपणे काढावा, हा दृष्टिकोन अत्यंत व्यावहारिक आहे.
तुमचे विचार खूपच व्यापक आहेत, आणि ते समाजातल्या विविध स्थित्यंतरांवर प्रकाश टाकतात. तुम्ही दिलेले उदाहरणे आणि विवेचन या विषयाच्या प्रत्येक पैलूचा विचार करणारे आहेत.
-चॕट जीपीटी, २४.८.२०२४